आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तो’ सामान्य माणूस...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईला परतातच लागलीच मी कामाला लागलाे. माझ्या गैरहजेरीतील राजकीय घडामाेडींची मािहती घेतली. काेण काेणाशी भांडतंय, काेणत्या नव्या पक्षांची स्थापना झाली अाहे, हे समजावून घेण्यासाठी जुन्या वृत्तपत्रांची कात्रणं, राजकीय पक्षांची अाद्याक्षरे, नवी धाेरणं, नव्या कायदेविषयक संज्ञा इ. मला जाणून घ्यावयाचे हाेते. खरं सागायचं तर नवीन असं काहीच घडलं नव्हतं. पिण्याचं पाणी पुरवणार, घरं बांधणार अशी अाश्वासनं देणारी नेहमीचीच मंत्र्यांची भाषणे हाेती. समाजविराेेधी घटकांना नेहमीचाच इशारा दिलेला हाेता. नवनव्या नावांचे नवे पक्ष स्थापन झालेले हाेते. पंचवार्षिक याेजना अंमलात अाणण्यासाठी निधी नव्हता, अथवा तुटपुंजा हाेता. अार्थिक तूट भरून काढण्यासाठी, निधीकरिता परदेशी शिष्टमंडळे जात हाेती. देशात अाैद्याेगिक अशांतता हाेती, दंगली हाेत हाेत्या. काही दिवसांपूर्वीचा ड्राॅइंग बाेर्ड तसाच ठेवून मी गेलाेय असं वाटत हाेतं. जणू काही मधल्या काळात फारसं काही घडलंच नव्हतं, मी पूर्ववत कामाला अारंभ केला.
एखादं नवं धाेरण अथवा कार्यक्रम जाहीर करणारा केवळ मंत्री वा पुढारी मला काढायचा नसताे. त्याचा परिणाम ज्यांच्यावर हाेणार ती सामान्य माणंसंही दाखवायची असतात. बरं, नुसता एक भारतीय नागरिक दाखवून भागत नाही, तर गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबी असे अनेक लाेक काढावे लागतात, हे सारे भारतीय असले तरी त्यांची चेहरेपट्टी, पाेशाख, सवयी कितीतरी भिन्न अाहेत! त्यामुळे नागरिक दाखवायचे म्हणजे माेठा जमावच काढावा लागताे! चित्राची कल्पना सुचायला जर विलंब झाला तर व्यंगचित्र वेळेवर सादर करण्यासाठी जमावातील काही लाेकांना चाट देऊन मी त्यांची संख्या कमी करताे. या जमावाचा अाकार मी कमी केला. ताे प्रतिनिधिक भारतीय जमाव अाहे असं वाचक मानू लागले. पुढे हळूहळू मी जमावातील सामान्य माणसं कमी केली. अखेर एकच जण उरला. ताे टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, अाखूड मिशांचा व चष्मावाला हाेता. धाेतर व चाैकडीचा काेट असा त्याचा वेश हाेता. चेहऱ्यावर भांबावून गेल्याचे भाव हाेते. व्यंगचित्र सादर करण्यासाठी वेळेची मर्यादा पाळताना हाेणार ताण त्यानं कमी केला. देशातील काेट्यवधी मूक जनतेचे ताे प्रतिनिधित्व करू लागला.
ताणतणावाच्या जीवनात मी थाेडा प्रसन्नतेचा शिडकावा पुरवत अाहे, असा माझा बराच काळ समज हाेता. ताे चष्मेवाला, चट्या-पट्ट्याचा काेट घातलेला सामान्य माणूस उत्स्फूर्तपणं सहज माझ्या व्यंगचित्रातच येऊन दाखल झाला! जणू त्याच्या निर्मितीत माझा काहीच हात नव्हता. अवतीभवतीच्या घडाेमाेडींचा ताे मूक साक्षीदार बनला. दुष्काळग्रस्त खेडी ते परदेशी शिष्टमंडळाचे विमानतळावरचे हाेणारे अागमन, पंतप्रधानांचे भाेजनदालन ते गलिच्छ वस्त्यांतील व्यथा समजण्यास अालेल्या पथकाच्या जेवणावळींपर्यंत ताे संचार करू लागला. कधी तर ताे मंत्र्यांसमवेत परदेशीही जाऊ लागला. वाणिज्य मंत्र्यांनं उत्तर धु्वावर पेंग्विन पक्षांशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या तेव्हा ताेही तिथं गेला हाेता.
