आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझे अाराेग्यच कुटुंबाचे अाराेग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरंतर सगळं घर गृहिणीभाेवती फिरत असतं. ती थाेडीजरी अाजारी पडली तरी घर अाजारी पडल्यासारखं वाटत असतं. म्हणूनच तिचं अाराेग्यच घराचं अाराेग्य असतं. तिचं अाराेग्य उत्तम असलं तर घराचेही म्हणजेच घरातील सगळ्यांचेच अाराेग्य उत्तम राहते. फक्त तिने अाराेग्याच्या काही बारीक-सारीक गाेष्टींकडे लक्ष देण्याची गरज अाहे. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने अशाच गाेष्टींवर टाकलेला हा मार्गदर्शनपर प्रकाश...
 
अाज देशातील महिलांचे अाराेग्य ही चिंतेची अाणि चिंतनाची बाब बनली अाहे. महिलांचा विकास हाेत असताना म्हणजेच तिच्या बालपणापासून तिच्या शारीरिक अाणि मानसिक अाराेग्याची जपणूक हाेणे अतिशय अावश्यक अाहे. बालपणी मिळणारा याेग्य ताे पाेषक अाहार या महिलेचे पुढील अायुष्य अाणि अाराेग्यही ठरवत असताे. अाज जी कुपाेषणाची समस्या संपूर्ण देशाला भेडसावते अाहे. त्यामधूनही महिलांची सुटका झालेली नाही. अगदी गर्भिणी अवस्थेतील महिलेचेच उदाहरण घेतले तरी गर्भारपणी तिचे हाेणारे पाेषण हे याेग्य तेवढेच हाेताना दिसत नाही. विशेषत: ग्रामीण अाणि वनवासी क्षेत्रातील सुईणींकडून बाळंतपणे घरच्याघरी हाेतात. तिथे त्या महिलांना काेणतेही डाॅक्टरी साहाय्य उपलब्ध हाेत नाही, असे संख्याशास्त्र सांगते. अापल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी ही स्थिती किती दुर्दैवी अाहे हे अापल्या सहज लक्षात येईल. स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले असल्याने गर्भलिंग चाचणीवरही प्रतिबंध अाणावा लागला. तरीही हे सर्व थांबले अाहे का? हा खरा प्रश्न अाहे. गर्भाचे नीट पाेषण झाले नाही तर जन्माला येणारी बालिकाही कमी वजनाची अाणि कुपाेषित अशीच जन्माला येणार,. तिची अाईदेखील कुपाेषित असली तर त्या मातेचे दूध नवजात बालिकेला नीट मिळत नाही. मग या बालिकेची 

पूर्ण वाढ कशी हाेणार? तिच्या शरीराची प्रतिकारशक्ती कशी विकसित हाेणार? गर्भाचे नीट पाेषण न हाेणे, पुढे मातेचे दूध याेग्य तेवढे न मिळणे, बालिका थाेडी माेठी झाली की, तिच्या शरीराच्या वाढीला अावश्यक असणारा याेग्य तेवढा अाहार न मिळणे, यामुळे बालपणी ती बालिका खुरटलेली राहते. मग तारुण्यावस्थेत पदार्पण केल्यावर तिच्यात काय सुधारणा दिसणार?
तरुण मुलींचे अाराेग्य हा तर खूपच चिंतेचा विषय अाहे. ग्रामीण अाणि शहरी अशा दाेन्ही युवतींच्या अाराेग्यात बिघाड हाेण्याची कारणे वेगवेगळी अाहे. शहरी भागात बऱ्याचदा याेग्य तेवढा पाेषक अाहार उपलब्ध असूनही डाएटिंगच्या फॅडपायी शक्य असूनही चांगले तूप किंवा दूध यापासून स्वत:ला वंचित ठेवणाऱ्या मुलींची संख्या पार माेठी अाहे. काही काळापूर्वी एका विद्यापीठाने त्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील मुलींच्या रक्ताचे परीक्षण केले हाेते. या परीक्षणात ६५ ते ७० टक्के मुलींमध्ये त्यांच्या रक्तातील हिमाेग्लाेबिनचे प्रमाण कमी असल्याचे अाढळले, तसेच त्या मुलींचे वजनही अपेक्षेपेक्षा कमी हाेते. शहरी भागातील तरुण मुलींचा ही स्थिती असेल तर ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र कसे दिसेल? तिथे तर पाेषणाबद्दल एकूणच अानंदीअानंद अाहे. दारिद्र्यामुळे दाेन वेळचे पूर्ण जेवण मिळणे अनेकांना दुरापास्त अाहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महिलांच्या अाराेग्याविषयी चिंतन करणे अावश्यक बनले अाहे. 

