आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता-पिता, गुरू आणि देवाचे महत्त्व समजून घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही पदांचे, स्थानांचे अतिशय महत्त्व असते. मग ती मानवनिर्मित का असेनात. अशा स्थानांना तुम्हाला महत्त्व द्यावेच लागते. आपण आपल्या स्वार्थासाठी या पदांना महत्त्व देतो. निसर्गाचा एक नियमच आहे. तुम्ही जर काही घेतले असेल तर ते द्यावेही लागतेच. माता-पिता, गुरू आणि देवाला जीवनात अतिशय महत्त्व आहे. मग तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहात हा विषय नाही तर तुम्ही त्यांना किती महत्त्व देता हे महत्त्वाचे. भलेही तुमच्याप्रती त्यांचे विचार काहीही असोत, मात्र तुमचे विचार त्यांच्याप्रती सकारात्मकच असले पाहिजेत.
हे सत्य आहे की, माता-पिता, गुरू आणि देवाप्रती तुमचे विचार सकारात्मक असतील तर जीवन जगणे सुसह्य होईल. या चार जणांना तुमच्या जीवनात अतिशय महत्त्व आहे. तुम्ही जे काही आहात ते केवळ तुमच्या माता-पित्यांमुळेच. आपल्यात माता-पित्यांचा अंश असतोच. आपले स्वरूप आणि निराकार भाव गुरूमुळेच घडतात. मानसिक, बौद्धिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक विकासाचा प्रणेता हा गुरूच असतो. अशाप्रकारे या चार जणांमुळे तुम्हाला पूर्णत्व येते. ॐ हा प्रणव मंत्र आहे. याचे आपल्या देशात धार्मिक महत्त्व आहे. माता-पिता, गुरू आणि देवही यासारखेच आहेत. तुम्ही यांचा शेवटचा शब्द ॐ शी जोडून पाहा. आई एकच असते. तिची जागा दुसरी कुणीच घेऊ शकणार नाही. भलेही जीवनात तुमचे अनेक गॉडफादर असतील. मात्र पिता एकच असतो हे लक्षात ठेवा. जीवनात शिक्षकही अनेक भेटतात मात्र गुरू एकच असतो हेही सत्य. आध्यात्मिक जीवनाचे निराकरण गुरूशिवाय कसे शक्य आहे? गुरूमुळेच आपल्याला मुक्ती मिळते. जितके जास्त तुम्ही गुरूप्रती समर्पित असाल तितके तुम्ही स्वत:ला मुक्त समजाल.
जेवढा वेळ आपण गुरूच्या संपर्कात असतो तो फक्त संबंध नाही, तर ती एक ओढ आहे. प्रेम आहे. त्यामुळे आध्यात्मिक ताळमेळ राहतो. गुरूमध्ये दुजाभाव नसतो. भलेही तुम्ही देवात जग पाहत असाल किंवा मग सगळ्यात देव पाहत असाल. हासुद्धा एकच विचार आहे. यातही दुजाभाव नसतोच. हे सत्य आहे. देवाला कसलाच आकार नसतो. तो निराकार आहे. त्यामुळे माता-पिता, गुरूकडून तुम्हाला दिव्यत्त्वाची प्रचिती येत नसेल तर देवाचे स्वरूपही समजणार नाही.
त्यामुळे जीवनाच्या सुरुवातीला आणि समाप्तीला माता-पिता, गुरूला वंदन करा. निसर्गाच्या या चार शक्तींना नेहमी धन्यवाद द्या. असे कराल तर जीवनात परिवर्तन येईल हे नक्की.