आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॅजिक मशीनमध्ये जगात बरेच काही बदलण्याची क्षमता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वांटम कम्प्युटिंग तंत्र 21 व्या शतकाचे चमत्कारिक संशोधन सिद्ध होऊ शकते. यावर आधारित डीवेव्ह कॉम्प्युटर परंपरागत कॉम्प्युटरच्या तुलनेत कित्येक पट वेगवान आहे. अर्थात अनेक तज्ज्ञ त्याच्या क्षमतेवर शंका घेतात.
वर्षानुवर्ष खगोलतज्ज्ञ विश्वास ठेवत आहेत की, ब्रह्मांडात सर्वात थंड ठिकाण पृथ्वीपासून पाच हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याचे नाव आहे बूमरँग नेब्युला. या प्रचंड आकाराच्या वायुगोलाचे तापमान उणे 272 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. परंतु ही वस्तुस्थिती नाही. ब्रह्मांडात सर्वात थंड ठिकाण व्हँक्युअरच्या पूर्वेला असलेले लहानसे शहर बर्नाबी आहे. बर्नाबीमध्ये संगणक फर्म डी व्हेव्हचे मुख्यालय आहे. त्याचे फ्लॅगशीप प्रॉडक्ट डी वेव्ह दोन संगणक आहे. हे दहा फूट उंच ब्लॅक बॉक्स आहे. आत निओबियम संगणक चिप लावलेले एक कूलिंग अ‍ॅपरेटसचे तापमान उणे 274 अंश सेल्सिअस आहे.
डी वेव्ह दोन एक अस्वाभाविक संगणक आहे आणि डी वेव्ह कंपनीदेखील अशीच आहे. त्यात फक्त 114 कर्मचारी आहेत. ती सिलिकॉन व्हॅलीच्या बाहेर आहे, मात्र कंपनीच गुंतवणूक करणा-यांमध्ये स्टाइप टेस्ला मोटर्सची गुंतवणूकदार व्हेंचर कॅपिटल फर्म ड्रेपर फिशर झुर्वेटसनदेखील सामील आहे. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस आणि अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएची हायटेक गुंतवणूक शाखा अन-क्यू टेल याच्यासोबत आहे.
कंपनीचे ठरावीक कस्टमर्स आहेत. डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर लॉकहीड मार्टिन, नासा, गुगलच्या मदतीने चालणारी संगणक लॅब तसेच एक अमेरिकन गुप्तहेर संस्थेचा समावेश त्यांच्यात आहे. डी वेव्हचे अधिकारी एजन्सीचे नाव
सांगत नाहीत.
डी वेव्हने नवीन प्रकारचा क्वांटम संगणक बनवले आहे. सध्या असे केवळ पाच संगणक आहेत. हे इतके विचित्र आहे की, याचा कसा उपयोग करावा हे अजून लोकांना माहीत नाही. क्वांटमची कम्प्युटिंग शक्ती असाधारण आहे. त्यात अशा समस्या सोडवण्याचे उपाय आहेत की, ज्यांच्यावर पारंपरिक संगणक कित्येक वर्षे शोधू शकत नाहीत. क्रिप्टोग्राफी, नॅनो-टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिल्स ते आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे अनेक क्षेत्रांत क्रांतिकारी निर्णय देऊ शकतो. अनेक टीकाकारांचा विचार आहे की, डी वेव्हच्या मशिन्स क्वांटम संगणक मुळीच नाहीत. मात्र, डी वेव्हच्या ग्राहकांनी ते एक कोटी डॉलरमध्ये विकत घेतले आहे. ते पूर्णपणे सिद्ध झाले तर मायक्रोप्रोसेसरच्या शोधानंतर सर्वात उंच भरारी असेल.
डी वेव्ह दोन संगणकांच्या निओबियम चिपमध्ये 512 क्युबिट (कोष्टक पाहा) असतात. त्यामुळे सिद्धांतानुसार पाहिल्यास ते एकाच वेळी 2512 ऑपरेशन्स करू शकते. त्याला अनेक पट केल्यावर ब्रह्मांडात असलेल्या अणुंपेक्षा
जास्त गणती होईल. डी वेव्हचे बिझनेस डायरेक्टर कोलिन विल्यम्स सांगतात, आमच्या मशीनसारखी क्षमता सुपर कम्प्युटरमध्ये नाही. अनेक जण असे संगणक घेऊ इच्छितात. हा अगाध माहिती आणि डेटाचा काळ आहे.
