आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरेदीच्या हंगामातही मॅनहॅटनच्या रस्त्यांवर कडेकोट शुकशुकाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात महागड्या जागांपैकी एक म्हणजे मॅनहॅटन. या शहरातील फिफ्थ अॅव्हेन्यू येथे ट्रम्प टॉवर आहे. भावी सरकारमधील महत्त्वाच्या पदांच्या नियुक्त्यांसाठी इथे सतत बैठका सुरू आहेत. ब्लॅक फ्रायडेपासून संपूर्ण अमेरिकेत सुरू झालेला खरेदीचा उत्साह नाताळपर्यंत चालतो. मात्र या काळातही आंतरराष्ट्रीय ब्रँड्चे शोरूम असलेल्या फिफ्थ अॅव्हेन्यूमध्ये शांतता आहे. लांब लांब बंदुका हातात घेतलेले पोलिस सतत गस्त घालत असतात. अडथळे लावून येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडवून त्यांची तपासणी करण्याचे काम अहोरात्र सुरू अाहे. स्निफर डॉगची टीमही कार्यरत असते.
या इमारतीतील अनेक शोरूम्स मालकांना पोलिसांच्या कैदेत असल्यासारखे जाणवत आहे. एकाच वेळी अनेक ग्राहकांना शोरूममध्ये येण्याची परवानगी नाही. काहींच्या मते, सध्या तर बाजार बंद असल्याचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल जाहीर झाल्यानंतर आंदोलकांनी ट्रम्प टॉवरपर्यंत मोर्चा आणला होता. एवढंच नाही तर ट्रम्प टॉवरकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवरदेखील दूरदूरवर शांतता आणि कडक सुरक्षेचे वातावरण आहे. अजूनही अनेक आंदोलक इथवर येण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हातात फलक असतात. ही दृश्ये टिपणाऱ्या छायाचित्रकारांचीही गर्दी असते. पायी चालणाऱ्यांनाही रोखले जाते. कारण ट्रम्प यांचे घर आणि कार्यालयही याच इमारतीत असल्यामुळे येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ट्रम्प टॉवरमध्ये गुचीचे फ्लॅगशिप स्टोअर आहे, तर बाजूला टिफेनीचे स्टोअर आहे. त्यांचे स्कार्फ घातलेले कर्मचारी परिसरातील रस्त्यांवर फिरत ग्राहकांशी संवाद साधत असतात. स्टोअरपर्यंत पोहोचणाऱ्या ग्राहकांना सुरक्षेसंबंधीचे सर्व अडथळे पार करावे लागतात. बराक ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील अखेरचा महिना आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थित्यंतराच्या या काळात ट्रम्प टॉवर हे सत्तेचे केंद्र बनले आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरावर याचा परिणाम होणारच.
}ब्रुश शनायर , स्टाइल रिपोर्टर
बातम्या आणखी आहेत...