आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Aging And Fats By Prashant Talwalkar, Divya Marathi

वाढत्या वयात कमी उष्मांक घ्या आणि सक्रिय राहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृद्धत्व ही फक्त डोक्याची समजूत आहे. तुम्ही यावर लक्ष नाही दिले, तर अशी कोणतीही गोष्ट नाही असे लक्षात येईल. 50 वर्षांनतर माणसाच्या शरीरात बदल होतात. या वयात तरुणांच्या तुलनेत 6 टक्के कमी कॅलरी घेण्याची गरज आहे. जीवनसत्त्वदायी आहार व व्यायामामुळे 60, 70 आणि 80 च्या वयातही गुणवत्तापूर्ण जीवनावर याचा चांगला परिणाम होतो. खालील गोष्टींकडे लक्ष द्या :
०रोज व्यायाम अथवा चालल्याने स्नायू मजबूत बनतात.
० वयानुसार मल्टिव्हिटॅमिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. संतुलित आहार घ्या.
० तुम्ही किती सक्रिय आहात यावर तुमचा आहार अवलंबून आहे. कमी सक्रिय असाल आणि कॅलरी जास्त घेत असाल, तर वजन वाढणारच.
० वयाच्या 40 वर्षांनंतर चव घेणा-या इंद्रियांची म्हणजे टेस्ट बडॅसची संख्या वाढते. त्यामुळे अधिकाधिक गोड किंवा तिखट खावे वाटते. आहारात जास्त फायबरचा समावेश असावा. फळभाज्या यांच्यात अधिक फायबर असते. महिलांनी रोज 21 ग्रॅम, तर पुरुषांनी रोज 28 ग्रॅम फायबर आहार घेतला पाहिजे.
० दिवसभर पाणी प्या. हे सर्वात चांगले कॅलरीफ्री पेय आहे. अधिकाधिक सत्त्वदायक आणि फायबर आहारासाठीही तशा पद्धतीचा आहार घ्या.
० 50 वर्षांपेक्षा जास्त ज्यांचे वय आहे, त्यांनी शरीराच्या वजनाच्या तुलनेत 0.5 टक्के प्रोटीन घ्या. आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.
० अक्रोड, अळशी तसेच मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आहार घ्या. यामुळे बॅड एलडीएल कोलेस्टेरॉल पातळी कमी होते आणि चांगल्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
० पीठ, रिफाइंड शुगर, पांढरा भात कमी खा. यामुळे कार्बोहायड्रेट्स वाढतात. पचायला हलके असतात; पण यामुळे रक्तातील साखर वाढते.