संगणक सर्च, जीनोम्स, क्रेडिट कार्डने खरेदी, रिटेल ट्रान्झॅक्शन, सोशल मीडिया, फोन रेकॉर्ड, भौगोलिक सर्वेक्षण, हवामानाची माहिती, वॉच व्हिडिओ, चित्रपटांसारख्या गोष्टींसाठी डेटाची गरज पडते. डी वेव्हने या तथ्याला लक्षात घेतले आहे. एडवर्ड स्नोडनद्वारे जारी एका दस्तऐवजमध्ये सांगण्यात आले की, अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था 8 कोटी डॉलरचे क्वांटम कम्प्युटिंग प्रकल्पावर काम करत आहे. त्याचे सांकेतिक नाव पेनिट्रेटिंग हार्ड टार्गेट्स आहे.
क्वांटम कम्प्युटिंग सिद्धांत स्पष्ट आहे, मात्र ते व्यवहारात आणणे अवघड आहे. क्वांटम कम्प्युटिंग बनवणे सोपे नाही. अनेक तांत्रिक अडचणी येतात. क्वांटम कॉम्प्युटर पूर्णपणे प्रभावी होण्यासाठी क्युबिट्सला सुपर-पोझिशन
आणि एंटॅन्गलमेंट (दोन अथवा कण किंवा एकमेकांना जोडणे) या स्थितीत होणे गरजेचे असते. डी वेव्हने अशी स्थिती प्राप्त केल्याचा दावा केला आहे.
काय आहे क्वांटम कम्प्युटिंग
विसाव्या शतकातील दोन महत्त्वपूर्ण गोष्टी क्वांटम फिजिक्स आणि डिजिटल कम्प्युटिंग एकत्र येऊन क्वांटम कम्प्युटिंगचा जन्म झाला. सामान्य किंवा क्लासिकल फिजिक्समधील उणिवांनी क्वांटम फिजिक्ससाठी स्थान निर्माण केले आहे. सामान्य संगणक तुकड्यांच्या (बिट्स) च्या रूपात माहितीवर काम करतात. प्रत्येक बिट कोणत्याही वेळी 1 किंवा 0 होऊ शकते. बिट्सची मोठी संख्या डिजिटल कम्प्युटिंगचा आधार आहे. त्यामुळे परंपरागत संगणकाला प्रश्न विचारल्यास त्याला उत्तर देण्यासाठी व्यवस्थित आणि सोप्या पद्धत अवलंबावी लागेल. क्वांटम नियमानुसार काम करणा-या संगणकाचे बिट्स 1 किंवा 0 होतील आणि त्याच वेळी 1 आणि 0 होतील. क्वांटम बिट एकाच वेळी दोन वेगवेगळ्या अवस्थेत क ाम करतात. एकात ते 1 असते आणि दुस-यात 0 असते.
एक क्वांटम बिट (क्यूबिट) एका वेळी दुप्पट भाग करू शकते. दोन क्युबिट एका वेळी चार पट होऊ शकते.
क्वांटम संगणकाचे फायदे
सुरक्षित डिझाइन- क्वांटमने जेट विमानांच्या सॉफ्टवेअरचे परीक्षण करण्याची लॉकहीड मार्टिनची योजना आहे. परंपरागत संगणकांसाठी ही अत्यंत अवघड काम आहे. यातून सुरक्षित विमान डिझाइन केले जाऊ शकतील.
दूरवर नजर- क्वांटम संगणक टेलिस्कोपद्वारा एकत्र अमर्याद डेटाचे विश्लेषण करू शकेल. नव्या ग्रहांचा शोध आणि अंतराळीतल गूढ बाबींचा मार्ग दिसेल. हवामानासंबंधी अधिक सूक्ष्म भविष्य सांगता येईल.
निवडणुकीत मदत- उमेदवार आणि पक्षांना जुने निवडणूक निकाल आणि इतर माहितीच्या विश्लेषणातून मतदाराची आवड निवड कळायला मदत होईल. सध्या फारसे खोलवर विश्लेषण होऊ शकत नाही.
कर्करोगावर लवकरच संशोधन- कम्प्युटेशन मॉडेलद्वारे कळू शकेल की, कर्करोग शरीरात कसा पसरतो. याच्यामुळे आजाराचे कारण लवकर कळू शकेल.
प्रभावी औषधे- डीएनए डेटाचे विश्लेषण आणि अमिनो अ‍ॅसिडच्या मॅपिंगने डॉक्टरांना अधिक परिणामकारक औषधे शोधू शकतील.
7 वर्षांची वाटचाल
० डी वेव्हचे संस्थापक 42 वर्षीय कॅनडाचे नागरिक ज्यार्डी रोज आहेत. त्यांनी चार हजार डॉलरच्या भांडवलातून 1999 मध्ये कंपनी सुरू केली होती.
० 2007 मध्ये डी वेव्हने 16 क्युबिटचे
अ‍ॅडियाबेटिक संगणक सादर केले. 2011 मध्ये 128 क्युबिटचे डी वेव्ह एक बनवले.
० 2013 मध्ये 512 क्युबिटचे डी वेव्ह दोन तयार केले. कंपनी दरवर्षी क्युबिटची संख्या दुप्पट करत आहे.