आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि दूर केला प्रोटोकॉलचा अडसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारी महिन्यात डॉ. कलाम एमजीएम आणि स्टरलाइट कंपनीच्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. एमजीएममधल्या कार्यक्रमासाठी उद्योजक आशिष गर्दे यांनी त्यांना निमंत्रित केले होते. तर औरंगाबादच्या महापौर असताना विजया रहाटकर यांनी कलामांची दिल्लीत घेतलेली भेट त्यांच्या साधेपणाचीच साक्ष देते.

याबाबत गर्दे यांनी सांगितले की औरंगाबादच्या कार्यक्रमासाठी दीड वर्षापूर्वी मी त्यांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते. दुपारी अडीच वाजताची वेळ होती. ते अहमदाबादमधल्या आयआयएमच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला होते. बरोबर त्या वेळेत मला बोलावणे आले. त्यानंतर मी त्यांना कार्यक्रमाची माहिती सांगितली. त्याच वेळी त्यांच्यासाठी चहा आला. मात्र त्यांनी चहा आणणा-याला सांगितले की हे माझे पाहुणे आहेत. पहिल्यांदा त्यांना चहा द्या, असे सहजपणे सांगत मला चहा द्यायला सांगितले. त्यानंतर त्यांनी सचिवांना सांगून वेळ देण्याचे सांगितले.

पुढे वाचा.. प्रोटोकॉल बाजूला ठेवून संवाद