आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांवर काम करता करता बळवंत झाले बाबासाहेब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोरावस्थेतच बळवंत पुरंदरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी जोडले गेले. त्या काळात ते आचार्य अत्रेंच्या वृत्तपत्रात लिखाण करत असत. "माणूस' नामक पाक्षिकातही ते नित्याने लिखाण करत होते. त्यांनी दादरा -नगर हवेलीच्या स्वायत्तता आंदोलनामध्ये प्रसिद्ध गायक सुधीर फडकेंसोबत काम केले. काही वर्षांनंतर भारत इतिहास संशोधन मंडळात काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांची भेट इतिहासतज्ज्ञ जी. एच. खरेंशी झाली. येथूनच त्यांच्या जीवनाचा प्रवाह बदलला. इतिहास संशोधनात ते रममाण झाले. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक जी.एन. दांडेकरांसोबत काम केले. महाराजांविषयी अध्ययन करण्यासाठी त्यांनी किल्ल्यांवर भटकंती केली.
त्या वेळी शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी ते छोट्या कथा लिहू लागले. काही वर्षांनंतर त्यांनी सर्व कथांना पुस्तकरूपात प्रकाशित केले. या कथा त्यांनी "ठिणग्या' या पुस्तकातून प्रकाशित केल्या. यानंतर त्यांची अनेक पुस्तके आली. त्यांनी नारायणराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकेही लिहिली. त्यानंतर त्यांनी शिवरायांच्या जन्मापूर्वीची व त्यांच्यानंतरचीही माहिती संकलित केली. संशोधनानंतर त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ नावाने पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या १६ आवृत्त्या निघाल्या. ५ लाख घरांत हे पुस्तक गेले.
शिवाजी महाराजांवर पटकथा लिहिण्याच्या इच्छेतून त्यांचा संपर्क रंगभूमीशी आला. त्यांनी सर्वप्रथम महाराजांच्या जीवनावरच नाट्यलेखन केले. ‘जाणता राजा’ महानाटक गाजले. मूळ मराठीतले हे नाटक देशातील इतर भाषांतही भाषांतरित झाले. अमेरिकेतही या नाटकाचे प्रयोग झाले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एकीकडे बाबासाहेब शिवाजी महाराज व पेशव्यांविषयी सखोल अध्ययन करत होते, तर दुसरीकडे शिवाजी सावंतांच्या लिखाणाने महाराष्ट्रात वैचारिक मंथन सुरू होते. त्यांनी संपूर्ण जीवनच शिवाजी राजांवरील संशोधनाला समर्पित केल्याने त्यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नावाने आेळखले जाऊ लागले.
महाराष्ट्र भूषण। | बळवंत मोरेश्वर पुरंदरे, शिवचरित्रकार, इतिहास अभ्यासक
जन्म: २९ जुलै १९२२
कुटुंब: निर्मला पुरंदरे (पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या), कन्या- माधुरी, पुत्र- प्रसार आणि अमृत
चर्चेत : त्यांना "महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवण्यात अाले. त्यावरून राज्यात वादंग.
बातम्या आणखी आहेत...