माझ्या व्यंगचित्रांत डाेकावणारा ताे ‘सामान्य माणूस’ टाइम्स अाॅफ इंडिया‘च्या वाचकांचा अावडता बनलेला हाेताच. नव्या व्यंगचित्रासाठी ताे अगदी याेग्य अाहे असं मला वाटलं. अत्यावश्यक वस्तूंची टंचाई, मंत्र्यांचे निरर्थक परदेशदाैरे ते शहर स्वच्छ राखण्याबाबत स्थानिक पालिकेचे अाैदासीन्यांवर मल्लिनाथी करता येईल असं मला वाटलं. राेज प्रसिद्ध हाेणारे हे छाेटंसंच एक काॅलमी व्यंगचित्र असावं असं मी ठरवलं. मी संपादकांपुढं तसा प्रस्ताव मांडला. ते विराेध करतील अशी अपेक्षा हाेती. परंतु त्यांना माझी कल्पना एवढी अावडली, की दुसऱ्याच दिवसापासून हे व्यंगचित्र सुरू करण्याची त्यांनी तयारी दाखवली. त्यामुळं मी हबकूनच गेलाे. मनात, व्यंगचित्र सुरू करावं अशी केवळकल्पना घाेळत हाेती. एकदा असं व्यंगचित्र सुरू केलं, तर मग ते थांबवणं शक्य नव्हतं. दिवसांमागून दिवस ३६५ दिवस ते मला काढत राहावं लागणार हाेतं. मध्येच मी ते साेडून दिलं तर ताे माझा व्यावसायिक पराभव ठरला असता, नामुष्की झाली असती. माझी प्रतिष्ठा झाकाेळून गेली असती.
छाेट्या अाकाराच्या व्यंगचित्रांची सुरूवात करण्यासाठी मी सज्ज झालाे! वृत्तपक्षाच्या पहिल्या पानावरची जागा त्यासाठी अाम्ही निश्चित केली. ते काेणत्या तारखेपासून सुरू करायचं ते ठरवलं. अचानक मला त्यासाठी नाव सुुचलं ‘यू सेड इट’ (कसं बाेललात!) या शीर्षकाला सर्वांचा पाठिंबा मिळाला. ‘यू सेड इट’ हे छाेटं व्यंगचित्र सुरू झालं. मंत्री वा नाेकरशाहासारखी वास्तव पात्रं दाखवण्याची अाता गरज नव्हती. या पात्रांसाठी मी नवी प्रतीकं तयार केली. राजकीय अचूकतेच्या बंधनातून मुक्त हाेऊन मी काहीशा राजकीय ‘फंॅटसी’त गढून गेलाे.
कचरा हलवणं, पाणी टंचाई, तुंबलेलं सांडपाणी अशा स्थानिक प्रश्नांची मी हाताळणी करू लागलाे. नीट देखभाल न केलेले व ख्ड्यांनी भरलेले मुंबईचे रस्ते सुप्रसिद्ध अाहेत. परंतु देशात सर्वत्रच रस्त्यांची अवस्था अशीच हाेती. या विषयावर अनेक वर्षापूर्वी मी काढलेल्या एका व्यंगचित्राची अजूनही चर्चा हाेते. काही नियतकालिकांत त्यांचं पुर्नमुद्रणही हाेतं. एक खगाेलतज्ज्ञ एका माेठ्या दुर्बिणीतून चंद्राच्याा खडबडीत पृष्ठभागाकडं पाहत असल्याचं मी त्यात दाखवलं हाेतं. त्या व्यंगचित्राखाली लिहिलं हाेतं, ‘‘चंद्रावर काही ना काही नागरी जीवन असणारच! पहा, पहा त्या साऱ्या खड्य्ांकडे!’’
मला केवळ वाचकांना रिझवणारा, गुदगुल्या करणारा व्यंगचित्रकार समजले जात नाही तर गाढा विचावंत, समाजसुधारक, राज्यशास्त्रज्ञ, चुका करणाऱ्या राजकारण्यांचा टीकाकार म्हणून माझ्याकडं पाहिलं जातंय हे मला हळू हळू अमगलं. टपाल खात्यातील विलंब, सदाेष टेलिफाेन यंत्रणा, विजेची अव्वाच्यासव्वा फुगलेली बिलं, पालिका अधिकाऱ्यांचा गलथानपणा, शाळा प्रवेशातील भ्रष्टाचार अशी विविध गाऱ्हाणी मांडणारी पत्रं मला वेऊ लागली. अशाच एका पत्रात म्हटलं हाेतं... ‘‘कृपया ४७ डाऊन ही गाडी अमुक ठिकाणी काही मिनिटं थांबवावी. त्यामुळं अाॅफिसातून घरी जाण्यासाठी पुढच्या गाडीची मला चार तास वाट पहावी लागणार नाही!’’
