आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाजोगे जगण्याचे फक्त १४ हजार दिवस, जॅक सिम, सामाजिक कार्यकर्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९६० च्या दशकापर्यंत जॅक आणि त्यांच्या आईकडे काहीच नव्हते. आईने गावातील महिलांना एम्ब्रॉयडरीचा क्लास व वधू सजवण्याचे काम सुरू केले. जॅकही कमावता झाला आणि २४व्या वर्षी ते बांधकाम क्षेत्रात उतरले.
चाळिशीपर्यंत त्यांना या क्षेत्रात भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आयुष्यात पैसाच सर्वस्व नसल्याची जाणीव झाली. जर आपण ८० वर्षे जगलो तरी जगण्यासाठी अजून १४ हजार ६०० दिवस बाकी आहेत. जे काही करायचे आहे ते यातच करावे लागेल. तेव्हाच त्यांनी हा व्यवसाय सोडला आणि सामाजिक कार्याची वाट धरली. २००१ मध्ये स्वच्छताविषयक काम हाती घेतले. १९९८ मध्ये पहिल्यांदाच त्यांनी सिंगापूरमध्ये रेस्टरूम संघटना स्थापन केली. २००१ मध्ये जागतिक शौचालय संस्थेची स्थापना केली. त्याअंतर्गत जगभरात स्वच्छताविषयक दहा शिखर संमेलने भरवली. त्यांच्या स्वत:च्या अभ्यासानुसार जगभरातील ४० टक्के लोकांना शौचालयाची सुविधा नाही. सध्या ते जगभरातील ५८ देशांसाठी काम करत आहेत.
वय- सुमारे ५८ वर्षे
कुटुंब - आई, पत्नी, दोन मुले
शिक्षण - ली कुआन शाळेतून शालेय शिक्षण व स्ट्रेक्लाइड विद्यापीठातून इंटरनॅशनल मार्केटिंग पीजी डिप्लोमा
चर्चेत- काही राज्यांतील स्वच्छता मोहिमेत सहभाग