आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ताणाताणी’नंतर बाणा ‘स्वबळा’चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेतील मोदी महालाटेनंतर महायुतीचे राज्य येणार अशी हवा तयार झाली आणि राजकीय महत्त्वाकांक्षांना आकाश ठेंगणे झाले. अगोदर वाटले होते, निवडणूक उरली फक्त उपचारापुरती अन् त्यामुळे भाजप-शिवसेनेतील अनेकांनी मंत्रिमंडळाचे खातेवाटपही करून घेतले होते; पण ठाकरे कुलाशी विसंगत अशी घोषणा सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून टाकली. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीपासून आपण हटणार नाही असे सांगितल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारणच वेगळ्या टप्प्यावर गेले.
खरं तर मुख्यमंत्रिपदासाठी आपणही उमेदवार आहोत असे जाहीर करण्यात वावगे काही नाही; पण त्यामुळे भाजपचा अहंकार दुखावला गेला. हे राज्य आपल्या मालकीचे व्हावे ही श्रींची म्हणजेच आताचे अमित शहा यांची इच्छा. मुख्यमंत्रिपदी भाजपचाच उमेदवार हवा ही नितीन गडकरींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांची इच्छा. भाजपने निमूटपणे पंचवीस वर्षे म्हणे सेनेचा चढेलपणा सहन केला आणि ‘अब हमारी बारी’ म्हणत सगळी तयारी सुरू झाली आणि येथूनच ताणाताणीच्या राजकारणाला सुरुवात झाली. तुटेपर्यंत ताणणार नाही व ताणल्याशिवाय सोडणार नाही हा कोणत्याही आघाडीचा स्थायीभाव असतो. संसार मोडला तरी चालेल, हातची सत्ता मिळाली नाही तरी बेहत्तर; पण पक्षाचे अस्तित्व राज्यभर टिकवून ठेवण्याचे पक्षाभिमानी राजकारण पितृपक्षाचे निमित्त साधून मनसोक्त खेळणे सुरू आहे.
ही ताणाताणी आणि स्वबळाची भाषा महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय चाणाक्ष राजकारणी शरद पवार शांतपणे पाहत होते. अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होणार असे चिन्ह पवारांच्या नरमाईच्या भूमिकेमुळे दिसत होते. १९ सप्टेंबरला सोनिया गांधी परदेशातून आल्याबरोबर चर्चा होणार आणि जागा ठरणारच असे स्थिर चित्र या महायुतीच्या ताणाताणीनंतर एकदमच पालटले. एरव्ही सोनिया गांधींच्या भेटीची प्रतीक्षा करणारे राष्ट्रवादीचे नेते टाळाटाळ करू लागले. मग राष्ट्रवादीनेही जागावाटपावरून ताणाताणीत काँग्रेसवर वरताण करण्यास सुरुवात केली. शरद पवार म्हणजेच बेभरवशाचे राजकारण हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना माहीत असल्यामुळे त्यांनी अगोदरच स्वबळाची तयारी करून ठेवली होती. तसे राष्ट्रवादीचे नेते बगळ्याप्रमाणे समाधिस्थ अवस्थेत होते; पण चोंच मारण्याची जागा निश्चित होताच क्रियाशील झाले. एका बाजूला त्यांनी जागावाटपावरून ताणाताणी सुरू केली आणि दुसरीकडे प्रादेशिक पक्ष भाऊ-भाऊ असे सांगत राजकारणाचे वेगळे समीकरणही मांडायला अप्रत्यक्ष सुरुवात केली. रामदास आठवलेंपासून इतरांना सांगावा धाडला गेला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मी कामच करू शकत नाही असे सांगून काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान दिले. ‘आता माझी सटकली’ ची भाषा या चार दिवसांतच जोरात सुरू झाली. शरद पवारांना केवळ महाराष्ट्राचे राजकारण माहिती नाही तर कोणत्या तालुक्यात कोण कार्यकर्ता किती क्रियाशील आहे याची खडान््खडा माहिती आहे. अशा स्थितीमध्ये शुचिताहीन आघाड्यांचे आणि बंडखोरीचे राजकारण खेळले जाईल. अर्थातच पवारांना या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणे आवडेल. महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर भाजपचे जमत नाही. िंहंदुत्वाचा धागा आता महत्त्वाचा राहिला नाही. महाजन-मुंडे गेल्यामुळे भाजपवरील मराठी वर्चस्वाची स्थिती निखळली आहे. नरेंद्र मोदींना महाराष्ट्रापेक्षाही देशाची आर्थिक राजधानी असलेली
मुंबई हवी आहे. इतिहासाची चक्रे पुन्हा फिरू लागली आहेत.