आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश: सहाव्या वर्षी भारताचा, तर सातव्या वर्षी जागतिक चेस चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईचा सात वर्षांचा बुद्धिबळपटू देव शाहने ब्राझीलच्या जुईज डी. फेरामध्ये जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अंडर-७ गटात विजेतेपद पटकावले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेने त्याला कँडिडेट मास्टर्सचा पुरस्कार दिला आहे.
- देव दुस-या इयत्तेत असून बहीण जान्हवी पाचवीत शिकत आहे. दोघे धीरूभाई अंबानी शाळेत शिकतात. त्याचे वडील राहुल शाह सिंगापूर स्थित वित्त कंपनी फिलिप्स कॅपिटलमध्ये वेल्थ मॅनेजर व आई रूपाली दंतचिकित्सक आहे.
पाचव्या वर्षी
- अंडर-७ गटात राज्यात तिस-या स्थानावर होता.
- नवी दिल्लीत आयोजित एशियन चेस चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले.
सहाव्या वर्षी
-१४६५ पॉइंट जिंकून भारतात सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चेस चॅम्पियन झाला.
-जगात दुस-या स्थानावर .
सातव्या वर्षी
-स्टेट गोल्ड मेडलिस्ट.
-ग्लासगोमध्ये आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेत अंडर-१० गटात सुवर्णपदक जिंकले.
-कोलकातामध्ये आयोजित चेस नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक.
-नवी दिल्लीमध्ये आयोजित नॅशनल स्कूल चेस. चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक.
-ब्राझीलमध्ये आयोजित जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.