आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीच्या योजना चौथ्यांदा सत्ता देतील!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस खरोखर मागे होती. ती चूक विधानसभेला होणार नाही. विधानसभेसाठी आम्ही प्रचाराची चांगली यंत्रणा उभी केली आहे. राज्य सरकारच्या सर्वत्र झळकलेल्या जाहिराती त्याची चुणूक आहे. आमचा प्रचार सकारात्मक असेल. पाच वर्षांतील राज्य सरकारचे काम आम्ही सांगूच, पण भाजप-सेना आघाडीच्या केंद्रातल्या मोदी सरकारचा फोलपणाही उघड करणार आहोत.

मुंबईला शांघाय बनवण्याचा काँग्रेसचा पहिला टप्पा आता यशस्वी झाला आहे. वरळी-वांद्रे सी लिंक, इस्टर्न फ्री वे, मेट्रो, मोनो आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आदी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागासाठी ब्लड ऑन कॉल, छोटे बंधारे, राजीव गांधी जीवनदायी योजना, सावकार विरोधी कायदा, गारपीट नुकसान भरपाई आदी महत्त्वपूर्ण निर्णय आघाडी सरकारने घेतले. आमची ही सारी लोकोपयोगी कामे आम्ही मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत.

आदर्श प्रकरण सोडले तर आघाडीच्या सरकारवर कोणताही गंभीर आरोप नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा आमची जमेची बाजू आहे. राज्याच्या सहाही विभागातील प्रचाराचा काँग्रेसचा आराखडा तयार आहे. यावेळी कार्यकर्त्यांना आम्ही प्रशिक्षण दिले आहे. काँग्रेसने नुकत्याच दोन पुस्तिकाही प्रकाशित केल्या आहेत. सोशल नेटवर्किंगवरच्या प्रचारातही काँग्रेस कमी पडणार नाही. प्रचारासाठी काँग्रेसच्यासुद्धा वॉर रूम असतील.

काँग्रेस विधानसभेला आक्रमकपणे प्रचार करेल, पण आम्ही विरोधकांवर व्यक्तिगत टीका करणार नाही. लोकसभा निकालांचा प्रभाव विधानसभा नविडणुकांवर नसेल. तसा प्रभाव आजपर्यंत कधीही दिसलेला नाही. त्यामुळे तथाकथित महायुतीवाल्यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये. "एमआयएम'ची राज्यात डाळ शिजेल असे वाटत नाही. त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन होईल याची काँग्रेसला अजिबात भीती नाही.

दलित मतदार आता पूर्वीप्रमाणे एकगठ्ठा राहिलेला नाही. त्यांच्यात ३६० छोटे-मोठे गट आहेत. त्यातला प्रा. जोगेंद्र कवाडे गट आमच्याबरोबर आहेच. आज जातीची गणिते पूर्वीइतकी प्रभावी नाहीत. लोकसभा नविडणुकीने तर ते दाखवून दिले आहे. तसे पाहिले तर दलित मतदार मुख्यत्वे आजही काँग्रेसमागे आहे.

ितसऱ्या मोर्च्याच्या नावाने राज्यात सध्या तीन आघाड्या उभ्या राहिल्या आहेत. त्या तिन्ही एकत्र आल्या तरी त्यांचा राज्यात तिसरा पर्याय उभा राहू शकत नाही. कारण शेकाप सोडला तर त्यात एकही राजकीय पक्ष नाही. राज्यात डाव्यांचे अस्तित्व नावापुरते आहे. नविडणुकांच्या राजकारणात राज्यात डावे आहेतच कुठे? त्यामुळे या तथाकथित ितसऱ्या मोर्चाला काँग्रेस जराही भीक घालणार नाही. मुळात राज्यातील जनतेला असा तिसरा पर्यायच मान्य नाही. त्यामुळे विधानसभेची लढत दुरंगीच असेल.

