आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशझोतात: २२ व्या वर्षी डीआरडीओचे शास्त्रज्ञ होण्याचे भाग्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अविनाश चंदर : डीआरडीओ प्रमुख
*जन्म : ६ नोव्हेंबर १९५०
*शिक्षण: पदवीधर, आयआयटी दिल्ली
*कुटुंब : पत्नी आणि एक मुलगी

चर्चेत : डीआरडीओ प्रमुखाचा करार १८ महिन्यांपूर्वी संपुष्टात आणला.

अविनाश यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(डीआरडीओ) प्रयोगशाळेत पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हा त्यांचे वय केवळ २२ वर्षे होते. त्यांचे कुटुंब मीरपूरचे(पाकव्याप्त काश्मीर) मूळ रहिवासी आहे. फाळणीनंतर कुटुंब भारतात आले आणि जुन्या दिल्लीतील एका जुन्या घरात ते राहू लागले. इथे १९५० मध्ये अविनाश यांचा जन्म झाला. सरकारी शाळेतील शिक्षण आणि नंतर आयआयटी दिल्लीत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. अग्नी -१,२,३,४,५ क्षेपणास्त्र निर्मितीतील योगदानामुळे त्यांना अग्निपुत्र संबोधले जाते. त्यांच्या कार्यकाळातच डीआरडीओमध्ये तेजस फायटर प्लेन आणि अर्जुन मार्क-२ रणगाड्यासारख्या प्रोजेक्ट्सवरही काम झाले. २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डीआरडीओच्या ५७ वर्षांच्या इतिहासात प्रमुखपद मिळवणारे ते एकमेव पंजाबी होते, अन्यथा या संस्थेत बंगाली आणि तामिळींचा बोलबाला राहिला आहे. चंदर नेहमी लो-प्रोफाइल राहिले आहेत. दिल्लीमध्ये सरकारी बंगल्याऐवजी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये ते राहतात. त्यांचे कुटुंब हैदराबादमध्ये असते. हैदराबादच्या अॅडव्हान्स्ड सिस्टिम लॅबोरेटरीमध्येही त्यांचे एक कार्यालय आहे. तिथे गेल्यानंतर याच कार्यालयातून कामकाज पाहतात. नोव्हेंबर २०१४ मध्ये ६४ व्या वर्षी ते निवृत्त झाले होते. मात्र त्यांचे कंत्राट वाढवण्यात आले होते. ३१ मे २०१६ रोजी ते संपणार होते, मात्र आता ३१ जानेवारी २०१५ रोजीच करार संपुष्टात आणला आहे.