आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्कर : ओबामांनी परत केलेल्या प्राचीन मूर्ती सुभाषने चोरल्या होत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष कपूर, आर्ट डीलर
वय : ६७
कुटुंबीय- : पत्नीला घटस्फोट, बहीण सुषमा सरीन, मुलगी ममता सागर
चर्चेत का- याने चोरलेल्या ६६० कोटी रु. च्या मूर्ती ओबामा प्रशासनाने पंतप्रधान मोदींना परत केल्या.
सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांत मूर्तींची चोरी करून त्या परदेशात मोठी किंमत घेऊन विकत असल्याचे दाखवण्यात आले होते. सुभाष कपूर हा असाच एक चोर. १९७४ मध्ये तो अमेरिकेत स्थायिक झाला. तेथे त्याची बहीण सुषमा सरीन निंबस एक्स्पोर्ट््स-इम्पोर्ट््सच्या नावाने दुर्मिळ वस्तू विकण्याचा व्यवसाय करत होती. सुभाषनेही बहिणीसोबत अमेरिकेच्या मॅनहॅटन या सर्वात महागड्या भागात या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. ‘आर्ट फ्रॉम द पास्ट’त्याला नाव दिले. त्यात तिसऱ्या शतकापासून ते आधुनिक भारतातील अनेक कलाकृती होत्या. दक्षिण आशियासह संपूर्ण जगातील कलाकृती आणल्या होत्या. सुभाष भारतात येत असे तेव्हा तो दरवेळी दक्षिणेत जात असे. गांधार, चोल आणि विजयनगर काळातील मूर्तींना मोठी मागणी होती. २००७ पर्यंत कोणालाही त्याची माहिती नव्हती.

सुभाष कपूरने मार्बल फर्निचरच्या नावावर काही दुर्मिळ मूर्ती अमेरिकेला पाठवल्याची माहिती २००७ मध्ये मुंबई पोलिसांना कळली. ही माहिती अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीला देण्यात आली. पण तुझ्या वस्तूंवर नजर ठेवली जात आहे, असे कोणीतरी सुभाषला सांगितले. अमेरिकी होमलँड सिक्युरिटीने त्या पकडल्या तेव्हा त्या आपल्या असल्याचा सुभाषने इन्कार केला. त्यानंतर सुभाष गायब झाला, होमलँड सिक्युरिटीने २००९ मध्ये सुभाषचा सहायक अॅरोन फ्रीडमॅनच्या कक्षात गुप्त मायक्रोफोन लावला आणि चर्चा ऐकणे सुरू केले.

इकडे योगायोगाने भारतात २००९ मध्ये तामिळनाडू पोलिसांनी मंदिरांतील चोरीच्या प्रकरणांची चौकशी सुरू केली. अरियालूर जिल्ह्यात अशा अनेक चोऱ्या होत होत्या. दोन चोर पकडले, त्यांना २ ते ३ लाख रु. दिले होते. चेन्नईचा आर्ट डीलर संजीवी अशोकन याने ही रक्कम दिल्याचे या चोरांनी सांगितले. अशोकनला केरळच्या एका हॉटेलमध्ये पकडले तेव्हा त्याने मास्टर माइंड सुभाष कपूरचे नाव सांगितले. सुभाष येथे आला होता आणि त्याने या मूर्ती पाठवण्यास सांगितले होते. तो सुभाषला चोल साम्राज्यातील मूर्ती पाठवत असे.

अरियालूर जिल्ह्यात नटराज मूर्ती चोरणारा आणखी एक चोर पकडला गेला. पोलिसांनी चोर तर पकडला, पण मूर्ती मिळाली नाही. पण तीच मूर्ती अमेरिकेत सुभाष कपूरच्या कॅटलॉगमध्ये दिसली. पोलिसांनी २०११ मध्ये सिंगापूरमध्ये राहणाऱ्या परमसपरी पुनुसामीशी संपर्क केला. ती एकेकाळी सुभाषची गर्लफ्रेंड होती. ही ५६ वर्षीय महिला जस्मीन एशियन आर्ट या नावाने चेन्नईत गॅलरी चालवत होती. पुनुसामी आणि सुभाष यांच्यात वाटणीवरून भांडण झाले आणि २००९ मध्ये दोघे वेगळे झाले. गोरखपूरमध्ये जन्मलेल्या सुभाषची पत्नी जालंधरची होती, तिला घटस्फोट दिला होता. न्यूयॉर्कच्या एका आर्ट गॅलरीत त्याची पुनुसामीशी भेट झाली. दोघांत १० वर्षे संबंध होते. पुनुसामीने सुभाषचे जुने छायाचित्र पोलिसांना दाखवले. लोकेशन सांगितले तेव्हा इंटरपोल रेड कॉर्नर अलर्ट जारी झाला आणि २०११ मध्ये कपूरला फ्रँकफर्ट विमानतळावर अटक झाली. तेव्हापासून तो चेन्नई तुरुंगात आहे.
पुढे वाचा... क्रौर्याची परिसीमा, ४० हजार विरोधकांना हाल हाल करून मारले
बातम्या आणखी आहेत...