आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मपरीक्षणाने आखा स्वत:ची गुंतवणूकनीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात सर्वच जण आपल्या पैशांची गुंतवणूक शेअर्समध्ये करतात, परंतु प्रत्येकाचा शेअर्स घेण्यामागचा उद्देश वेगळा असतो. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे विश्लेषण करताना काही प्रमुख गुंतवणूकदारांचे सर्व वर्ग आढळले त्यानुसार गुंतवणूकदारांची वर्गवारी करून आपल्यासमोर त्याची मांडणी केली आहे. या मांडणीनुसार आपण आपली गुंतवणूकनीती आखल्यास आणि आपण कोणत्या वर्गवारीत आहोत हे आपणास कळाल्यास नक्की प्रतिसाद द्यावा, जेणेकरून या विषयावर जास्त लिहिणे आवडेल.

ट्रेंड कॅचर : बाजारात प्रत्येक वेळी गुंतवणुकीसाठी एक नवीन प्रवाह उपलब्ध होतो. भविष्यात बाजार कोणत्या ट्रेडवर चालणार आहे याची जाणीव पहिल्या गटातील गुंतवणूकदारांना होते. (सध्या मार्केटमध्ये मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी, असा जाणकारांचा ट्रेंड आहे) आणि ते मार्केटची पर्वा न करता शेअर्सची खरेदी-विक्री करतात. प्रवाहानुसार जो गुंतवणुकीचा ताळमेळ बसवतो तो सहसा अपयशी होत नाही. हर्षद मेहता, केतन पारेख हे कदाचित ट्रेंड कॅचर या संकल्पनेत येऊ शकतात. या लोकांनी हा नवीन ट्रेंड दाखवला का बनवला हा वादाचा मुद्दा आहे; परंतु ट्रेंड काय हे त्यांनी बरोबर ओळखले. बहुसंख्य लोकांनी तो ट्रेंड फॉलो केला आणि ते सर्व आले ट्रेंड फॉलोअर्स या नावाने ...

ट्रेंड फॉलोअर्स : या गटातील गुंतवणूकदारांकडे पैसा मुळातच कमी. त्यामुळे ट्रेंड कॅचर्सने टेक्नॉलॉजीचा दिग्गज इन्फोसिस घेतला किंवा बॅँकेचा स्टेट बॅँक घेतला अथवा सिमेंट कंपनीत एसीसी घेतला की ही मंडळी सिल्व्हरलाइन अथवा देना बँक, आयडीबीआय बॅँक किंवा एचडीएफसी बॅँक अथवा सांघी सिमेंट किंवा श्री सिमेंट घेतील. या गटातील लोक कायम दुय्यम अथवा निम्न दर्जाचे शेअर्स घेतात. यांचे काम मुळात वाहणार्‍या प्रवाहात स्वत:ला झोकून देऊन ट्रेंड फॉलो करावयाचा. थोडक्यात, किंमत काय आणि मूल्य काय, याचा विचार नाही. याउलट फॉलोअर्स म्हणजेच आंधळेपणाने अनुकरण करणारे सर्वजण या गटात येतात.

या गटातील गुंतवणूकदारांना मागावून कोणी धक्का दिला तर हे पुढे चालतात. चालत्या गाडीत बसणारे, परंतु चालती गाडी प्रत्येकालाच लाभदायक असते असे नाही. यांना स्वत:चा अभ्यास नाही. कोणीतरी टीप दिली, मित्राने-नातेवाइकाने सांगितले की हे पैसे गुंतवतात. या वर्गात लालची लोकांची संख्या जास्त असते. इन्फ्रास्ट्रक्चर जोरात असल्यास गुंतवणुकीचे इन्फ्रास्ट्रक्चर जोरात आणि बँकिंग जोरात तर पैसा बॅँकिंगमध्ये त्वरित वळता करावयाचा. बाजारात यांची फसगत जास्त होते.

दीर्घकालीन गुंतवणूकदार: शेअर बाजारात किमान आठ ते दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पैसा गुंतवणारे गुंतवणूकदार सहसा नुकसान करीत नाही. कारण दीर्घकाळात नफा हमखास मिळतो. नफ्याचे प्रमाण मात्र आपण काय विकत घेतले यावर असते. ट्रेडर्स या गटातील लोकांना गुंतवणूकदार म्हणताच येत नाही. असे बहुतांशी सटोडिये असतात. फक्त तेजी-मंदी खेळणारे, अर्थशास्त्र, सरकारची नीती आणि गुंतवणूकनीती यांच्याबरोबर त्यांचे पटत नाही. लेना-देना करके हाथ में क्या? अशा विचारसरणीचे लोक या गटात असतात आणि उरलेले सर्व शेवटच्या गटात म्हणजेच ‘व्युअर्स’ (बघे) असतात. सध्या तरी मिडकॅप, डेब्ट फंड, शॉर्ट टर्म डेब्ट फंड, एफडी आणि निश्चित व्याज देणार्‍या योजनांना जवळ करावे, असे वाटते.