आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Delhi Report By Vikas Zade, Divya Marathi

संकट अस्मानी अन् सुलतानीही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मिरात पुरामध्ये किती लोक फसलेत, किती लोक वाहून गेलेत याचा सरकारलाही वेध घेता येत नाही!. श्रीनगरमधली दृश्ये पाहिल्यावर अंगाचा थरकाप सुटतो. खायला अन्न नाही; पिण्यासाठी पाणी नाही. सर्वत्र आक्रोश आहे. आईला तिचे बाळ सापडत नाही आणि नवरा संपर्कक्षेत्राच्या बाहेर, अशी येथील स्थिती आहे. काही दविसांतच या नैसर्गिक आपत्तीतून सावरले जाणार असले तरी दीर्घकाळ येथील लोकांना रोगराईचा सामना करावा लागणार आहे.
सरकारकडून मदतकार्य जोरात आहे. याशिवाय खासगी स्तरावर धर्म जातीभेदापलीकडे जो-तो आपापल्या परीने मदतीचा हात देत आहे. हा महापूर नवा नाही. कालचे महाराष्ट्रातील माळीण आणि दीड वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक विध्वंसातून लोक अद्याप सावरायचे आहेत. वारंवार होणारा निसर्गाचा कोप यावर सरकारने कितीतरी चर्चा घडवून आणल्यात. कडक कायद्याची भाषाही झाली. प्रत्येकाला आता बदलायलाच पाहिजे, अशी सरकारची आग्रही भूमिकाही राहिली आहे, परंतु खरा प्रश्न आहे सुरुवात कोणी करायची? कृत्रिम सुखाचा त्याग मीच करायचा का? हा प्रत्येकापुढे येणारा प्रश्न आहे. ग्लोबल वार्मिंग, क्लायमेट चेंज अत्यंत वेगाने तडाखे देत आहे, परंतु आपण ज्या पद्धतीचा विकास पत्करला आहे त्याचे दुष्परिणाम लक्षात न घेता आणि पद्धत न बदलताच वेगाने पुढे निघालो आहोत. नैसर्गिक व्यवस्थेवर ताण निर्माण करणाऱ्या या पद्धतीवर पुन:श्च विचार करायची गरज आहे. अतिरेकी हव्यासापायी जे साधनसंपत्तीचे आत्यंतिक दोहन (लूट) सुरु केले आहे त्यामुळे मूलभूत ढाचा कोळसण्याचे हे अनुभव पाठीशी पुरेसे आहेत. यातून धडा घेतला नाही तर पुढे याहूनही बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.

जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या प्राणहानी व वित्तहानीची आपण कशी मोजदाद करणार आहोत? महाराष्ट्रात पुन्हा माळीण घडू नये याकरिता कशी कार्यप्रणाली यापुढे स्वीकारणार आहोत. जंगलकटाई, खाण उद्योग, नद्यांच्या पात्रातील उत्खनन, अवैध बांधकामे याला सरकार कधी आळा घालणार आहे काय? स्थानिक तसेच जागतिक पातळीवर याबाबत ऊहापोह करून अत्यंत गांभीर्याने विचारविनिमय व कठोर निर्णय घेणे अपरिहार्य आहे. अन्यथा हे असेच सुरू राहील. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा दोन-चार ठिकाणी मदतकार्य करावे लागण्याची वेळ येईल.
ज्या - ज्या ठिकाणी निसर्गाचे तांडव झाले. हजारोंचा बळी गेला. कित्येक बेघर झाले. त्या निसर्गाने मात्र हा कोणत्या धर्माचा अन् कोणत्या जातीचा असा भेदभाव केला नाही. मदतीचा हात पुढे करणाऱ्याच्या मनातही या बाबी शविल्या नाहीत. उत्तराखंडातील महाप्रलयात ज्यांचे प्राण गेलेत त्यातील बहुतांश हिंदू भाविक होते. ज्या देवावर श्रद्धा ठेवून लोक जात होते तिथे मंदिरही वाचले नाही. श्रीनगरच्या पुराने हिंदू-मुसलमानांमध्ये भेद केला नाही किंवा त्यांच्या मदतीला धावून जाताना सैन्यांनी पाठीचा पूल केला. लोक जीव वाचवत त्यांच्या पाठीवरून चालत होते. ते लोक हिंदू होते की मुसलमान? तो सैनिक कोणत्या धर्माचा होता? हा प्रश्नही उपस्थित झाला नाही. या अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटही देशावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

