आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOTHERS DAY: अंबिका टाकळकर- तमाम ऑटिझमग्रस्त मुलांची आई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मातृत्त्व' ही निसर्गाने स्त्रियांनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. बाळाच्या जन्मासोबतच स्त्रीचाही पुर्नजन्म होत असतो. माता ही आयुष्यात प्रत्येक गोष्टीसोबत तडजोड करत असते. त्यात बाळाच्या संगोपनाची जबाबदारी ही तर फार महत्त्वपूर्ण आहे. स्त्री आई झाल्यानंतर ती स्वत:च पुन्हा एकदा 'बालपण' जगत असते. मुलांना भावनिक दृष्ट्या सक्षम करण्‍यासाठी मुलांना बाबांपेक्षा आईचाच सहवास जास्त असतो. स्त्रीला उपजतच मातृत्त्वही भावना असते. निस्वार्थ व निस्सिम भावना एका मातेकडेच असते, असं सांगणार्‍या औरंगाबादच्या अंबिका बाळासाहेब टाकळकर यांना पोटच्या मुलाला उभं करतानाच आज तमाम 'ऑटिझम'ग्रस्त (स्वमग्रता) मुलांचे मातृत्त्व त्यांनी स्विकारले आहे.

विवाहानंतर प्रत्येक पती- पत्नी आपल्या पुढील आयुष्यातील सुंदर स्वप्नांची माळा गुंफत असतात. त्यांचं एक स्वप्न विशेषत्त्वाने असतं ते म्हणजे आपलं सुंदर, निरोगी बाळ... यासाठी त्यांचं तन-मन आसुसलेलं असतं. पण एका क्षणी कळतं, आपलं बाळ निरोगी नाही, ते एका विशिष्ट आजाराने ग्रासलेलं आहे. आणि क्षणात आई-बाबांच्या स्वप्नांची माळ तुटून पळते. असाच प्रकार 14 वर्षांपूर्वी अंबिका बाळासाहेब टाकळकर यांच्या बाबतीत घडला. त्यांच्या मोठ्या मुलाला 'ऑटिझम' असल्याचं निदान झालं. परंतु अंबिकाताई खचल्या नाहीत. या आजाराविरुद्ध लढण्याचं योग्य प्रशिक्षण त्यांनी घेतलं.आणि आपल्या श्रीहरीला उभं करण्‍यासाठी त्या आज अनेक ऑटिझमग्रस्त मुलांच्या त्या आई बनल्या आहेत.

अबिंकाताईंचा मुलगा श्रीहरी हा 'स्वमग्न' होता तसा त्यांची मैत्रीण योगिता पाटील यांचा मुलगाही स्वमग्न होत. तेव्हा त्या मी मुंबईत सॉफ्टवेअरमध्ये नोकरी करत होत्या. ताईंनी कोणताही मागचापुढचा विचार न करता नोकरी सोडून स्वमग्न मुलांसाठी 'आरंभ' नामक संस्था सुरु केली . ही संस्था मराठवाड्यातील पहिली आहे. सुरुवातीला या संस्थेत केवळ दोनच मुले होती. त्यात त्यांच्या श्रीहरीचा समावेश होता. आता मुलांची संख्याही वाढली आहे.


मुलांना स्वत:चा पायावर उभे करण्‍यासाठी पेटींग, डान्स, संगीत, फोटोग्राफी, शुभेच्छा पत्रे तयार करणे, ब्लॉक पेटींग, टीशर्ट तसेच हात रुमालावर पेटींग करणे शिकवते. आपला मुलगा समाजातील अन्य मुलांच्या तुलने मागे असल्याने पालकांनी वाईट वाटून न घेता. त्याला सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याला सक्षम केले पाहिजे. समाजात अशी अनेक मुले आहेत की त्यांना त्यांच्या पालकांनी स्वीकारलेले नाही. राज्याच नव्हे तर देशाभरात 'आरंभ'च्या शाखा सुरु करण्याचा मानस आहे.

