आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारवंताचा धडा: ध्येय गाठणे अवघड वाटल्यास प्रयत्नांत बदल करा, ध्येयात नव्हे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन सोपे आहे. आपणच त्याला अवघड बनवत असतो.
कन्फ्युशियस
कन्फ्युशियस, चिनी शिक्षक, संपादक, राज्यशास्त्रज्ञ आणि थोर तत्त्ववेत्ता. इ. स. पूर्व 551 ला त्यांचा जन्म झाला. मृत्यू इ. स. पूर्व 479.

* स्वत:च्या अंगणात घाण साचलेली असताना, शेजारच्या घराचे छत घाण असल्याची तक्रार करू नका.
* आपण तीन मार्गांनी ज्ञान मिळवू शकतो. पहिला, चिंतनाने, जो उत्तम मार्ग आहे. दुसरा, इतरांकडून शिकून, जो सोपा आहे व तिसरा, अनुभवाने, जो कठीण आहे.
* आवडीचे काम निवडा. त्यानंतर आयुष्यात तुम्हाला एकही दिवस काम करावे लागणार नाही.
आपल्या आत डोकावून पाहिल्यास त्यात काही चुकीचे आढळत नसल्यास, मग काळजी कशाची? भीती का?
* चुकलात आणि त्यात सुधारणा केली नाही तर ती तुमची चूकच मानली जाईल.
* जेव्हा हे लक्षात येईल की ध्येय गाठणे शक्य नाही, तेव्हा ध्येय बदलू नका. ते मिळवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांत बदल करा.
* भविष्य सुधारावयाचे असेल, तर आपला भूतकाळ न्याहाळून पाहा.
* मौन, माणसाचा खरा मित्र. तो कधीही धोका देत नाही.
* जो प्रश्न विचारतो, तो एका मिनिटासाठी मूर्ख समजला जाईल. मात्र, जे प्रश्न करत नाहीत, ते आयुष्यभर मूर्ख मानले जातील.
* दोस्तांकडून धोका होण्याच्या तुलनेत त्यांच्यावर विश्वास न ठेवणे ही गोष्ट जास्त लाजिरवाणी आहे.
* जगाला सुधारण्यासाठी आधी देशाला सुधारायला हवे. देशाला सुधारण्यासाठी आधी कुटुंबाला सुधारले पाहिजे. कुटुंबाला सुधारण्याआधी स्वत:च्या आयुष्याला सुधारले पाहिजे. आणि याची सुरुवात हृदयापासून होते.
* शिक्षणाने आत्मविश्वास येतो. आत्मविश्वासाने आशा निर्माण होते आणि आशेमुळे समाधान लाभते.
* चांगला माणूस होण्यासाठी याची गरज आहे, कमीत कमी बोलणे आणि कष्ट करण्यासाठी नेहमी पुढे सरसावणे.