आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्‍चर्यकारक : ६८१ अब्ज संपत्तीचा मालक झाला बौद्ध भिक्खू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद कृष्णन : व्यावसायिक
*जन्म : १ एप्रिल १९३८
*शिक्षण : हार्वर्डमधून एमबीए
*कुटुंब : पहिले लग्न थाई युवराज्ञीशी झाले होते. तिच्यापासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दुसरे लग्न लेटचुइमी हेलेन मेरीशी झाले. त्यांचे पॅरिसमध्ये म्युझिक रेकॉर्डिंग हाऊस आहे. त्यांच्यापासून एक मुलगी आहे.
*चर्चेत : ६८१ अब्ज रुपये मालमत्तेच्या या मलेशियन व्यावसायिकास सीबीआयने एअरसेल-मॅक्सिस करारात दोषी ठरवले आहे.
दक्षिण-पूर्व आशियातील दुसरे आणि जगातील ९९ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक आनंद कृष्णन यांचे पुत्र अजाह श्रीपानो २००८ च्या आसपास अचानक बेपत्ता झाले होते. त्याचा खूप शोध घेण्यात आला. मात्र, ठावठिकाणा लागला नाही. यादरम्यान त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीने सांिगतले की, त्याने त्यांच्या मुलाच्या चेह-याशी मिळताजुळता मुलगा उत्तर थायलंडमधील बौद्ध भिक्खूंच्या मठात पाहिला आहे. यानंतर ते त्वरित तिथे पाेहोचले. मुलाला मरुन रंगाच्या वस्त्रात, कमी केलेले केस, हातात भिक्षापात्र घेतलेल्या अवस्थेत पाहून थक्कच झाले.
मुलगा राजवाड्याऐवजी वनात वास्तव्य करत असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. मुलगा बौद्ध भिक्खू झाला होता. मुलाने किमान आपल्यासोबत जेवण करावे, असा आग्रह त्यांनी केला. मात्र, अजाहने त्यास नकार दिला. ते वडिलांस म्हणाले, मला माफ करा. मी तुमच्या आदेशाचे पालन करू शकत नाही. मला अन्य भिक्खूंप्रमाणे भिक्षा मागूनच जेवण करावयाचे आहे. अब्जावधीची संपत्ती असतानादेखील मुलास जेवू घालू शकत नसल्याने त्यांना दु:ख वाटले. यानंतर आनंद यांना परतावे लागले. आनंद एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमास बोलावत तेव्हा ते अवश्य येत. २०११ मध्ये आनंदा यांचा ७० वा वाढदिवस होता. मुलासोबत साजरा करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी मुलाला बोलावून आपल्या खासगी विमानातून भुतानच्या पारोमध्ये आणले. इथे मुलाने वडिलांचा वाढदिवस साजरा केला. मलेशियामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात काम करण्यासाठी आनंद यांचे आजोबा श्रीलंकेतील जाफनातून इथे आले होते. यानंतर ते श्रीलंकेत परतले नाही आणि मलेशियातील लिटल इंिडया म्हणून ओळखल्या जाणा-या ब्रिकफील्ड्समध्ये स्थायिक झाले. यानंतर आनंद यांच्या वडिलांनीही येथे सरकारी नोकरी केली होती.
आनंद लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. त्यामुळे मेलबर्न विद्यापीठात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या पदवीसाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. शिकत असताना ते वृत्तपत्रात काम करत असत. जोखीम स्वीकारण्याची सवय होती, त्यामुळे ते बेटिंगही करत होते. नेहमी साधे राहणा-या आनंदा यांचा व्यवसाय एंटरटेनमेंटपासून इंधन, ऊर्जा, जहाज, दूरसंचार आणि बांधकाम क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. त्यांच्या कमाईतील एक चतुर्थांश वाटा जुगाराच्या व्यवसायातून येतो.