या निडणुकीत मोदी सरकारवर आम्ही नेम धरणार आहोत. त्याला काही कारणेही आहेत. मोदी सरकारने लोकसभेला जो विषारी प्रचार केला. त्यातील फोलपणा आम्ही या नविडणुकीच्या प्रचारात उघड करणार आहोत. चिनी सैन्य सीमारेषेच्या आत येते. तरी मोदी सरकार झोपलेले. पाकिस्तानचे राजदूत काश्मिरी फुटीरवाद्यांशी चर्चा करतात. तरी केंद्र सरकार झोपलेले. राज्यपालासारख्या घटनात्मक पदांना पायदळी तुडवतात, हे सारे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. भाजपची काही राज्यांत सत्ता आहे. तेथील कारभाराचे दाखले आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. गुजरातच्या बोकाडिया या भाजपच्या मंत्र्यास तीन वर्षे शिक्षा झाली. तरीही हा माणूस मंत्रिपदी कायम आहे. राजस्थानमधील भाजपच्या मंत्र्यावर महिलेशी गैरवर्तनाचा आरोप आहे. तो मंत्री फरारी असल्याने सापडत नाही म्हणे! मध्य प्रदेशात राज्यसेवा परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होतो. गोव्यातील भाजपचे मंत्री शैक्षणिक सहलीच्या नावाखाली ब्राझीलमध्ये ऐष करतात. हीच का भाजपशासित राज्यातील विकासाची मॉडेल्स?

राहुल गांधी यांना विधानसभा प्रचारापासून दूर ठेवणार, हा विरोधकांनी चालवलेला प्रचार आहे. मुळात आमचे केंद्रीय नेतृत्व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला नसते. काँग्रेसची ही इंदिरा गांधी यांच्यापासूनची परंपरा आहे. मागच्या वेळी आघाडीच्या प्रचाराला पंतप्रधान मनमोहनसिंग यांची एकही प्रचारसभा झाली नव्हती. मुंबईत त्यांची एक पत्रकार परिषद झाली होती. त्यामुळे राहुल गांधी यांना विधानसभा प्रचारापासून दूर ठेवण्याचा मुद्दा येतोच कुठे?

मोदी सरकार सत्तेवर येताच जमातवादी संघटनांनी डोके वर काढले आहे. राज्यात सेना-भाजपचे सरकार आल्यास त्यांना अिधकच चेव येईल. त्यामुळे जनता असा खुळेपणा करणार नाही. आजचा मतदार अिधक शहाणा, सजग आहे. राज्यातल्या मागच्या पंधरा वर्षांतल्या विकासाची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे विधानसभेची नविडणूक टफ असली तरी आघाडी सरकार चौथ्यांदा सत्तेवर येणार, असा आम्हाला विश्वास आहे.

शून्यातून अनेकदा उभे राहिलो
मोदीच्या शंभर दिवसांची जनतेला चांगलीच प्रचिती आली आहे. कांदा निर्यातीवर निर्बंध लादले. पत्रकारांना परदेशी दौऱ्यावर नेण्याची प्रथा बंद पाडली. मुख्यमंत्र्यांचे जाहीर सभेत अपमान झाले. राज्यपालांचा अवमान करण्यात आला. न्यायाधीशांच्या नेमणुकीत मनमानी झाली. नियोजन आयोगावर टाच आणली. विजेचे राजकारण केले गेले. राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. इतके सारे केवळ शंभर दिवसांत पाहायला िमळाले. त्यामुळे विधानसभेला मोदी वगैरेंची लाटबीट असण्याची शक्यताच नाही. विधानसभेला काँग्रेस निश्चिंत आहे, पण गाफील मात्र नाही. काँग्रेसने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. जे म्हणतात काँग्रेसचे राज्यातले शेवटचे इलेक्शन आहे, त्यांना विधानसभा निकालानंतर कळेल. शून्यातून आम्ही अनेकदा उभे राहिलो आहोत. त्यामुळे लोकसभा नविडणुकीच्या पराभवातून काँग्रेस केव्हाच बाहेर आली आहे. आघाडी शासनाच्या लोकोपयोगी योजना चौथ्यांदा आघाडीच्या हाती सत्ता देतील यात ब‍िलकुल शंका नाही.