आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Varunkumar Tripathi About How To Know Yourself?

"तू-तू मैं-मैं'पासून "अहं ब्रह्मास्मि' पर्यंत "मी'पणाची धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहंगड नेहमी मनाच्या कोपऱ्यात दडलेला असतो. मात्र, वेळ येताच त्याचे विराट स्वरूप दिसून येते. त्याला अहंमान्यता मिळताच समोरचा किंवा अन्य कोणीही आपल्यासमोर खुजा हे असे वाटू लागते. जर तुम्ही आत्मपरीक्षण कराल तर असे आढळून येईल की, तुम्ही स्वत:चीच कूटनीती समजू शकत नाही आणि दुसऱ्याच्या बाबतीत मात्र त्याला कमजोर किंवा छोटा समजून त्याचे खच्चीकरण केले जाते. कोणी सामर्थ्यवान असेल तर त्याची खुशामतही कराल आणि कमजोर असेल त्याची उपेक्षा. म्हणजे "मी' आणि स्वार्थ जोपर्यंत सुटणार नाहीत, तोपर्यंत मनुष्य कसे व्हाल?
"मी'पणा हा शब्द मला वर्षानुवर्षांपासून सतावतो आहे आणि माझी अशी समजूत आहे की, "तू' (माझ्यासाठी दुसरा मग तो कोणीही असेल ) मला सतावतो आहे. "मी'पणा हा माझ्या अहंगंडाचे प्रतीक आहे. व्यावहारिक भाषेत मात्र "प्रथम पुरुषा' कडे इशारा करणारी संज्ञा आहे तसेच मानसशास्त्रीय समस्या आहे. "मी' कित्येक शतकांपासून याचे उदात्तीकरण करत आलेला आहे. "तू तू मैं मैं' पासून "अहं ब्रह्मास्मि' पर्यंत "मी'चाच विस्तार झालेला आहे. "मी' सर्व दु:ख, संबोधन, मान्यता, अनुभव, आठवणी, दु:ख तसेच वासनेचा भाषिक संकेत आहे. एक सामूहिक नाम आहे.

प्रत्येक दुसरा माणूस आव्हान : "मी'पणाचा रोष अन्य सर्व बाबींमध्ये असलेल्या अस्तित्वाच्या रूपात दिसून येतो. साहजिकच जगात मीव्यतिरिक्त सर्व बाबी "मी'पणाहून वेगळ्या आहेत. मी जगातील सर्व "तू'च्या विरोधात आहे. "मी,' "तू' ला आव्हानाच्या स्वरूपात घेतो, अशा प्रकारे माझ्या "मी'चा मानसशास्त्रीय संबंध येतो. तो त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. प्रत्येक "तू' "मी' च्या अस्तित्वासाठी एक आव्हान आहे. अशा परिस्थितीत माझे वागणे तुमच्याशी अशा प्रकारे असेल : मी तुमच्यातील दोष शोधतो, कारण मला तुमच्यावर टीका करायची असते तसेच तुम्हाला अपमानित करायचे असते आणि स्वत:ची बाजू सावरून घ्यायची असते. जेव्हा मला तुमच्यातील दोष दिसतात, तेव्हा तुमची माझ्यासाेबत कधीच स्पर्धाच नसते. माझ्यावर वर्चस्व गाजवाल म्हणून मला मात्र दुसऱ्याची कायम भीती वाटत असते.

मीपणाचे स्वरूपच स्वत:ला कमी लेखण्याचे असते. त्यामुळे मीनंतर तू येतो. शेवटी "तू'मध्ये कोणत्याही प्रकारचे श्रेष्ठत्व(मग ते तुमच्या सदगुणांचे असो की पात्रता, पद, प्रतिष्ठा, यश, सुंदरता, श्रीमंती किंवा लोकप्रियतेचे असेल) पाहून मी लगेच स्वत:ला कमी लेखतो. यामुळेच मला तुमची कोणी प्रशंसा केलेली वडत नाही. तुमची निंदा केलेली मात्र आवडते. तुमची निंदा होत असेल तर माझी बरोबरी करू शकत नाही. एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्तीची चायवाला म्हणून हेटाळणी केलेली मला आवडते. त्यांना पंतप्रधान असे म्हटले तर रुचत नाही. तुमचे खुजेपण (दोष) दाखवून तुम्हाला कमीपणा आलेला आवडतो. तुमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो. जर मी मोठा असतो तर तुम्हालाही मोठे करतो. कारण मी माझ्या बरोबरीला कोणालाही आणण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांच्या स्वभावधर्मात बदल करू शकत नाही. मला जर वाटले तर मी माझ्या स्वभावधर्मात बदल घडवून आणू शकतो. परंतु तेव्हा माझे मीपण कोठे जाईल आणि "तू'शी तुलना कशी करेल?

