आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक बल्ब बदलण्यासाठी किती राहुल गांधी लागतील?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला -माहीत आहे काय? एक बल्ब बदलण्यासाठी किती राहुल गांधींची गरज आहे? आम्ही सांगतो, किमान 10 राहुल गांधी लागतील. कसे ते जाणून घ्या ..

पहिले राहुल : बल्बचे फंडामेंटल इश्यूज जाणून घेण्यासाठी लक्ष केंद्रित करतील. देशात आज कुणीच अंधारात राहत नाही. पहिल्या राहुलबाबांचे म्हणणे असे की, मुद्दा हा नाही की बल्ब काम करतो आहे किंवा नाही. ही विषयाकडे बघण्याची योग्य पद्धत नव्हे. आपल्याला अधिक खोलात जाऊन हे बघावे लागेल. त्यामुळे आपण जेव्हा खोलात जाऊ तेव्हा असे लक्षात येईल की, हा बल्ब बदलायचा नाही. तो बल्ब कसा तयार झाला, ती पद्धती बदलावी लागेल. वर्तमानातील बल्बची संरचना सामान्य लोकांच्या प्रती अजिबात उत्तरदायी नाही. जोवर आम्ही पद्धतशीरपणे या मुद्दय़ाची सोडवणूक करत नाही आणि नवी प्रणाली स्वीकारत नाही तोवर काहीच होणार नाही. भलेही बल्ब बदला, परंतु भारत बदलणार नाही.

दुसरे राहुल : ते आरटीआयचा उपयोग करतील. यात हे माहीत करून घेतले जाईल की, बल्बने काम करणे का थांबवले? देशात आरटीआय खूपच सार्मथ्यवान आहे. त्यांच्याच पक्षाने त्याची कायद्याच्या रूपात अंमलबजावणी सुरू केली आहे. हा कायदा यासाठी करण्यात आला आहे की, प्रत्येक व्यक्तीला हे समजून घेता आले पाहिजे, बल्ब बदलण्यासाठी काय काय करावे लागते.

तिसरे राहुल : ते संपूर्ण भारताला बल्ब उत्पादनाचे ग्लोबल हब बनवतील, जेणेकरून जेव्हा केव्हा बल्ब बदलण्याची गरज भासेल तेव्हा संपूर्ण भारत त्यासाठी तयार असेल.

चौथे राहुल : काँग्रेसला अधिकाधिक युवकांसोबत जोडतील. त्यामुळे बल्ब ऑटोमॅटिकली बदलले जाऊ शकतील. देशातील बल्ब खूपच जुने झाले आहेत. गरज आहे ती युवकांना हे सगळे सांभाळू देण्याची. एकदा का देशातील युवक सक्षम झाले तर ते संपूर्ण यंत्रणा बदलून टाकतील. कारण सध्या जी व्यवस्था आहे, त्यात बल्बला प्रामाणिकपणे आणि लोकशाही मार्गाने तसेच पारदर्शकरीत्या लाइटच दिली जात नाही.

पाचवे राहुल : हे राहुल बल्ब बदलण्यासाठी महिला सक्षमीकरणावर भर देतील. अध्र्या लोकसंख्येच्या बळावर बल्ब बदलता येणार नाही. कारण मग त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. गरज आहे ती यंत्रणेत महिला शक्ती आणण्याची व त्यांना बल्ब बदलण्याची संधी देण्याची.

सहावे राहुल : बल्बच्या मुद्दय़ासंदर्भात जे काही फंडामेंटल प्रॉब्लेम्स असतील त्यावर हे राहुल राष्ट्रीय चर्चा करू पाहतील. एका सॉकेटसाठी बल्बची निवड कशी केली जाते, त्याच पद्धतीने बल्ब कोण निवडतो, बल्ब बदलणे हे काही पाच मिनिटांचे काम नाही. त्यात अतिशय एकाग्रतेची गरज असते आणि हे दीर्घकालीन योजनेसारखे आहे. असे केल्यावर लोक माझ्यावर (राहुल गांधी) हल्ले करतात. कारण ते मूळ मुद्दय़ाला व वस्तुस्थितीला धरून बोलत नाहीत. केवळ राहुल आहेत, जे ही यंत्रणा बदलू इच्छितात, जेणेकरून जे बल्ब काम करत नाही तेदेखील काम करू लागतील.

सातवे राहुल : हे राहुल वीज वितरणाच्या पद्धतीला बल्ब बदलण्याच्या पद्धतीसोबत बदलू पाहतील. त्यांचे म्हणणे असे की, बल्बमध्ये अधिक पॉवर असली पाहिजे. जसे की, भाजप एकाच बल्बमध्ये जास्तीत जास्त वीज केंद्रित करण्यावर विश्वास ठेवतो.

आठवे राहुल : या राहुलजींचे म्हणणे असे की, बल्बच्या मुद्दय़ांचे समाधान देशात पुरेशी वीज उपलब्ध करून देऊन केले जाऊ शकते. कोणत्याही देशाच्या तुलनेत देशात जास्त ऊर्जा आहे. भारतात कोट्यवधी युवकांची ताकद आहे. त्यांचे सार्मथ्य सर्वर्शुत आहे. जर आम्ही अशी प्रणाली आणू शकलो, जी त्यांच्यातील ऊर्जा समजून घेऊन ती योग्य प्रकारे कामात आणू शकलो, तर आपण बल्ब बदलू शकू. आपल्याला हे समजून येईल की, समस्या वीज किंवा बल्बमध्ये नाही. समस्या आमच्यात आहे. त्यासाठी बल्ब बदलण्याची नव्हे, तर स्वत:लाच बदलण्याची गरज आहे.

नववे राहुल - राहुल निश्चित करतील की, जो कुठला बल्ब भ्रष्टाचारामुळे काम करणे बंद करतो, त्याला दंड केला जाईल. भ्रष्ट बल्बला सॉकेटमधून काढायचे नाही किंवा त्याची वीज जोडणीही तोडायची नाही. त्याऐवजी वातावरणच असे तयार करू की, जो सर्वांसाठी सर्व दरवाजे उघडून देईल.

दहावे राहुल : दहाव्या राहुल गांधींना पॉवरमध्ये काहीच रस नाही. जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालले तर त्यांना ना विजेमध्ये इंटरेस्ट आहे ना बल्ब बदलण्यात. परंतु ते हे ओळखून आहेत की, निर्णय शेवटी त्यांनाच घ्यायचा आहे. त्यासाठी बल्ब बदलण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

- जी. संपत, लायव्हिंग डॉट कॉम.