महिलांमध्ये हाेणाऱ्या स्तनाच्या अाणि गर्भाशयाच्या कॅन्सरचेही प्रमाण वाढत चालले अाहे. मासिक पाळीसंदर्भात याेग्य प्रबाेधन नसल्याने त्या काळात याेग्य काळजी घेतली जात नाही. पाळी लांबविण्यासाठी अनेकदा कृत्रिम गाेळ्या घेतल्या जातात. या अाणि इतर अनेक कारणांमुळे महिलांच्या अाराेग्यविषयक तक्रारी वाढलेल्या अाहेत. त्यावर प्रतिबंधात्मक अाणि प्रतिकारात्मक अशा दाेन्ही पद्धतींच्या उपाययाेजनांची गरज अाहे. 

हे सर्व थांंबवायचे असेल तर महिलांमध्ये फार माेठ्या प्रमाणावर त्यांच्या अाराेग्याविषयी जागृती व्हावी लागले. गृहिणीचे अाराेग्य उत्तम असेल तर ती इतरांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकते. पण, तीच काही समस्यांनी बेजार झाली तर संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ हाेते. हा सर्वांचाच अनुभव अाहे. महिलांची मानसिकता बऱ्याचदा राेग अंगावर काढण्याची असते. ताे बळावला तरच त्या वैद्यकीय सल्ला घेण्यास तयार हाेतात. त्याही दृष्टीने त्यांचे प्रबाेधन हाेणे गरजेचे अाहे. गर्भिणी अवस्थेतही महिलेचे उत्तम पाेषण हाेण्यासाठी ग्रामीण भागात अंगणवाड्यांतून मिळणारा अाहार विशेषत: गायीच्या तुपाने युक्त असावा. ताे ठरवताना भारतीय अाहारशास्त्राचे सिद्धांतच विचारात घ्यावे लागतील. 

अापले सरकार गेली ५० वर्षे महिलांमध्ये लाेहाच्या अाणि कॅल्शियमच्या गाेळ्या वाटत अाहे. पण, त्याचा काहीही उपयाेग झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मुळात महिलेचा 
असणारा अाहार अाणि विहार या संदर्भात सर्व स्तरावर तिचे प्रबाेधन हाेणे गरजेचे अाहे. सरकारलाही भारतीय अाहारशास्त्राचे सिद्धांत विचारत घ्यावे लागतील. त्यानुसार अंगणवाड्यांमधून याेग्य अाहार पुरवावा लागेल. 
 
याकडे महिलांनी द्यावे लक्ष
महिलांनी उपवास कमीतकमी करावेत. याेग्य तेवढा व्यायाम, याेगासने करावी. 
शतावरी,  ज्येष्ठमध, चंदन, भुईकाेहळा, काेरफड, अावळा अशा काही वनाैषधी महिलांनी नेहमी बाळगाव्यात अाणि त्यांचा याेग्य ताे उपयाेगही करावा. या वनाैषधी सहज उपलब्ध हाेणाऱ्या 
अशा अाहेत. 

खजूर, अंजीर,  केळी, द्राक्षे अशा काही फळांचा उपयाेग त्यांनी जेवणात ठेवावा. 
भात, मुगाचे वरण, फुलका, ज्वारी-बाजरीची भाकरी याचे सेवन करावे. 
अाराेग्यात काही बिघाड झाल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. अायुर्वेद या भारतीय वैद्यकाने सांगितलेली गर्भिणी परिचर्या या अवस्थेत अवश्य पाळावी म्हणजे पुढील समस्या टाळता येऊ शकतात. 

ग्रामीण भागातही गायीच्या दुधाचे, तुपाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज अाहे. महिलांमध्ये स्थूलतेचेही प्रमाण चिंताजनक अाहे. 
 
केसांच्या अाणि त्वचेच्या समस्यांनीही त्यांना ग्रासलेले असते. अशावेळी विशेषत: शहरी भागातील महिला कृत्रिम साैदर्यप्रसाधनांचा अतिवापर करतानाही दिसतात. त्यापासून त्यांना दूर ठेवणे अावश्यक अाहे. 
बातम्या आणखी आहेत...