आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 देशांत 10 वर्षे चालला घटस्फोटाचा खटला, 508 कोटींची पोटगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

० प्रिन्स शाह करीम अल हसनैनी आगा खान-4,
अब्जाधीश मुस्लिम आध्यात्मिक गुरू
चर्चेचे कारण : 51 वर्षीय पत्नी ग्रॅब्रिअ‍ॅली रेनाते इनारा ज्यु लेइनिनजन यांना घटस्फोट दिला. इनारांना 508.73 कोटींची पोटगी देणार. फ्रेंच इतिहासातील सर्वात महागडा घटस्फोट.

अशोक लेलँडच्या मालकांची कन्या चित्रपट निर्मितीत
० अंबिका हिंदुजा आणि अशोक हिंदुजा
०वय :33 वर्षे
०कुटुंब: आई- सरला राव (गृहिणी), वडील: डॉ. व्ही. कामेश्वर राव, पती : अंशू प्रकाश आयएएस अधिकारी
चर्चेचे कारण : चॅरिटी ऑक्सफॉमनुसार हिंदुजा हे ब्रिटनमधील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे.
हिंदुजा कुटुंबीय किंवा ग्रुप चित्रपटाशी निगडित आहे. मात्र, या कुटुंबातील कुणीही प्रत्यक्षपणे चित्रपट क्षेत्रात आले नव्हते. अंबिकाचे वडील अशोक हे अमिताभचे चाहते आहेत. त्यांनी अमिताभच्या अनेक चित्रपटांना फायनान्सही केले. अंबिकाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करायचा निर्णय घेतला, तेव्हा अशोक यांनी तत्काळ होकार दिला. एवढेच नाही, तर तिने निवडलेल्या मित्रासोबत लग्नालाही कुणीच नकार दिला नाही. 2002 मध्ये ती मुंबईतील उद्योजक रमण मेकर यांना भेटली होती आणि तीन वर्षांपूर्वी मोठ्या-थाटामाटात तिचे लग्न झाले.
अशोक हिंदुजा हे हेवी व्हेइकल कंपनी अशोक लेलँड कंपनीचे मालक आहेत. ते म्हणतात, ‘मी कधीही माझ्या मुलीला एखादे काम करण्यास मनाई केली नाही. जिथे नकार द्यायचा असतो, तिथे हे काम तुझ्यासाठी चांगले नाही, असे स्पष्ट सांगतो.’ अंबिका सांगते, ‘गोष्टी-किस्से ऐकवण्याची मला आधीपासूनच आवड होती. त्यात व्हिज्युअल्सचा समावेश झाल्यास त्याचा वेगळा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे मी चित्रपटाची निवड केली. एखाद्या व्यक्तीची कल्पना लाखो लोकांना भावते, प्रेरणा देते यामुळेच मला चित्रपट आवडतो. ’
माझ्यावर काही चित्रपटांचा खूप प्रभाव आहे. उदा. शोले, चुपके-चुपके, आनंद, राजकपूर यांचा संगम. त्यामुळे मी चित्रपटांसाठीच काम करायचे, हे लहानपणापासूनच ठरवले होते. मुंबईमध्ये राहतानाही मी लोकांना कोणत्या प्रकारच्या कथा आवडतील, याबाबत विचार करते. अनेकदा काम करताना काही गोष्टी अशक्य वाटतात, मात्र तेव्हा बाबा आणि काकांची शिकवण आठवते. अशक्य गोष्टी शक्य करण्यातच खरी मजा असते.’
2000 मध्ये तिने लंडन फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तिने ‘बीइंग सायरस’ आणि ‘तीन पत्ती’ नावाचे चित्रपट केले आहेत. यापुढील करिअरमध्ये अंबुजाला टीव्ही किंवा टेलिकम्युनिकेशन्स कंपनीत भागीदारी करण्याची इच्छा आहे.