आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसुझांच्या उपकरणामुळे अंधांची नोटाबंदी काळात टळली फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉल डिसुझा, संशोधक
वय - सुमारे ४५ वर्षे  
चर्चेत का? -  नोटाबंदीच्या काळात यांचे उपकरण खूप उपयोगात आले.

गोष्ट गेल्या वर्षातील. तिरुवनंतपुरममध्ये एक अंध महिला टिफनी बरार हिच्याबरोबर एका दुकानदाराने गडबड केली. बरार हिला २० रु. ची नोट देण्याऐवजी १० ची नोट दिली. जेव्हा बरारने बंगळुरूत राहणारे खटपटे संशोधक मित्र पॉल डिसुझा यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी टिफनी बरार हिला वचन दिले की, लवकरच ते एक असे उपकरण तयार करतील, जे बनावट नोटा ओळखण्यात अंधांना साहाय्य करेल.
  
तसेही पॉल यांना दृष्टिबाधितांसाठी नवनव्या उपयोगी गोष्टी शोधून काढण्याची आवडच आहे. ते एक दिवस गाणे ऐकत होते. - नियरर माय गॉड...., जे टायटॅनिकचे होते. यास तीन व्हायोलिन वादकांनी संगीत दिले आहे. पॉल यांना वाटले की या गीतांच्या शब्दांना स्पर्श करून पाहावे. लिहिलेल्या शब्दांना त्यांनी स्पर्श केला तेव्हा त्यांना वाटायला लागले की, या शब्दांवर डॉट्स (पर्फोरेशन) झाले तर कोणीही त्यांच्या प्रिय संगीताला समजू आणि वाचूही शकेल. तेव्हा त्यांनी यावर काम करणे सुरू केले. एक खूपच कमी किमतीतील ब्रेल मशीन त्यांनी मिळवली, जी संगणकावर ब्रेल लिपीला भाषांतरित करते. बस. हे कामाला आले. उपकरण तयार झाले. लोकांना ते चांगलेही वाटले. 

२०१० मध्ये पॉल यांना यासाठी नॅशनल जिओग्राफिकच्या वतीने शेपिंग द फ्यूचर पुरस्कार दिला गेला. ते सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, पण २० वर्षांच्या वयातच त्यांनी एका अॅग्रो कंपनीत नोकरी केली. तिथेच त्यांनी आपले पहिले इन्व्हेन्शन केले. यात त्यांनी काकडी कापण्यासाठी एक उपकरण बनविले. टिफनी बरारच्या तक्रारीनंतर ते या कामावर लागले. त्यांनी सर्वप्रथम एटीएम कार्डासारखी प्लास्टिक मटेरिअल एकत्र केले. त्याचे नाव टिफनी ठेवले. नोटाबंदीच्या काळात हे उपकरण खूप वापरातही आले.  
बातम्या आणखी आहेत...