आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य - दोन कोटींवर अमेरिकी करतात योगसाधना, मानवी शरीर आणि मेंदूला फायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत योगविद्येची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. हॉलीवूड तारका, नॅशनल फुटबॉल लीगच्या खेळाडूंपासून सामान्य लोकांपर्यंत शारीरिक फिटनेस आणि तणावमुक्तीसाठी योगाचा आधार घेत आहेत. विशेषत: मजबूत मांसपेशी घडवण्यासाठी, शारीरिक संतुलन ठेवण्यासाठी आणि लवचिकतेसाठी पुरुष योग करतात. इक्विनॉक्स कंपनीची प्युअर योगा चेनचे व्यवस्थापक जेन ज्वेईबेल सांगतात, गेल्या वर्षापासून आमच्या वर्गांमध्ये पुरुषांची संख्या वाढली आहे. अनेक वर्गांमध्ये तर एक तृतीयांश पुरुष येतात.
२०१२ च्या एका सर्वेक्षणानुसार योग करणा-या दोन कोटींहून अधिक अमेरिकनांमध्ये १८ टक्के पुरुष आहेत. अनेक शास्त्रीय संशोधनांतून पुढे आले की योगामुळे शरीर स्वस्थ राहते. मानसिक तणाव दूर होतात. त्यातून पुरुषांना इतरदेखील काही फायदे आहेत. योग करणा-या अमेरिकन नागरिकांवर झालेल्या एका अध्ययनानुसार, यामुळे आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये सुधारणा झाली आहे. शरीर प्रफुल्लित राहते, गाढ झोप लागते. तसेच प्रतिकारशक्तीतही मोठी वाढ झाली
आहे.

योगासनातून फिटनेस
चांगली शरीरयष्टी - एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, योग करणा-या पुरुषांची शरीरयष्टी जिममध्ये जाणा-या लोकांपेक्षाही चांगली राहते. सेक्शुअल मेडिसिन स्टडी जर्नल सांगते, योगाने सेक्स लाइफ सुधारते.

मानसिक शांती - व्हिएतनाम युद्धात भाग घेणा-या अमेरिकन सैनिकांना योगाच्या माध्यमातून युद्धाच्या भीतिदायक आठवणींना तोंड देणे शक्य झाले. एका अभ्यासानुसार केवळ सहा आठवडे योग केल्याने तणाव कमी झाला.

मन:शांती - जर्नल एजच्या एका अध्ययनानुसार रोज योग करण्याने वृद्धांमध्ये रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी होतो. हृदयविकाराचा धोका टळू शकतो.

स्मरणशक्तीत सुधारणा - रणभूमीवर तैनात सैनिकांवरील संशोधन सांगते, योगाने मानसिक थवा दूर होतो. तणाव, चिंता आणि ढिलेपणा कमी होतो. स्मरणशक्ती सुधारते.

शारीरिक संतुलन
शरीर पडण्यापासून आणि लागण्यापासून वाचवण्यासाठी पुरेशा संतुलन हवे असते. इंटरनॅशनल योग जर्नलमध्ये प्रकाशित २०१४ च्या अभ्यासानुसार, नियमित योग केल्याने शारीरिक संतुलन व्यवस्थित राहते.

गाढ झोप - क्लिनिकल, डायग्नॉस्टिक रिसर्च जर्नलच्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे, अनिद्राग्रस्त ४० पुरुषांना आठ आठवडे योग केल्याने आराम वाटला. त्यांचा तणाव घटला. आत्मविश्वास वाढला.