आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्लाइडशेअरचे निर्माते अमित आता सरकारी अ‍ॅप्स बनवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
*अमित रंजन : सीओओ स्लाइडशेअर
*शिक्षण : नवी दिल्लीतून मेकॅनिकल
इंजिनिअरिंग, एमबीए

*रश्मी सिन्हा : सीईओ स्लाइडशेअर
*शिक्षण : अलाहाबाद विद्यापीठातून मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी, अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातून न्यूरो सायकोलॉजीमध्ये पीएचडी
*कुटुंब : पती जोनाथन बुतेले, दोन मुले.

चर्चेत का?-
नुकतीच केंद्र सरकारने अनेक अ‍ॅप विकसित करण्याची जबाबदारी अमितवर सोपवली आहे.
अमित रंजन व त्यांची बहीण रश्मी सिन्हा यांचे बालपण अहमदाबाद येथे गेले.

या भावंडांनी आपली स्लाइडशेअर ही
कंपनी लिंक्डइन या प्रोफेशनल नेटवर्किंग कंपनीला २ वर्षांपूर्वी ६४० कोटींना विकली होती. मात्र, २ वर्षांपूर्वी हे दोघे फार प्रकाशझोतात आले नव्हते. मी आयुष्य फार पूर्वनियोजित स्वरूपात जगलो नाही, असे अमित सांगतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर त्यांनी एमबीए केले. कंझ्युमर प्रॉडक्ट सेल्ससाठी ते मार्केटिंगमध्ये आले. एशियन पेंट्समध्ये त्यांनी ४ वर्षे विक्री व वितरणाचे काम केले. त्यानंतर पेप्सी कंपनीत हेच काम केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करूनही कधी तंत्रज्ञानाशी संबंधित नोकरी त्यांनी केली नाही. अशा स्थितीत केंद्र सरकारने त्यांच्यावर अ‍ॅप निर्मितीची जबाबदारी टाकली आहे. हे आव्हानात्मक काम आहे.

२००४ पासून ते या क्षेत्रात काम करत आहेत. अमितसोबत त्यांची अमेरिकेत स्थायिक बहीण व अजून एक पार्टनरही होता. या तिघांनी सर्वात पहिले ऑनलाइन रिसर्च अ‍ॅप्लिकेशन माइंड कॅन्व्हास हे गेमसारखे सॉफ्टवेअर विकसित केले. संगणकाद्वारे संशोधन करण्यासाठी याचा वापर होतो. १८ महिन्यांनंतर त्यांनी याचे लाँचिंग केले. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर स्लाइडशेअर कंपनीची स्थापना केली. नोएडात ही कंपनी सुरू केली. काही विद्यार्थी स्वत:चे फोटो व व्हिडिआे प्रेझेंटेशन फ्लिकर व यूट्यूबच्या मदतीने देत असल्याचे अमितने पाहिले. यात सारखे बदल करण्यात त्यांना अडचणी येत होत्या. यासाठी ऑनलाइन टूलची गरज असल्याचे अमितला वाटले. एकाच टूलने प्रेझेंटेशन व शेअरिंग करता येणे गरजेचे वाटले.
स्लाइडशेअरला चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्लीत याचे ऑफिस आहे. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये याचे मुख्यालय आहे. अमेरिकेतील व्यवस्थापन रश्मी व तिचे पती जोनाथन सांभाळतात. रश्मी यांनी मानसशास्त्रासोबतच संगणकशास्त्राचा अभ्यासक्रम अँडी वे येथून पूर्ण केला. रश्मीने एज्युकेशनल सॉफ्टवेअर डिझायनिंगचा कोर्सही केला आहे. स्लाइडशेअरची मूळ कल्पना जोनाथन यांची होती. काही कालावधीतच स्लाइड शेअरिंगची ही जगातील अग्रणी कंपनी ठरली. दोन वर्षांपूर्वी लिंक्डइनने ही खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. ६४० कोटी रुपयांत लिंक्डइनने ही कंपनी विकत घेतली. तीन पार्टनर्सला यातील प्रत्येकी ४५ टक्के नगदी रक्कम मिळाली व बाकी लिंक्डइनचे शेअर्स मिळाले.