आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Shripad Sabnis About Politics Of Bihar

राजकारण : गुडविल विरूद्ध मोदी पॅटर्नमधील संघर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांमध्ये स्थानिक अस्मिता किंवा स्वाभिमानाचा मुद्दा जेवढ्या अाक्रमकपणे अभिव्यक्त हाेताना दिसून येताे त्या पद्धतीने बिहारमध्ये सार्वत्रिक प्रकटीकरण हाेताना दिसत नाही. राजकारण अाणि पूर्वग्रह या दाेन्ही बाबींना मूठमाती देत बिहारी स्वार्थासाठी एक हाेऊ शकले तर जातपात अाणि धर्माधिष्ठित राजकारण अापाेअापच निकाली निघेल.
बि हार विधानसभा निवडणूक निकालापाठाेपाठ कदाचित राष्ट्रीय तसेच प्रादेशिक राजकीय पटावर काही धक्कादायक बदल हाेऊ शकतील, असे गृहीतक मांडले जात असल्यामुळे विशेषत: पाकिस्तानसह साऱ्या बड्या राष्ट्रांचे लक्ष तूर्त या निवडणुकीकडे लागले अाहे. मात्र, स्थानिक नागरिकांना या निवडणुकीच्या अनुषंगाने एकच माफक अपेक्षा अाहे ती म्हणजे, निकाल काहीही लागाे, विजयी भले काेणीही हाेवाे; परंतु बिहारमध्ये अाता पूर्वीचे दिवस पुन्हा यायला नकाेत. विकासाचा मुद्दा पहिल्यांदाच केंद्रबिंदू ठरला हे या निवडणुकीचे एक सकारात्मक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

खरे तर बिहारी हे नितीशकुमार यांचेच प्रशंसक; परंतु अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे नव्या अाशादायक पर्वाचे केंद्रबिंदू म्हणून देशभरातील नागरिकांच्या अपेक्षा लागून राहिलेल्या अाहेत. त्याचेच प्रतिबिंब बिहारमध्ये तूर्त पाहावयास मिळते अाहे. एकंदरीत विकासाच्या दाेन माॅडेलमधील संघर्ष म्हणूनदेखील या निवडणुकीकडे पाहता येईल. या दाेघांपैकी काेणाच्याही पारड्यात विजयाचे दान पडले तरी बिहारींसाठी ताे विजयाेत्सवच ठरणार हे निश्चित. परंतु, विकासाच्या मुद्द्याला बगल देऊन राजकीय वर्चस्ववादाचा संघर्ष पेटला तर पुन्हा बिहारमध्ये पूर्वीचेच दिवस येतील याचीच भीती बिहारींना वाटते अाहे. त्याचे कारण म्हणजे अन्य राज्यांमध्ये स्थानिक अस्मिता किंवा स्वाभिमानाचा मुद्दा जेवढ्या अाक्रमकपणे अभिव्यक्त हाेताना दिसून येताे त्या पद्धतीने बिहारमध्ये सार्वत्रिक प्रकटीकरण हाेताना दिसत नाही. राजकारण अाणि पूर्वग्रह या दाेन्ही बाबींना मूठमाती देत बिहारी अापल्या स्वार्थासाठी एक हाेऊ शकले तर जातपात अाणि धर्माधिष्ठित राजकारण अापाेअापच निकाली निघेल. मात्र दुर्दैव असे की, अातापर्यंत जेवढ्या काही निवडणुका पाहण्यात अाल्या त्यात नकारात्मकतेचे उदात्तीकरणच अधिक प्रमाणात झाले. स्थानिक मतदार, नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारित करण्याचा प्रयत्न काेणत्याही राजकीय पक्षाने ठाेसपणे अद्याप तरी केलेला दिसत नाही. त्यामुळे जर का मतदार काहीसे उदासीन बनले अाहेत असे काेणास वाटतही असेल तर त्यात मतदारांचा दाेष काय? मुळातच या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात राजकीय पक्ष सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत असून पुन्हा एकदा पारंपरिक संघर्षात ते अडकून पडले असले तरी बिहारी मतदान संपूर्ण देशाला नक्कीच चकित करेल, असे दिसते.