श्रेष्ठता म्हणजे कमीपणाशी संघर्ष : आपल्या कमीपणाच्या घुसमटीशी लढताना मी मला मोठे दाखवू शकतो. माझा तथाकथित आत्मसन्मान स्वत:ला मोठे न करता मोठे दाखवण्याची धडपड आहे. माझे श्रेष्ठत्व हीच माझी कमीपणाशी चाललेल्या संघर्षाची कहाणी आहे. कमीपणाचे विसर्जन करण्याची नव्हे. एक तर मी कमीपणाशी संघर्ष करतो(हा नैतिकतेचा प्रश्न आहे) मी त्याला झाकण्याचा प्रयत्न करतो. (माझीच स्वत:शी तारीफ करून) किंवा मानवी स्वभाव आहे असे म्हणून त्याचे सामान्यीकरण करतो.( जेव्हा मी असे म्हणतो, सगळे जग तसेच आहे) किंवा त्याचे उदात्तीकरण करतो. (स्वाभिमान आहे असे म्हणून) त्याचे ध्यात्मिकीकरणही करतो. (मी ईश्वर आहे असे म्हणून)

मनातली घाण दिसत नाही : मी माझ्यातील "मी'पणा श्रेष्ठ आहे, असा खोटा अहंकार सोडून दिला तर किती चांगले झाले असते. ज्याप्रमाणे मी शरीरावर थोडीशी घाण बसू देत नाही, लगेच धुऊन टाकतो. पण माझ्या मनातील मळही काढून टाकत नाही, कारण त्याला पाहू शकत नाही. पण मी तर त्याला रोज पाहत असतो ना! तुम्हाला त्याच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल, याचा मात्र अंदाज मला नसतो. तुम्ही जेव्हा माझी तारीफ करत असाल तेव्हा माझ्यातील "मी'पणाच्या दुर्गंधीपासून दूर जाऊ इच्छिता, पण त्याची जाणीव मला होत नाही.

स्वत:मधील कसब ओळखा : मला माझ्यात असलेल्या मीपणाचे कौशल्य कधीच समजू शकलेले नाही. तुम्हाला कमजोर किंवा खुजा समजून तुमचे खच्चीकरण करावे वाटते आणि तुम्ही सामर्थ्यशाली असाल तर तुमची खुशामत करतो. तुमच्या भीतीपोटी तुमच्यासमोर झुकण्यासही तयार होतो. तुम्ही माझे काम कराल म्हणून तुमच्याशी मैत्री करतो. तुम्ही माझ्या कामाचे नाही असे कळले की तुमची उपेक्षाही करतो. तुमचा कधी ना कधी वापर करून घेण्यासाठी तुमच्याशी संबंधही वाढवेन. तुमचा मोबाइल नंबर मागेन. तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा देईन, सणावारास शुभेच्छा भेटवस्तू देईन. तुम्ही माझ्या किती जवळचे आहात, याची जाणीवही तुम्हाला करून देईन. तुमच्याशी मैत्री करून, कधी समजूत घालून, कधी भावुक करून, कधी नैतिकता, सामाजिक कर्तव्य किंवा कायद्याचा बडगा दाखवून, तर कधी धमकावून किंवा लाचारी दाखवून, तुम्हाला गुंडाळूनही ठेवेन.

यातील कोणताही फंडा म्हणजे जेव्हा तुमचे मत माझ्याबद्दल अनुकूल होईल तेव्हा मी तुमचा फक्त वापर करून घेतो. जेव्हा मी तुमचा वापर करून घेत असतो, तेव्हा मी तुमचे शोषणही करतो. तेव्हा तुमचे आव्हानच माझ्यासाठी संपुष्टात आलेले असते. जोपर्यंत मी स्वत:ला कमी समजत असतो, तोपर्यंत माझ्यातील मीपणा कायम असतो आणि तोपर्यंत मला द्वेष, हिंसा, अधिकार, ईर्ष्या, तसेच माझ्यातील वासनेपासून मुक्त कसे समजाल? मला प्रेम, मैत्री, समभाव, तुमचा आदर करणे कोठून येईल?

पशुत्वाची सवय : यासाठी माझ्यात असलेले मीपण संपूर्णपणे काढून टाकले पाहिजे. मला आधी माणूस व्हावे लागेल. तुम्हाला माझ्या बरोबरीचा समजावे लागेल. कारण वर्षानुवर्षापासून "मी' मनुष्य असल्याने घाबरलेलो आहे. आता तर आपल्यामध्ये पशुत्वाला आश्रय देण्याची सवय झाली आहे.
वस्तुस्थिती - यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदात "अहं ब्रह्मास्मि'चा उल्लेख आहे. तथापि, सांख्य दर्शनाचे मत असे आहे की, माणूस स्वत: काही करत नाही. जे काही करतो ते निसर्ग घडवत असतो. निसर्गच पुरुषास बंधनात अडकवत असतो.