आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थिएटरच्या रिंगमध्ये पॉपच्या तालावर बरसतील रॉकीचे ठोसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलीवूड अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोनच्या बॉक्सिंगवर चितारलेला प्रसिद्ध चित्रपट रॉकी थिएटरमध्ये सादर केला जाईल. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉड-वे थिएटरमध्ये या म्युझिकल ड्रामा शोचा सराव सुरू आहे. शोचे अनेक प्रीव्ह्यू झालेले आहेत. सरावादरम्यान कोरियोग्राफर स्टीव्हन हॉगेट प्रत्येक ताल (बिट) मोजतात. बॉक्सिंगचे ग्लोव्ह्ज् आणि शॉर्ट्स घातलेले दोन अभिनेते एकमेकांना ठोसे मारत आहेत. प्रत्येक हालचाल आणि पंच संगीत तालाशी जोडले आहेत. अधूनमधून हॉगेट सांगतात, ग्लोव्हज् असे फिरवा, खांदे पुढे करा, मागे जा..


खोट्या बॉक्सिंगच्या डावपेचांची चांगलीच माहिती असलेले सिल्व्हेस्टर स्टॅलोन सांगतात, एखाद्या व्यक्तीला पंच मारणे शिकवू शकतो. मात्र, त्याहून अधिक गरजेचे आहे ठोसे खाणा-या व्यक्तीची शारीरिक हालचाल. पाय, गुडघे आणि डोक्याच्या हालचाली महत्त्वपूर्ण असतात. रॉकीच्या सादरीकरणासाठी विंटर गार्डन थिएटर बुक केले आहे. येथे म्युझिकल ड्रामा शो दीर्घ काळापर्यंत चालतात. मामा मिया शो 12 वर्षे चालला होता. त्यापूर्वी कॅट्स शो 18 वर्षांपर्यंत प्रेक्षकांना आकर्षित करत होता. रॉकीशी अनेक प्रतिभावंत लोक जोडलेले आहेत. डायरेक्टर अ‍ॅलेक्स टिंबर्स आणि मुख्य कलाकार अँडी कार्लच्या नावे अनेक यशस्वी शो आहेत.


रॉकी शोचा क्लायमेक्स बॉक्सिंग स्पर्धेत ऑर्केस्ट्रॉ सेक्शनच्या पहिल्या आठ रांगा रिकाम्या केल्या जातील. 16 मिनिटांच्या स्पर्धेसाठी रिंग प्रेक्षकांमध्ये बनवली जाईल. शोवर एक कोटी सत्तर लाख डॉलर खर्च होतील. पहिला शो 13 मार्चला होईल. त्यात स्टॅलोन हजर असतील. स्टॅलोनच्या मनात पाच शृंखलांमध्ये निर्मित रॉकी फिल्मला म्युझिकल शोचे रूप देण्याची कल्पना 20 वर्षांपूर्वी आली होती. परंतु ब्रॉडवेचा कोणी निर्माता तयार झालेला नव्हता. त्यांचा विचार होता रॉकीचे कथानक थिएटरसाठी अनुकू नाही.


यादरम्यान स्टॅलोनने डियाने वॉरेन, डेव्हीड फॉस्टर, बेनी मार्डोन्स यांसारखे रॉक आणि पॉप संगीतकारांना जोडले. ब्रॉडवेचे एहरेन्स आणि फ्लेबर्टीच्या सेवा घेतल्या आहेत. काही गाणी तयार केली गेली. तरीदेखील कोणीही निर्माता शो बनवायला तयार नव्हता. 2011 मध्ये जागतिक हेवीवेट बॉक्सिंग चॅपियन्स युक्रेनचे व्लादीमीर क्लिटेश्चकोशी संपर्क केला. ते जर्मन निर्मात्यांच्या टीमसोबत आलेले होते.


रॉकी म्युझिकल शो हॅम्बुर्गमध्ये सादर करणाचा त्यांचा विचार होता. शो तयार झाला. त्याचे जर्मन भाषेत भाषांतर झाले. अभिनेतेदेखील जर्मन होते. शोला प्रचंड यश मिळाले. कित्येक खस्ता खाल्लेला हा शो आता ब्रॉडवेमध्ये धडका देऊ पाहत आहे.