'एखाद्या यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. परंतु माझ्या यशात माझ्या आईप्रमाणेच माझ्या पतीचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. माझी महात्त्वकांशा पूर्ण करण्‍यासाठी बाळासाहेबांनी स्वत: नेव्ही ऑफिसर पदाच्या नोकरीचा त्याग करून माझ्या कामात वाहून घेतले.'
- अंबिका बाळासाहेब टाकळकर


अंबिकाताईचे शिक्षण बीएसस्सी, बीएड (स्पेशल एज्युकेशन) तसेच एमसीएपर्यंत झाले आहे. त्यांच्या आईचा बालविवाह झाला होता. लग्नांनंतर त्यांच्या आईने त्याकाळी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. आईनेच त्यांचे शिक्षण, संगोपन, कौटूंबिक जबाबदारी वाहून नेली होती. नांदेड शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अंबिकाताई ह्या भोकर तालुक्यातील पहिली महिला होती. (1993) परंतु त्यावेळी त्यांची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. अंबिकाताईंचे लग्न झाल्यानंतरही सहा वर्षांनंतर त्या हैदराबादेत शिक्षण घेत असताना त्यांची आई त्यांच्यासोबत होती. अंबिकाताईंचा चार महिन्यांचा श्रीहरीचे त्या सांभाळ करायच्या. एवढेच नाही तर अंबिकाताई परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहित असायच्या आणि त्यांची आई परीक्षा हॉलबाहेर त्यांचे मुल सांभाळायच्या....

मुलांकडून तसेच नव्या पीढीकडून अवास्तव अपेक्षा बाळगू नये:
आधुनिक काळात सोयीसुविधा उपलब्ध करूनही मुलाबाळांची काळजी घेता येऊ शकते. माता ही मुलांसाठी जशी हळवी होऊ शकते. तशी ती कणखरही होऊ शकते. मुलांना प्रेरणा तसेच मुलांचे भविष्य घडवण्यातही आई ही महत्त्वाची भूमिका बजाव असते.

आजची पीढी इंटरनेट तसेच इलेक्टॉनिक माध्यमांमुळे सुज्ञ झाली आहे. आपण समाजाने काहीतरी देणे लागते. या सामाजिक बांधीलकीतून समाजाचे ऋण सामाजिक संस्थांचे माध्यमातून काम करून ग्रामीण भागातील लोकांची सेवा आपण करू शकतो. महात्मा गांधीच्या विचारधारणेतून ग्रामीण भागात जाऊन तेथील समस्या सोडविण्‍यासाठी अतोनात प्रयत्न करावेत तर आताच्या पीढीला प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे बालपण हरवले आहे.

आई- वडीलांनी मुलांवर आपल्या स्वत:च्या इच्छा लादू नये. मुलांच्या मनाचा विचार करावा जेणेकरून त्याला स्वच्छंद आयुष्य जगता येईल. त्याला त्याचे निर्णय स्वत:च घेऊ द्यावे.

मुलांना योग्य वेळी लैगिंक शिक्षण जरूर दिले पाहिजे. तसेच मुलाचे पाय पाळण्यात दिवसात या युक्तीप्रमाणे योग्यवेळी मुलांना समजही दिली गेली पाहिजे. पालकांनी मुलांना आवश्यक तो वेळ दिला पाहिजे. पालकांनी वेळोवेळी आपल्या पाल्यांशी सुसंवाद साधला पाहिजे. त्यांना समजून घेतले पाहिजे.

पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये मुलगा- मुलगी असा भेदभाव करू नये. विशेष म्हणजे त्यांच्यात तशी भावना चूकूनही निर्माण करू नये. मुलगा- मुलगी यांना समान हक्क आहे. मुलांप्रमाणेच मुलींना स्वावलंबन आणि स्वरक्षणांचे धडे द्यावेत. बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पालकांनी आपल्या घरातूनच सुरुवात करावी. आजच्या पीढीवर आपले उद्याचे भविष्‍य अवलंबून असल्याचे अंबिकाताईंनी सांगितले.