आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घायुष्यासाठी महिलांना हवा चांगला आहार, पुरुषांना पुरेशी झोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर पुरुषांना दीर्घ आयुष्य हवे असेल, तर त्यांनी जाणीवपूर्वक पुरेशी झोप घेतली पाहिजे. परंतु महिलांनी दीर्घायुष्यासाठी विविध प्रकारचा पोषक आहार घेतला पाहिजे. त्यात विटामिन बी 6 आणि पुरशा प्रमाणात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. विटामिन बी 6 मध्ये केळी, लसून, पिस्तासारख्या पदार्थांचा समावेश आहे. विटामिन बी 6 शरीरात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्ससारखी ऊर्जा शरीराला मिळते. पुरेशी झोप घेतल्याने पुरुषांचे आयुष्य वाढेल, परंतु महिलांनी जर संतुलित आहार घेतला तरच त्यांना त्याचा फायदा होईल.
मेलबर्न येथील मोशन विद्यापीठातील संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. आहार आणि झोपेचा पुरुष आणि महिलांमध्ये काय परिणाम होतो, याचा अभ्यास संशोधनात केला गेला आहे. कमी झोप घेतल्यामुळे ओबेसिटी, डायबिटीज, कार्डियोवस्कुलर डिसीज आणि कोरोनरी डिसीज सारखे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर मृत्यू येण्याचा धोका वाढतो. पुरुष आणि महिला दोघांनी कमी झोप घेतली तर भूक कमी लागते. त्यामुळे अशक्तपणा जाणवतो. परंतु त्यांनी चांगला आहार घेतला तर दीर्घ आयुष्य ते जगू शकतात. झोप किती घ्यावी, हा खरा प्रश्न आहे. वाढत्या वयाबरोबर झोपेच्या प्रमाणातही बदल करण्याची गरज आहे.
सर्वसाधारणपणे आपणास सात तासांची झोप पुरेशी आहे. परंतु रोजचे काम आणि आव्हानांमुळे याचे गणित बदलवायला हवे. एडवांस्ड ब्रेन मॉनिटरिंगचे मुख्य कार्यकारी क्रिस बर्का यांनी सांगितले की, एक पूर्ण स्लीप सायकल जवळपास 90 मिनिटांची असते. नियमानुसार रोज 4 ते 5 स्लीप सायकल होण्याची गरज आहे, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. संशोधनकर्त्यांनी आहार आणि झोप यांच्यातील परस्पर संबंध आणि त्याचा आरोग्यावर होणार परिणाम शोधण्याचा प्रयत्न केला. महिलांमध्ये हा संबंध विशेषत: असतो. प्रोफेसर वाहीक्विस्ट यांनी सांगितले की, महिलांनी नियमित संतुलित आहार ठेवला तर चांगल्या झोपेचे फायदे त्यांना मिळतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांची झोप पुरेशी न होण्याचे प्रमाण दुप्पट असते. ज्या महिला कमी झोप घेतात, त्या महिला आपल्या आहारात विटामिन बी 6 कमी प्रमाणात घेतात. त्यामुळे महिलांनी आहारामध्ये विटामिन बी 6 चे प्रमाण पुरेसे ठेवणे गरजेचे आहे. पुरुषांना ही गरज नसते. हे संशोधन तैवानमध्ये न्यूट्रीशन आणि हेल्श सर्वेक्षणातून केले गेले. या संशोधनात 1865 प्रौढ पुरुष आणि महिलांचा सहभाग होता.