आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा खैरनार यांना लस संशोधनासाठी कॅनडाचे निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशोधक बनल्यानंतरच मूलभूत बाबींशी खेळण्याची संधी मिळू शकते, हे बारावीत असतानाच कृष्णा खैरनार यांनी निश्चित केले होते. कोलकात्याच्या केंद्रीय विद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. वडील डॉक्टर होते आणि भागलपूरच्या दंगलीनंतर व्यवसायाला रामराम ठोकला आणि समाजसेवेत उतरले. आई केंद्रीय विद्यालयात प्राचार्य होत्या. घरातील पोषक वातावरणामुळे देशाचे नाव उज्ज्वल करण्याची भावना बालपणापासून वृद्धिंगत होत गेली.
आईची बदली झाल्याने नंतर ते नागपुरात राहायला आले. दरम्यान, कृष्णा यांनी वैद्यकीय शिक्षणाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली. तरीही बीएस्सी आणि एमएस्सी करण्याचाच निर्णय घेतला. घरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने तसेच संशोधनाची आवड असल्याने त्यांनी वैद्यकीय शिक्षणास नकार दिला. एमएस्सीसाठी त्यांनी नागपूर विद्यापीठातून सुवर्णपदक पटकावले. पुद्दुचेरीमधून मेडिकल मॉलिक्युलर बायोलॉजीत पीएचडी केली. दरम्यान, त्यांनी न्यूमोनियाच्या लसीबाबत मोलाचा शोध घेत शोधनिबंध तयार केले. कॅनडा सरकारने त्यांना ६ महिन्यांच्या संशोधनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, नंतर स्थायिक होण्याची विनंती केली आणि नागरिकत्वही प्रदान केले. कॅनडात तीन वर्षे राहिल्यानंतर त्यांना मायदेशासाठी काही न केल्याची खंत जाणवली आणि परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर "नीरी'त रुजू झाले. १२ व्या पंचवार्षिक योजनेत पारामुक्त प्लाझ्मा ट्यूबच्या संशोधनात सध्या योगदान देत आहेत.
जन्म- २४ फेब्रुवारी १९८०
वडील- डॉ. सुरेश, आई- इंदू
शिक्षण- पीएचडी
चर्चेत - आजारास कारणीभूत जिवाणू नष्ट करण्यायोग्य विषाणूंचा शोध लावला.