आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On 9 Habits Which Lead Failure, Divya Marathi

Learning : 9 गोष्टी, ज्यांची सवय लागल्याने अपयशी होणे अगदी सोपे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय तुम्ही त्या लोकांसारखे आहात, ज्यांना इतरांचे यश पाहून दु:ख होते. तुम्हीही यशस्वी होऊ शकता, पण त्यासाठी या सवयींपासून लांब राहा.
* प्रॅक्टिस करताना भीती वाटणे
नकारात्मक विचार केला असेल तर नकारात्मकच राहाल. नकारात्मकच्या जागी सकारात्मक विचार करा. या प्रॅक्टिसमुळे कामही सकारात्मक होईल आणि निकालही चांगला येईल.
* मेंटल स्किलची कमतरता ठेवणे
मेंटल स्किल आत्म-अनुशासन, आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा, प्रॉडक्टिव्हिटी आणते. ही एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवते. चांगल्या मेंटल स्किलमुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो.
* लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न न करणे
जीवनाचा उद्देश शोधा. ते मिळवण्याची इच्छा निर्माण करा. असे केले नाही तर तुम्ही एक काम सोडून दुसरे, तिसरे करत राहाल आणि स्वत:ला अयशस्वी समजाल.
* यशाचा पाया दुस-यावर सोडू नका
यश कठोर मेहनत आणि स्वत:वर विश्वास असल्यावर मिळते. हे गिफ्ट किंवा मोठ्या परिवारात जन्म झाल्यावर मिळत नाही. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संधी मिळवण्याचे तुम्ही दावेदार आहात. यशाचा पाया स्वत:च रचा.
* अंदाज करा
दुसरे काय विचार करतात यासंदर्भात अंदाज करणे म्हणजे नकारात्मक विचार करणे आहे. माइंड रीडिंग केल्यामुळे मूड खराब होतो. अंदाज लावल्यामुळे चुकीचे समज निर्माण होतात. नातेसंबंधांना तडे जातात.
* आव्हानांना सामोरे न जाणे
यशस्वी व्यक्ती रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जातात. हे सत्य आहे की, आव्हाने रिवॉर्ड घेऊन येतात. दोन्ही गोष्टी सोबत असतात. अयशस्वी होण्याच्या भीतीमुळेच आव्हाने स्वीकारण्यापासून अनेक जण लांब राहतात.
* निकाल लवकर मिळण्याची अपेक्षा ठेवा
लहानपणापासून आई सांगत असते, चांगल्या गोष्टी त्यांच्याजवळ येतात, ज्यांच्याकडे धैर्य असते. हे पूर्ण सत्य आहे. धैर्य विकसित करण्यासाठी नियमित लहान-लहान पावले उचला.
* निर्भीडतेची भीती वाटणे
एकदा अयशस्वी झालात तर पुन्हा प्रयत्न करणे सोडून द्याल? महान नेता, वैज्ञानिकही अनेक वेळा अयशस्वी झाले आहेत. निर्भीड राहा, प्रयत्न करणे सोडू नका.
* योग्य वेळी माघार घेणे
कामासंदर्भात दृढता नसणे मानसिक कमकुवतपणा आहे. महत्त्वपूर्ण कामावेळी मागे होणे यशासाठी चुकीचेच आहे.