आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठ्या पडद्यावरील गेम शोच्या प्रवासात जोखीमही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिक द हेजहोग गेम शो आता चित्रपटगृहांत धूम माजवेल. या व्हीडिओगेम सीरीज्वर चित्रपट बनवण्याची घोषणा झाली आहे. गेमच्या 14 कोटी प्रती विकण्यात आल्या आहेत. खरे तर होम कन्सोलने मोठ्या पडद्याचा प्रवास जोखिमेचा असू शकतो. अनेक व्हीडिओ गेम्सला चित्रिकरणाने नवे जीवन मिळाले आहे. परंतु अनेक गेम्स कमजोर सिद्ध झाले आहेत. येथे चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावर आलेल्या काही व्हीडिओ गेम्सवर एक नजर...
लास क्रॉफ्ट - टॉम्ब रेडर : कमाई 2750 लाख डॉलर. रिलीज 2001. एंजेलिना जोलीची प्रमुख भूमिका असलेला सिक्वेल 2003 मध्ये बनला.
सुपर मारियो ब्रदर्स - कमाई 210 लाख डॉलर. बजट 480 लाख डॉलर. रिलीज - 1993. बॉक्स ऑफीसवर अपयशी राहिला.
रेसीडेंट इविल - कमाई 1020 लाख डॉलर. रिलीज - 2002. चित्रपटाला सुमार यश मिळाले. सिक्वेलदेखील बनला.
प्रिंस ऑफ पर्सिया - द सँड्स ऑफ टाइम- कमाई 3360 लाख डॉलर. रिलीज - 2010. नायक जॅक गिलेनहॉलचा चित्रपट याच नावाच्या गेमवर आधारित होता.
रेक इट राल्फ - कमाई - 4710 लाख डॉलर. रिलीज - 2012. चित्रपट व्हीडिओ गेमवर आधारित नव्हता. मात्र अनेक पात्र गेमचा प्रभाव होता.
नीड फॉर स्पीड - कमाई - 2030 लाख डॉलर. रिलीज - 2014. लोकप्रिय कार-रेसिंग गेम सिरीजवर बेतलेला चित्रपटाचा नायक आरोन पाल आहे.