राज्यात तीन टप्प्यांतील मतदान पार पडले; परंतु या संपूर्ण काळात कुठली एखादी लाट अाल्याचे किंवा कुठल्या अंडर करंटचे अस्तित्व जाणवले नाही. त्यामुळे मतदानातून जाे काही कल व्यक्त झाला अाहे ताे संमिश्र स्वरूपाचा अाहे. याचा दुसरा अर्थ असा की, बहुमताच्या दिशेने काेणाची वाटचाल हाेतेय अाणि सरकार काेण स्थापन करेल ते अात्ताच स्पष्टपणे सांगणे तसे कठीणच. तथापि, भाजपला अनुकूल किंबहुना पथ्यावर पडतील अशा काही बाबी जरूर दिसून येतात. अापल्याकडे जशी ‘अाेपिनियन मेकर साेसायटी’ असते तशी बिहारातही अाहे अाणि या साेसायटीला बदल हवा अाहे. या ‘बदल’ संकल्पनेचा प्रभाव मतदारांतून व्यक्त हाेत असून त्याचा थेट लाभ भाजपला मिळू शकताे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे महिला मतदार; हा वर्ग माेदींकडे झुकेल की नितीशकुमारांकडे याविषयी काेणीही ठाेस दावा करू शकणार नाही. मात्र, एक बाब उल्लेखनीय अशी की, महिला सबलीकरणासाठी नितीशकुमारांनी जे काम केले अाहे ते लक्षात घेता महिला वर्गात त्यांच्याविषयी साहजिकच सहानुभूती अाहे. मागच्या निवडणुकीतदेखील महिला मतदारांनी अनेकांना चकवले अाणि या खेपेसदेखील त्याचीच पुनरावृत्ती हाेण्याची चिन्हे अधिक अाहेत. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांचेच मतदान अधिक झाल्याचे अाकडेवारी सांगते. या निवडणुकीत तिसऱ्या अाघाडीचा ठाेस प्रभाव काही दिसला नाही.

कदाचित या अाघाडीचे काहीसे अस्तित्व राहिले असते तर त्यामुळे मते फुटली असती अन् त्याचा फायदा भाजपला नक्कीच मिळाला असता. राज्यातील नवमतदार विकासाच्या मुद्द्यावर भाजपसाेबत जायला तयार असला तरी राेजगार संधी कशा वाढतील हे समजावून देण्यात नेते अपयशी ठरल्यामुळे ताे संभ्रमात अाहे. याशिवाय नितीशकुमार हे मतदारांमध्ये लाेकप्रिय असल्यामुळे लालूप्रसाद यादवांना लक्ष्य बनवून ध्रुवीकरण साधण्याच्या अाणि दलित-सवर्ण अशी खेळी खेळून पुरेशा मतांची बेगमी जमवण्याची साधने हाताळत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपविषयी नेमके अाकलन कठीण बनले अाहे. तिसऱ्या अाणि चाैथ्या टप्प्यात १०१ जागा येतात; जर भाजपला ८० जागा जिंकता अाल्या तर कदाचित राज्यात त्यांचे सरकार सत्तेवर येऊ शकते; परंतु इतक्या जागा मिळण्याची शक्यता तशी कमीच अाहे, शिवाय पाचव्या टप्प्यातील बहुतेक जागांवर महाअाघाडीचा प्रभाव असेल, असे मानले जाते.

या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे १९३० मध्ये ब्राह्मणांच्या विराेधात एकत्र अालेल्या कुर्मी, यादव अाणि काेइरी यांची ‘त्रिवेणी’ पुन्हा एकदा एकत्र अाल्याचे पाहायला मिळते अाहे. लालूप्रसाद यादवांच्या बाजूने यादवांचे जेवढे ध्रुवीकरण या खेपेस झाले तसे १९९५ निवडणुकीतही पाहायला मिळाले नव्हते. साधारणपणे २०-२५ मतदारसंघ वगळले तर कुठेही तिसरी अाघाडी किंवा तिहेरी लढत हाेत असल्याचे दिसत नाही. मुलायमसिंह यादव, पप्पू यादव, अाेवेसी हे फॅक्टर फारसे प्रभावी ठरले नाहीत; मात्र तारिक अन्वर ३-४ जागा मिळवू शकतात. नितीशकुमार यांच्याकडे भलेही संघटनात्मक बळ नाही; परंतु त्यांचे ‘गुडविल’ जबरदस्त अाहे, ते काेणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्र, दिल्ली किंवा अन्य राज्यांमध्ये निवडणूक काळात सरकार, काॅर्पाेरेट अाणि सिव्हिल साेसायटी यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळते तसे बिहारातील ‘गुडविल’ िवरुद्ध ‘माेदी पॅटर्न’ ठरलेल्या या लढतींमध्ये दिसले नाही. इथे राज्य सरकारचा सहयाेग िदसून येत असला तरी काॅर्पाेरेट अाणि िसव्हिल साेसायटीचा प्रभाव काही दिसत नाही. राज्यात यादव, मुस्लिम अाणि कुर्मी यांची मते सुमारे ३४ टक्के, तर सवर्ण अाणि दलितांची मते ३० टक्के अाहेत. उर्वरित ३६ टक्के ‘सायलेंट व्हाेटर’ असून तेच खरे किंगमेकर ठरणार अाहेत.