आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तणावग्रस्त होऊ नका, मुलांसोबत वेळ घालवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशेष मुलांच्या पालकांना होणा-या त्रासाबद्दल ब-याचदा चर्चा होते. ‘अशा पालकांना मुलांकडे लक्ष देणे किती जिकिरीचे ठरत असेल’ किंवा ‘अशा मुलांसोबत पालक दैनंदिन कामे कशी करत असतील’ वगैरे. अशा मुलांच्या त्रासाचा परिणाम पालकांसह घरातील इतर सदस्यांवरही होतो. या मुलांच्या भावा-बहिणींनाही अनेक अडचणी येतात.
यावर बरेच संशोधन झाले आहे. काही संशोधनांनुसार न्यूरो-टिपिकल (नॉन ऑटिस्टिक) म्हणजेच सर्वसामान्य भावा-बहिणींसोबत राहिल्याने नॉन-न्यूरो-टिपिकल (ऑटिझमग्रस्त) मुलांना सोशलाइझ होणे सोपे जाते. प्रेम, आपुलकी आणि सहकार्यही मिळते. काही संशोधनांनुसार याचे परिणाम नकारात्मक होतात. सर्वसाधारण मुलांना वाटते की, पालक अशा मुलांवर त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करतात. त्यांच्यात मत्सर आणि राग या भावना निर्माण होतात. ते इतरांसमोर गैरवर्तन करतात. पालकांचे म्हणणे आहे की, ऑटिझमग्रस्त मुलांवर उपचार व औषधपाणी करण्यातच सगळा वेळ जातो. त्यामुळे इतर मुलांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, यात त्यांची काय चूक आहे?

अशा परिस्थितीत पालकांनी तणावग्रस्त होण्याची गरज नाही. काही गोष्टी लक्षात घेतल्यास मुलांचा विश्वास जिंकणे त्यांना शक्य होईल. पहिली गोष्ट म्हणजे पालक असल्यामुळे आपल्याला वाटते की इतर मुलांनाही ऑटिझमची माहिती असेलच. मात्र, त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला कळेल की आपण किती चुकीचा विचार करत होतो. इतरांसमोर मुलांनी नीट वागावे म्हणून मुलांना ऑटिझमबद्दल माहिती द्या. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसाधारण मुलांनाही अडचणी व आव्हानांचा सामना करावा लागतो हे आपण समजून घ्या. दर वेळी ते परफेक्टच असतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून करू नका. त्यांना राग येऊ शकतो. त्यांना समजून घ्या. चर्चा करा. तिसरी गोष्ट, असे करणे अवघड असले तरी दोन्ही मुलांसोबत वेळ घालवा. त्यांनाही महत्त्व असल्याची जाणीव करून द्या. आपले प्रेम त्यांनाही हवे असते. चौथी बाब, अनेकदा पालक सर्वसाधारण मुलांकडून मोठ-मोठ्या अपेक्षा करू लागतात. हे चूक आहे. सामान्य मुलांसोबत वेळ घालवा. ते खास असल्याची जाणीव होऊद्या. पाचवी बाब, कुटुंबातील इतर सदस्यांना सेफ्टी नेटवर्क तयार करायला सांगा. यात आजोबा-आजी, नातेवाईक, शेजारी, मित्रांना सहभागी करून घ्या. मुलांवर देखरेख, त्यांना फिरायला घेऊन जाणे, अशी कामे त्यांच्यावर सोपवा. -प्रिव्हेन्शन नियतकालिकातून