आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय राज्यघटनेचा हिंदुत्ववादी आत्मा २३ चित्रांमधून प्रकट !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देश ६६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा २० व्या शतकात अनेक देश हस्तांतरित झाले. पण ते आज किती स्वतंत्र आहेत, दहशतवादाच्या पाळण्यात झोके घेण्याची वेळ त्यांच्यावर का आली, याचा विचार त्यांनीच करावा. हे सुंदर विश्व नष्ट झालेच तर त्यासाठी त्यांचे अतिरेकी तत्त्वज्ञानच जबाबदार राहील.

स्वातंत्र्यानंतर राज्यकारभारासाठी तत्कालीन नेते व मुत्सद्दींनी भारताच्या प्राचीन इतिहासाचे मंथन सुरू केले. संविधान सभेने ११ महिने १८ दविस परिश्रमातून राज्यघटना तयार केली. समस्यांच्या सोडवणुकीचा केंद्रबिंदू तोच असावा जो आपल्या संविधानाचा आत्मा आहे. संविधान निर्मात्यांनी केवळ संविधान लिहिले नाही. त्यांनी तर संस्कृतीशी निगडित घटनांची चित्रेही प्रकाशित केली. भारताच्या संविधानाचा आत्मा हिंदुत्व आहे, हे ती चित्रे सिद्ध करतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हिंदू तत्त्वज्ञानाच्या आधारावर लोकांना संघटित केले, आंदोलने केली. पण सत्ता जाताच त्याच कॉंग्रेसला हे तत्त्वज्ञान टाकाऊ वाटू लागले. इतकेच नव्हे तर काल्पनिक विश्लेषणाच्या आधारावर या शाश्वत तत्त्वज्ञानाला जातीय म्हणून हिणवणे सुरू केले. या मंडळींना आपल्या संविधानाच्या आत्म्याची पुन्हा ओळख करून देणे आवश्यक ठरते.

घटनेच्या प्रतीसोबत ठेवलेली भारतीय संस्कृतीशी निगडित सामग्रींची सूची पुढीलप्रमाणे...
मोहेंजोंदडो काळ, गुरुकुलाचे दृश्य, श्री रामद्वारा लंकाविजय व रामसीता मिलन, भगवान बुद्ध जीवनदर्शन, भगवान महावीर जीवनदर्शन, अशोकद्वारा बुद्ध धर्माचा देश विदेशात प्रचार, गुप्त काळातील कलेचा विकास आणि विशेष अवस्था, विक्रमादित्य न्यायालयातील दृश्य, प्राचीन नालंदा विद्यापीठाचे दृश्य, ओडिशा शिल्पकलेचे दृश्य, नटराजाची प्रतिमा, महाबलीपुरम शिल्प दृश्य, भगीरथद्वारा गंगा अवतरणानंतरचे प्रायश्चित, अकबराच्या चित्रासोबत मुगल शिल्प, शिवराय व गुरू गोविंदसिंगांचे चित्र, टिपू सुलतान, राणी लक्ष्मीबाईंचे चित्र, गांधीजींची दांडी यात्रा, नौखाली यात्रा, सुभाषचंद्र बोस व इतर राष्ट्रभक्तांचे भारताबाहेर स्वातंत्र्यलढ्याचे दृश्य. हे विवरण वाचले आणि चित्रे पाहिली तर भारताची सुरुवातीपासूनची संस्कृती कशी होती, याचे आकलन होऊ शकते. भारतीय धर्मग्रंथ आणि विचारधारेमुळे आजवर कधीही इतर लोकांचा धर्म आणि संस्कृती धोक्यात आल्याची नोंद नाही. मग आज त्या ग्रंथांचा आधार घेतला तर इतरांची संस्कृती धोक्यात का येईल?

संविधान सभेने समाविष्ट केली ऐतिहासिक चित्रे
संविधानातील ऐतिहासिक चित्रांचा भाग जनतेच्या समोर आणून जनतेत विश्वास आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणे प्रत्येक देशभक्त भारतीयाचे कर्तव्य आहे. स्वत: भारत सरकारने ही पाने पुस्तक रूपात प्रकाशित करून जनतेपर्यंत पोहोचवली तर खूप सारे भ्रम दूर होतील. वैचारिक स्पष्टता येईल.
प्राचीन ओळख
प्राचीन ओळख, जीवनपद्धती व आर्थिक, सामाजिक व मूल्यांप्रती जागरूकता आणणे राष्ट्रविरोधी असू शकते काय ? जर ते तसे ठरत असेल तर त्याच्या सत्यासत्यतेचा आधार काय ? या मुद्द्यांवर किंचितही संभ्रम होऊ नये यासाठी संविधान निर्मात्यांनी त्या घटना चित्रांतूनही प्रस्तुत केल्या.

वैदिक काळाने प्रारंभ
हस्तलिखित पाने संविधानात सजवण्याचे काम शांती निकेतनशी जोडले गेलेले प्रसिद्ध कलाकार नंदलालजी बोस यांनी चार वर्षांत पूर्ण केले. मोहेंजोंदडो आणि वैदिक काळाने सुरुवात करून भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील घटनांपर्यंतची चित्रे या भागात समाविष्ट आहेत.

नेहरूंच्या इच्छेने सोन्यात मढवली ऐतिहासिक चित्रे
संविधानातील एका भागात ऐतिहासिक चित्रे समाविष्ट करण्याचे कार्य नेहरूंच्या आग्रहानुसार झाले होते. त्यांच्याच इच्छेने ही चित्रे सोन्याच्या फ्रेममध्ये मढवण्यात आली. या ऐतिहासिक घटना २२१ पानांत चितारलेल्या आहेत. संविधान सभेचे सर्व सदस्य, राज्यसभा व लोकसभेच्या सचिवांच्या स्वाक्षरी घेऊन हे दस्तऐवज संविधान सभेत २६ जानेवारी १९५० रोजी सादर केले होते.