आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराची शोधाशोध करताना अडचणी आल्याने स्वत:ची बनवली रिअल इस्टेट वेबसाइट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : कंपनीच्या अन्य संस्थापकांसोबत अद्वितीय(चष्मा घातलेला)
यश | अद्वितीय शर्मा, रिअल इस्टेट पोर्टलचे सहसंस्थापक


जन्म: ६ फेब्रुवारी १९८९
कुटुंब: वडील - डॉ. अनिल शर्मा(जम्मू-काश्मीरचे पहिले न्यूरोसर्जन), आई- डॉ. अंजना
शर्मा, जनरल फिजिशियन
शिक्षण : आयआयटी मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंग
चर्चेत : त्यांच्या कंपनीला नुकताच सॉफ्ट बँकेकडून ५५८ कोटी रुपये निधी मिळाला
आहे.
घरात सर्वच डॉक्टर आहेत, त्यामुळे अद्वितीयलाही डॉक्टर व्हायचे होते. आई-वडील तसेच वाटत होते, मात्र मुलगा डॉक्टरच्या अॅप्रनमध्ये दिसावा हे त्यांचे स्वप्न भंगले होते. आपल्या जडणघडणीबाबत अद्वितीयने 'दिव्य मराठी'ला सांगितले, ट्यूशनहून आल्यानंतर वडिलांना मेडिकलची मोठमोठी पुस्तके वाचताना पाहत होतो.

एके दिवशी विचार केला - ४५ व्या वर्षी आयुष्य जगण्याची इच्छा आहे, शिकण्याची नाही. डॉक्टर होणार नाही. अभ्यासात गती होती. एकुलता एक होता, त्यामुळे आई-वडील काहीही म्हणाले नाहीत. त्या काळात सुनीता विल्यम्स यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे नासात जाण्याचे पक्के ठरवले. मुंबई आयआयटीमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

इथे शटल बनवता येईल, चालवता येणार नाही, हे कळून चुकले. अभ्यासापासून काहीसा विचलित झालो. फुटबॉल खेळताना चार वर्षांत इंटर आयआयटी टुर्नामेंटमध्ये कॉलेजच्या संघाचे कप्तानपद भूषवले. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळाली. भाड्याने घर शोधण्याची वेळ आली तेव्हा हे काम खूप कठीण असल्याचे जाणवले.

मुंबईतील कानाकोप-यात फिरलो. ऑनलाइन रिअल इस्टेट फर्मची मदत घेतली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यातील समस्या सोडवण्यात गुंतलो. ऑनलाइन इस्टेट फर्म्सचे बिझनेस मॉडेल समजून घेण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ११ मित्रांसोबत नव्या बिझनेस मॉडेलवर रिअल इस्टेट कंपनी-हाउसिंग.कॉम स्थापन केली.घरांची माहिती संकलित केली, त्याची शहानिशा केल्यानंतर ती वेबसाइटवर टाकली.