अलीकडे सोशल मीडियाने क्रांती केली असली तरी त्यावर काय चालले आहे याचे ऑडिट कोणी करायचे. अलीकडे व्हॉट्सअॅपवर काही चित्रफिती पसरविल्या जात आहेत. नैसर्गिक विध्वंसापेक्षाही त्या भयावह आहेत. हैदराबादचा एमआयएमचा आमदार अकबरुद्दीन ओवेसी वय वर्षे ४४ हा हिंदू राष्ट्राला भंग करायला निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करणे आणि मुसलमानांना प्रक्षोभक भाषणातून हिंदूंबद्दल चीड निर्माण करण्याचा त्याचा उपद्व्याप सुरू आहे. कौशल्याने रामास कुठे - कुठे जन्म दिला याची तो त्याच्या भाषणातून खिल्ली उडवत आहे. तो एवढ्यावरच थांबत नाही हिंदुस्थानातून परत जायची वेळ आलीच तर अजिंठा आणि वेरूळच्या नग्न मूर्तींशिवाय या देशात काहीच उरणार नाही, अशी तो धमकीही देतो.
प्रख्यात हिंदुत्ववादी खासदार योगी आदित्यनाथ वय वर्षे ४२ हे व्यक्तिमत्त्वही साधे सोपे नाही. या देशात सर्वधर्मसमभाव नांदतो असे संस्कार असताना या देशातील प्रत्येकच हिंदू असल्याच्या मताशी आदित्यनाथ ठाम आहेत. प्रेमाने मानत नसल्यास शस्त्राचाही वापर करण्याचा सल्ला हे योगीजी देतात. त्यांच्या चित्रफिती हिंदूंच्या मनात मुसलमानांबाबत द्वेषभावना निर्माण करण्यास पुरे ठरू शकतात. हिंदू साध्वी बालिका सरस्वती वय वर्षे केवळ १४ ही तर इस्लामाबादमध्ये भारताचा ध्वज फडकावयास निघाली आहे. भारतातील हिंदू हे शेर आहेत आणि शेर जंगलाचा राजा असतो, असे तिचे म्हणणे आहे. मुल्ला आणि पाकिस्तानी लोकांना धडा शिकविण्याचे तिच्या प्रवचनांमधून सांगत फिरत आहे. काश्मीर होगा लेकनि पाकिस्तान नही होगा ही तिची भूमिका आहे. या साध्वीच्या तोंडून मुसलमानांविरुध्द ज्वाळा निघतात. अलीकडेच अमेरिकेतील एका पत्रकाराचा जिहादींनी शिरच्छेद केला. त्याचे चित्रीकरण करण्यात आले. मुसलमानांनी बकरा कापावा तसे त्या पत्रकाराचे शिर वेगळे केले. रक्ताच्या चिळकांड्या उडताना अल्लाचा उद्घोषही करण्यात आला. ही चित्रफीत अंगाचा थरकाप उडविणारी आहे. ती का पसरविण्यात येत आहे. दहशत पसरविण्याचा हा प्रकार आहे काय? मुसलमानांच्या अशा क्रौर्यावर योगीराज आणि सरस्वतीचे भाष्य हे या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून कायम ठेवू शकते असे तर भारतीयांना वाटत नसेल? आणि त्यांना एकसंघ होण्यासाठी आधार मिळत असेल तर ते चुकीचे नाही असे म्हणावे काय? एकिकडे धर्मांध शक्तींचा बडेजावपणा. दुसरीकडे सातत्याने येणारे अस्मानी संकट! अशाही परिस्थितीत सरकारची तटस्थ भूमिका असेल तर त्यास सुलतानी संकटाची चाहुल असेच म्हणावे लागेल.

गंगेत घोडे न्हाले!
पेड न्यूजमधून अशोक चव्हाणांची सुटका झाली. त्यांच्या वाट्याला आलेली गेली चार वर्षे ही अत्यंत हाल अपेष्टेची होती. आदर्श प्रकरणाने त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. ‘अशोकपर्व’ने त्यांना घाम फोडला. डॉ. माधव किन्हाळकर त्यांना शांत बसू देत नव्हते. चव्हाणांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी चंग बांधला होता. पेडन्यूजचे प्रकरण हा भाजपच्या अस्मितेचा विषय ठरला. ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ ही मानसिकता असलेल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांनी तर आसुरी आनंद घेतला. सोमय्या आपल्या बोबड्या मराठीतून या विषयावर वाहिन्यांमध्ये रवंथ करतानाचे देशाने पाहिले. अशोक चव्हाणांच्या बाजूला कॉँग्रेसवाले तरी कुठे होते? त्यांना राजकारणातून कसे संपवता येईल यासाठी कॉँग्रेसचा एक गट प्रयत्नशील होता. अशोक चव्हाणांचे खासदार होणे आणि भाजपला पेडन्यूजबाबत पुन्हा चेव येणे या बाबी म्हणजे अशोक चव्हाणांची महाराष्ट्रातील राजकारणात प्रभाव असल्याची जाणीव भाजपला झाल्याचे वाटत होते. पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्रात पाडलेला उजेड पाहता सोनिया गांधी अशोक चव्हाणांच्या हाती पुन्हा सूत्रे देतील, अशी भीती भाजपला असावी. यात मात्र, भाजप यशस्वी झाले. दरम्यान, विधानसभा नविडणुकीसाठी कॉँग्रेसने त्यांना समन्वय समितीचे अध्यक्ष केले असले तरी वेळ निघून गेली आहे, परंतु अशोक चव्हाणांचे कॉँग्रेसला महत्त्व कळले हे महत्त्वाचे आहे. कॉँग्रेसमध्ये कोणाचे दविस कसे राहतील याचा नेम नसला तरी अशोक चव्हाणांना अच्छे दनि येत आहेत. अशोकराव २००९ मध्ये तुम्ही अशोकपर्व आणि पेड न्यूजवर किती खर्च केला ते एकदा सांगूनच टाका! गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचा नविडणुकीचा खर्च सांगितला होता त्याप्रमाणे!.