आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभव होऊनही स्थितप्रज्ञता सोडली नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ए. आर. अंतुले यांचा लोकसभा (१९९९) निवडणुकीत पराभव झाला. पण तरीही कार्यकर्त्यांची पाठ थोपटून त्यांना मराठवाडा विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा दिलासा देणारे, पराभवानंतर विमानतळावर निरोपासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी नाराज न होण्याचा सल्ला देत अत्यंत स्थितप्रज्ञपणे त्यांनी औरंगाबाद सोडले, ही आठवण सांगितली प्रा. मोहन देशमुख यांनी.

फटाफट निर्णय घेण्याची क्षमता : मुख्यमंत्री असताना २७ ऑगस्ट १९८१ मध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना त्यांनीच केली. जालना, लातूर जिल्ह्याची निर्मिती केली. १९९९ मध्ये औरंगाबादेत झालेला पराभव त्यांनी खुल्या दिल्याने स्वीकारला होता. फटाफट निर्णय घेण्याची क्षमता असलेला धडाडीचा नेता त्यांच्या रूपाने गेला. - अ‍ॅड. विजय साकोळकर, माजी अध्यक्ष, बार कौन्सिल
स्वागत मोर्चाच्या व्यासपीठावर आले : मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा जेव्हा औरंगाबादेत आले, त्या वेळी त्यांचे स्वागत मोर्चा काढून अभिनव पद्धतीने केले होते. दंत महाविद्यालय सुरू करा, सिंचन प्रकल्प उभारून मराठवाड्याचा विकास करण्याची मागणी आम्ही या मोर्चातून केली होती. मोर्चाच्या व्यासपीठावर येऊन त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे त्यांनी जाहीर केले होते - मोहन देशमुख, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते
ग्राहक नव्हे, पाहुणा म्हणून ठेवल्याचे अभिमानाने सांगत
बी. ई. केलेल्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांची श्रेणी-२ द्यावी म्हणून ग्रॅज्युयट इंजिनिअर्स असोसिएशनने राज्यभर आंदोलन केले होते. आमची मागणी त्यांनी मान्य केली होती. आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले नाही. ग्राहक म्हणून नव्हे तर पाहुणा म्हणून वागवल्याचे ते माझ्याविषयी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना कायम अभिमानाने सांगत असे -मिलिंद पाटील, अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज व्यवस्था
पराभूत होऊनही मला शुभेच्छा दिल्या : अंतुलेंचे बाळासाहेबांशी जिव्हाळ्याचे नाते होते. १९९९ मध्ये माझ्या विरोधात काँग्रेसने त्यांना मुद्दाम उभे केले होते. अंतुलेंनी पराभव खुल्या दिल्याने स्वीकारत मला शुभेच्छा दिल्याचे मला आठवते. अल्पसंख्याक कल्याण मंत्री झाल्यावरही ते इतर खासदारांसमोर माझे लॉबीमध्ये कौतुक करायचे - चंद्रकांत खैरे, शिवसेना
तरीही मराठवाड्यासाठी संघर्षाची भूमिका
त्यांच्या प्रचारात उतरलो होतो. पण त्यांचा पराभव झाल्याने ते कधीही खचले नाहीत. उलट मराठवाड्याच्या प्रश्नासाठी सतत लढत राहण्याचा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना दिला. मराठवाडा इंटकतर्फे त्यांना आदरांजली -जयदीप झाल्टे, मराठवादा प्रदेशाध्यक्ष, इंटक
खंडपीठ स्थापनेत सिंहाचा वाटा : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत स्थापन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा परिषदेची मध्यवर्ती इमारत त्या वेळी अंतुले यांनी खंडपीठासाठी ४८ तासांत उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे खंडपीठ येथे कार्यान्वित होऊ शकले. अंतुले यांच्या महान कार्यासाठी मराठवाडा व न्यायिक क्षेत्र सतत स्मरण करणार -अ‍ॅड. प्रदीप देशमुख, मराठवाडा जनता विकास परिषद