आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"याेगा'मुळे मुले मानसिकदृष्ट्या मजबूत हाेतात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग मुलांच्या शारीरिक अाणि मानसिक विकासासाठी चांगलेच फायदेशीर अाहे. मुले राेज काेणत्या ना काेणत्या दबावात वावरत असतात. खेळ त्यांचा तणाव दूर करण्यासाठी चांगला पर्याय अाहे. परंतु याेग त्यांना फक्त शांतीच देत नाही तर तणावपूर्ण वातावरणात कसा व्यवहार करावा, हेही शिकवते. काेणत्याही गटाच्या मुलांसाठी याेग फायदेशीरच अाहे.

कोलंबिया विद्यापीठाने सहा अाठवड्यांचा कार्यक्रम तयार केला. त्यात याेगाचा समावेश केला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९० टक्के मुलांची शैक्षणिक प्रगतीत चांगलीच सुधारणा झाल्याचे दिसून अाले. याेगामुळे शरीरात डाेपामाइन नावाचे केमिकल तयार हाेते. या केमिकलमुळे एकाग्रता कमालीची वाढल्याचे संशाेधनात सिद्ध झाले अाहे. २०१२मध्ये अमेिरकेतील ‘जर्नल ऑफ ऑक्युपेशनल थेरेपी’मध्ये म्हटले अाहे की, ऑटिस्टिक मुलांमध्ये सुधारणा हाेते. फक्त अाई-वडीलच नव्हे तर याेगा करणाऱ्या मुलांनाही अापल्यातील बदल जाणवताे.

योगामुळे शरीर मजबूत हाेते- उभे राहून, बसून अाणि झाेपून याेगा करावा लागत असल्यामुळे शरीरातील स्नायू कार्यरत हाेतात.

ज्यांना श्वासासंदर्भातील याेगासने शिकवली जातात, ती मुले मानसिकदृष्ट्या चांगलीच संतुलित हाेत असल्याचे दिसून अाले अाहे.

काही अासन अाणि त्यांचे फायदे दिले अाहेत. ...
भुजंगासन- मुले अनेक तास बसलेली असतात. हे अासन त्यांच्या पाठीसाठी फायदेशीर ठरेल.
धनुरासन- हे आसन आत्मविश्वास ,एकाग्रता वाढवण्यासाठी उपयाेगी अाहे.
अधोमुखा स्वानासन- या अासनामुळे शरीर लवचिक हाेते, ऊर्जेचा स्तरही उचांवताे.
वृक्षासन- यामुळे मुलांमध्ये संतुलन अाणि चपळता येते.
ताडासन- उंची वाढणे अाणि माकड हाड सरळ हाेते.
सुखासन- या अासनामुळे मुले सरळ बसणे अाणि मेडिटेशन शिकतात.
वीरभद्रासन- यामुळे खांदे लवचिक हाेतात.
शवासन- तणाव दूर करून मुलांना रिलॅक्स करण्यासाठी हे अासन फायदेशीर अाहे.