फॅक्टरीच्या फ्लोअरमध्ये शांतता आहे, पण ते रिकामी नाहीये. पांढरे कोट घातलेले तीसेक कर्मचारी नाजुकशा अवजारांनी मनगटी घड्याळांचे छोटे भाग जोडत आहेत. ही जिनेव्हा किंवा शेनझेनची एखादी चिनी फॅक्टरी नाही. ही हालचाल कारांसाठी प्रसिद्ध अमेरिकन शहर डेट्रॉइटस्थित शिनोला वॉच कंपनीच्या मुख्यालयाची आहे. 1907 मध्ये स्थापन शिनोलाला फॉसिल इन्कॉर्पोरेटेडचे मालक टॉम कॉर्टसॉटीसने खरेदी केले आहे. 2012 मध्ये याची नव्या दमाने सुरुवात केली. कंपनीच्या घड्याळांची किंमत 475 ते 950 डॉलरच्या दरम्यान आहे.
शिनोलाने 2013 मध्ये 50 हजार घड्याळे बनवली होती. यंदा दीड लाख घड्याळे बनवण्याचा इरादा आहे. त्यांनी सायकल, चामडी वस्तू, पत्रिका, सॉफ्ट ड्रिंक्स व बूट पॉलिश बनवण्याचीही सुरुवात केली आहे. शिनोलाने पहिल्या सहा महिन्यांदरम्यान दोन कोटी डॉलरची विक्री केली आहे. 2017 पर्यंत नफा कमावण्यासोबतच 10 कोटी डॉलरच्या विक्रीचे लक्ष्य निश्चित केले आहे. शिनोलाचे प्रॉडक्ट हायफाय लोकांची पसंद बनत आहे. अभिनेत्री केरी वॉशिंग्टनच्या क्रिस्मस उपहारांमध्ये शिनोलाचा समावेश आहे. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, मिशीगनचे गव्हर्नर रिक स्नायडर यांना कंपनीची घड्याळे आवडतात.
शिनोलाचा विस्तार अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंगचे पाय रोवले जात आहेत. चीनमध्ये वाढती मजुरी, वाहतुकीतील मोठा खर्च, कमजोर डॉलर, स्वस्त वीज, अमेरिकी उत्पादकतेतील वाढ यांसारख्या कारणांमुळे अमेरिकन फर्म्ससाठी स्वदेशात काम करणे अधिक लाभदायक झाले आहे. शिनोलाचा कारभार अधिक चमकला तर डेट्रॉइटचे गौरवशाली दिवस परत येतील. कधी काळी हे शहर ऑटोमोबाइल व्यवसायासाठी ओळखले जात होते.
डेट्रॉइटच्या मध्यभागी असलेल्या पश्चिम मिलवाउकी अॅव्हेन्यूमध्ये 11 मजल्यांची अर्गोनॉट इमारत चांगल्या दिवसांची आठवण करून देते. 1936 ते 1956 दरम्यान येथे जनरल मोटर्सची संशोधन प्रयोगशाळा होती. त्यात जीएमची प्रत्येक कार डिझाइन करण्यात आली होती. पहिल्या ऑटोमेटिक ट्रान्समिशनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले होते. येथे पहिली हार्ट-लंग मशीन विकसित झाली होती. दुस-या महायुद्धादरम्यान लढाऊ जेट विमान बनत होते. परंतु 1999 पर्यंत अर्गोनॉट पूर्णपणे रिकामी झाली होती. आता एका स्थानिक कालाशाळेचा मालक आहे. शिनोलाने याचा पाचवा माळा घेतला आहे. 54 वर्षीय कार्टसोटीस यांना खात्री वाटते की, त्यांची कंपनी डेट्रॉइट मॅन्युफॅक्चरिंग साम्राज्याचा उपयोग करून असे उद्योग परत आणेल जे बाहेर गेले किंवा संपले.
घडी की टीक टीक
2017 पर्यंत नफा कमावण्यासोबत 10 कोटी डॉलरच्या विक्रीचे लक्ष्य ठरवले आहे.
2013 मध्ये शिनोलाने 50 हजार घड्याळे बनवली होती.