आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल अग्रवालांनी केले दोन हजार कोटी रू. दान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाद| अनिलअग्रवाल, खाण व्यावसायिक
जन्म : जुलै१९५४
कुटुंब: पत्नीकिरण, मुलगा अग्निवेश आणि मुलगी प्रिया
चर्चेत:तेन्यूयॉर्कच्या टाइम वॉर्नर रियल इस्टेटचे सिक्रेट खरेदीदार आहेत.
अनिल यांनी वयाच्या १५ व्या वर्षी शाळा सोडली. लालूप्रसाद यादव त्यांचे वर्गमित्र होते. १९७५ मध्ये १९ व्या वर्षी ते मुंबईत आले. तीन वर्षात स्क्रॅप मेटल डीलर झाले. यानंतर त्यांनी परत माघारी पाहिले नाही. २००३ मध्ये लायसन राजला कंटाळून त्यांनी लंडनमध्ये स्थलांतर केले. गेल्यावर्षी १,७९६ कोटी रुपये दान करून ते हारुन इंडियाच्या यादीत दुस-या क्रमांकावर आले. बिल गेट्स यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी कुटुंबाची ७५ टक्के मालमत्ता दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
एके दिवशी मुंबईत ओबेरॉय हॉटेल पाहिल्यानंतर एक दिवस त्यामध्ये अवश्य थांबेल,असा निर्धार केला. त्या अनुरूप पैसा आल्यानंतर इंग्रजीशिवाय आतमध्ये कसे जायचे याची भीती होती. एका मित्राच्या मदतीने तिथे गेले. २०० रुपये प्रतिदिन भाडे होते. खर्च जास्त होऊ नये यासाठी लाँड्री आणि जेवणासाठी बाहेर जात होते. मुंबईत आल्यानंतरच ते पहिल्यांदा विमानात बसले. इंग्रजी येत नसल्यामुळे संपूर्ण प्रवासात गप्प बसले. सध्या त्यांचा श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीत समावेश झाला आहे. ते अनेक वादातही अडकले आहेत. न्यूयॉर्कच्या टाइम वॉर्नर रियल इस्टेटचे ते सिक्रेट खरेदीदार आहेत. त्यांचे नाव रेकॉर्डमध्ये नाही, मात्र कंपनीने त्यांसाठी ९१ लाख रुपयांचे दोन कॉम्प्लेक्स ठेवले आहेत. या निमित्ताने वादात अडकण्याची त्यांची पहिली वेळ नाही. जम्बियामध्ये त्यांच्या कंपनीविरुद्ध नदी प्रदूषित करण्याचा खटला सुरू होता. एवढेच नव्हे तर तामिळनाडू, ओडिशा आणि गोवामध्ये त्यांच्या खाण प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.