आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधानंतरही कुंबळेच मुख्य काेचचा दावेदार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे अाणि कर्णधार विराट काेहली यांच्यातील वादामुळे चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेला भारतीय संघ चांगलाच चर्चेत अाहे. मीडियाच्या माहितीनुसार विराट ब्रिगेड अाता कुंबळेला पुन्हा मुख्य काेचच्या भूमिकेमध्ये पाहू इच्छित नाही. कुंबळेचा कार्यकाळ हा ३० जून राेजी संपुष्टात येत अाहे. घरच्या मैदानावरील सिरीजमध्ये १३ पैकी १० सामन्यांतील विजेत्या टीम इंडियातील खेळाडू अापल्या यशस्वी काेचवर का नाराज अाहेत? तसेच कर्णधार काेहलीने भारतात असताना कुंबळेवर काैतुकाचा वर्षाव केला हाेता अाणि अाता लंडनमध्ये दाखल झाल्यावर वादाला ताेंड फाेडले.   

टीममधील अधिकांश खेळाडू हे ड्रेसिंग रूममध्ये स्वातंत्र्यासाठी उत्सुक अाहेत. कुंबळेची तक्रार करताना काेहलीने सचिन अाणि गांगुलीकडे त्यासाठीची अापली बाजूही मांडली. मात्र, अद्याप यावर कुंबळेने काेणतीही बाजू मांडली नाही. माझ्या मते, कितीही विराेध करत असले तरी मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा अनिल कुंबळेच दिसतील.  

याचे कारण स्पष्ट अाहे 
१. काेच कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला घरच्या मैदानावर घवघवीत यश मिळाले. २. सचिन/ साैरव/लक्ष्मण या त्रिमूर्तीने कुंबळेची निवड केली. ३. वर्षभरानंतर टीम इंडिया विदेशी खेळपट्टीवर कशा प्रकारे जिंकू शकते, याची माहिती कुंबळेने प्रेझेंटेशनमध्ये दिली हाेती. अाता ती वेळ अाली अाहे. ४. बीसीसीअायच्या विनंतीनंतरही वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड अाणि रवी शास्त्रीने प्रशिक्षकपदासाठीचा अद्याप अर्ज केला नाही. बंगळुरू शहरातील असल्याने द्रविड अाणि कुंबळेमध्ये घट्ट मैत्री अाहे. ५. अातापर्यंत काेणत्याही विदेशी काेचने अर्ज केला नाही.  

कसा मिटणार वाद 
सचिन अाणि गांगुलीचा काेहली-कुंबळे यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न कायम.२. बीसीसीअायचे नेतृत्व करत असलेली प्रशासकीय समितीही मध्यस्थाच्या भूमिकेत.३. कुंबळे अाणि काेहली यांच्यातील वाद मिटवण्याचा माेठा प्रश्न अद्याप कायम अाहे. 
 
ग्रेग चॅपेल पार्ट-२ हाेऊ देणार नाही 
ग्रेग चॅपेल हे प्रशिक्षक असताना भारतीय संघामध्ये शिस्तबद्धता हाेती. त्यामुळे गांगुलीला संघ साेडून बाहेर पडावे लागले. त्यानंतर चॅपेल यांचीही सुट्टी झाली. चॅपेलसारखी स्थिती कुंबळेची हाेऊ नये म्हणून खेळाडूंना समज देण्याची गरज अाहे. कुंबळेला विराेध करणारे किती सीनियर खेळाडू काेहलीसाेबत अाहेत, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. रवी शास्त्रीला प्रशिक्षक करण्यासाठी काेहलीचा प्रयत्न असल्याचे समाेर अाले. त्यामुळे या वादाच्या मागे शास्त्रीचा सहभाग अाहे की नाही, हे म्हणणे कठीण अाहे. कारण त्याने काेचसाठी अर्ज केला नाही.

ayazmamon80@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...