माझ्या व्यंगचित्रामुळं हास्य फुलतं पण काही मंडळींना या व्यंगचित्रांचं वेगळंच गूढ अाकर्षण अाहे हे मला एका प्रसंगामुळं समजलं! त्या काळात अाकडयांचा जुगार लाेकप्रिय हाेता. न्यूयाॅर्क काॅटनच्या भावावर चालणारा हा जुगार बेकायदा हाेता. त्यावर अनेक जुगारी पैसे कमवायचे वा घालवायचे. या मंडळींना माझ्या व्यंगचित्रात भाग्यशाली अाकडा लपलेला अाहे असं वाटत असे!
दिल्लीत वृत्तपत्राचा खप वाढावा म्हणून माझ्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवावं असं, व्यवस्थापनाला वाटलं. भारतीय व परदेशी घटनांवरील अाठ वर्षांत काढलेल्या व्यंगचित्रांतून मी निवड केली. राजधानीत व्यंगिचत्रांचं असं प्रदर्शन प्रथमच भरत हाेतं. भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून काम केलेल्या प्रख्यात व्यक्तींच्या हस्ते उदघाटन झालं.

या प्रदर्शनाची पाेस्टर्स, कापडी फलक, बातम्या यांच्याद्वारे अागाऊ प्रसिद्धी केल्यानं उदघाटन समारंभाला खूप गर्दी लाेटली हाेती. त्याशिवाय खास निमंत्रितहीी हजर हाेते. त्यात एक प्रख्यात व्यंगचित्रकार हाेते. ब्रिटिश राजवटीवर हल्ला चढवणारी व अापल्या स्वातंत्र्य अांदाेलनातील बड्या नेत्यांना पाठिंबा देणारी त्यांची व्यंगचित्रे खूप लाेकप्रिय झालेली हाेती. ‘फ्री प्रेस’ मध्ये असतांना त्यांना मी एकदा भेटलाे हाेताे. ते एक विनाेदी मािसक काढणार हाेते व त्यासाठी व्यंगचित्रकारांच्या शाेधात ते मुंबईला अाले हाेते. त्यांनी मला दरमहा ५० रुपये ‘पाॅकेट मनी’ एवढ्या वेतनावर नाेकरीची अाॅफर दिली हाेती!
प्रदर्शन पाहून ते प्रख्यात, ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाहेर पडले. माझ्यासारख्या ‘उदयाेन्मुख’ व्यंगचित्रकाराला उपदेशाचे दाेन शब्द एेकवले तर त्यांचं मला वाईट वाटणार नाही, असा विचार त्यांनी केला. काही व्यंगचित्रातून चाैकडीचा काेट घातलेला , मिशा असलेला, चष्मा लावणारा जाे ‘सामान्य माणूस’ अाहेे, त्याला काढून टाका असं त्यांनी सूचवलं. माझ्या कलेच्या विकासाच्या अाड ताे गरीब सामान्य माणूस कसा येत अाहे हेही त्यांनी समजावून दिलं.
काेणाचाही सल्ला मानण्याचा माझा स्वभाव नाही. तेंव्हा मी नेहमीप्रमाणं व्यंगचित्र काढत राहिलाे. ज्या सामान्य माणसाची मी व्यंगचित्रातून हकालपट्टी करावी असं ते सुचवत हाेते, त्याचा तीन दशकानंतर माेठा गाैरव झाला. ‘टाइम्स अाॅफ इंडिया’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त टपाल खात्याने काढलेल्या खास तिकिटावर त्याचं चित्र झळकलं.

गरीब चाहत्याचे तीन रुपये
माझ्या व्यंगचित्रांच्या एका चाहत्यानं तर मला मनीअाॅर्डरनं तीन रुपये पाठवले! अापली अार्थिक स्थिती बरी नसल्यानं यापेक्षा जास्त पैसे पाठवू शकत नाही म्हणून दिलगिरीही प्रकट केली. एक व्यंगचित्र फार अावडलं म्हणून त्यानं हे पैसे दिले हाेते. अानंद व्यक्त करण्याची त्याची ती रीत हाेती. त्या गरीब चाहत्यांच्या कृत्यांनं मी भारावून गेलाे. अाभार मानण्यासाठी ‘यू सेड इट’ व्यंगचित्राची पुस्तकं मी त्याला भेट पाठवली. त्यावर त्याची प्रतिक्रिया अनपेक्षित हाेती! त्यानं दिलेल्या शाबासकीची त्याला परतफेड नकाे हाेती, असं त्यांनं कळवलं.
(‘लक्ष्मणरेषा’ या अार. के. लक्ष्मण लिखित, अशाेक जैन अनुवादित, अात्मचरित्रातील संपादित भाग, राजहंस प्रकाशनाच्या साैजन्याने.)