आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशझोतात: १३ व्या वर्षी इलियट वाचले, नंतर त्याच पुरस्कारासाठी मिळाले नामांकन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला खुशवंतसिंग पुरस्कार विजेत्या अरुंधती सुब्रह्मण्यम सध्या चर्चेत आहेत. दुसरीकडे ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन भारतीय आहे. त्यांच्या संघर्ष यशाची कहाणी जाणून घेऊया...
* अरुंधती सुब्रह्मण्यम, कवयित्री
* जन्म: २६डिसेंबर १९६७
* कुटुंब:आई-वडील चेन्नईत, तर बहीण न्यूयॉर्कमध्ये आहे.
* शिक्षण:मुंबईच्यासेंट झेव्हियर्स कॉलेजमधून बीए, मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयात मास्टर्स डिग्री.
* चर्चेत:त्यांच्याकाव्यसंग्रहाला पहिला खुशवंतसिंग स्मृती पुरस्कार-२०१४ मिळाला.
अरुंधती यांना लहानपणापासूनच लेखनाचा छंद जडला होता. सुरुवातीस जे मनात येईल ते लिहीत गेले आणि लिखाणाची सवय लागली. लहानपणी त्या कथा कविता लिहू लागल्या. याच माध्यमातून त्यांची भाषा समृद्ध झाली.
त्यांनी आपल्या जडणघडणीबाबत दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत...१३ व्या वर्षी मद्रासमध्ये (चेन्नई) आजोबांकडे राहायला होते. पुस्तकांचे कपाट चाळताना टीएस इलियट यांचा काव्यसंग्रह- सिलेक्टेड पोएम्स- हाती लागला. इलियट पुरुष की महिला आहेत, याची कल्पना नव्हती. अनेक वर्षांनंतर अंडरग्रॅज्युएट करताना इलियट यांचे लेख, पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल हे माहीत नव्हते. मी इलियट वाचण्यास सुरुवात केली. एवढ्या लहान वयात इलियट कळायला कठीण असल्याची जाणीव झाली. त्यांच्या कवितांचा अर्थ उमजत नव्हता, पण लिखाणाची शैली आवडली होती. कविता एक प्रकारचे संगीत आहे, हे त्यांच्या कवितेतून मला समजले. कविता सामान्य असो की कठीण याला महत्त्व राहत नाही, ती केवळ चांगली असणे आवश्यक आहे. कविता कशासंदर्भात आहे हे कळल्यानंतर त्यातील अर्थ समजतो हे शाळेतील शिक्षक वर्षानुवर्षे सांगत आले आहेत. कविता एखाद्या गोष्टीबाबतच असावी याची आवश्यकता नाही. अरुंधती यांना चित्रांतून प्रेरणा मिळते आणि त्याला शब्दांचे कोंदण लाभते. कविता लिहिल्यानंतर अनेक दिवस त्याकडे पाहत नाहीत. त्याचा विसर झाल्यानंतर पुन्हा कवितेचा विचार येतो. एवढ्या दिवसांनंतर एखादी कविता मला खुणावत असेल तरच तिच्यावर नव्याने संस्कार करते. १९ व्या वर्षी लिहिलेली अमिबा पहिली व्यावसायिक कविता आहे. २००१ मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या कवितासंग्रहामध्ये अमिबाचा समावेश केला होता. गेल्यावर्षी टीएस इलियट पुरस्कार-२०१४ नामांकन मिळणा-या त्या एकमेव भारतीय आहेत.