आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Digital Knoweldge, Executive, Divya Marathi

सध्याच्या युगात कर्मचा-यांना डिजिटल ज्ञान आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले आणि बुद्धिमान एक्झिक्युटिव्हज यशस्वी कंपन्यांमध्येच जाण्यास पसंती देतात. कर्मचा-यांचे डिजिटल ज्ञान किती आहे, यावर कंपनीचे यश अवलंबून असते. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून या संदर्भातील टिप्स वाचा...


कंपनीमध्ये डिजिटल ज्ञानाला असे प्रोत्साहन द्या
सुरुवातीस केवळ वेबमास्टरकडे डिजिटल ज्ञान होते. सध्या कंपनीतील बहुतांश कर्मचा-यांना डिजिटल ज्ञान आवश्यक आहे. दुस-यांच्या डिजिटल ज्ञानाला प्रोत्साहन देणा-या कर्मचा-यांना पुढे करणे आवश्यक आहे. डिजिटल रणनीतीची आयुधे, मूल्य आणि त्याच्या पद्धती माहीत असणा-यांना तसेच त्या शिकवू शकणा-यांना नियुक्त केले जावे. या व्यतिरिक्त नॉलेज शेअरिंगचे उद्दिष्ट निश्चित केले जाऊ शकते. याला प्रोजेक्टच्या यशाचे मुख्य परफॉर्मन्स इंडिकेटरही तयार केले जाऊ शकते. डिजिटल कौशल्य कसे विकसित करणार, याची विचारणा प्रोजेक्टमध्ये सहभागी व्यक्तींशी केली जाऊ शकते. यशस्वी सामर्थ्य हाच आपला बहुमान आहे, याची जाणीव संपूर्ण टीमला करून द्यायला हवी. डिजिटल कौशल्य जेवढे जास्त, तेवढे व्यावसायिक मूल्यावर जास्त लक्ष केंद्रित करेल.
(स्रोत : फोर वेज टू स्केल डिजिटल कॅपेबिलिटीज- पेरी हेविट)


भागीदारीमध्ये विश्वासार्हता वाढवण्याच्या पद्धती
व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी लोकांवर विश्वास व्यक्त करण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते. कंपनीचा पैसा आणि साधनसामग्री योग्य मार्गावर असेल, तर संभाव्य यशात आणि सुधारणेत तसेच विश्वासार्हतेचा अंदाज चांगल्या पद्धतीने कसा बांधला जावा? नव्या संभाव्य भागीदारीच्या व्यवहारात विश्वासार्हता वाढवण्याच्या या पद्धती असू शकतात. प्रथम- उदारमतवादी व्हावा. यामुळे तुमची विश्वासार्हता वाढेल. नव्या भागीदारांमध्ये ही जाणीव आणल्यास दोघांसाठी ही विजयाची स्थिती होऊ शकेल. दुसरे, सारखेपणा शोधा. समानता जुळल्यानंतर भागीदाराला तुमच्यासोबत दीर्घकाळपर्यंत व्यावसायिक संबंध ठेवू शकाल. तिसरे, भागीदाराला कोणत्याही चुकीसाठी शिक्षा देऊ नका. तत्कालिक शिक्षा चांगली असू शकते. मात्र, नंतर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. भागीदार सहकार्य करण्यात, जोखीम स्वीकारण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करू शकतात.
(स्रोत : व्हू कॅन यू ट्रस्ट?- डेव्हिड डिस्टेनो)


अशा कंपन्यांना चांगले एक्झिक्युटिव्हज हवेत
नव्या मालकामध्ये कोणते विशेष गुण हवे आहेत, याची माहिती चांगल्या आणि प्रतिभावंत एक्झिक्युटिव्हज आकर्षित करण्यासाठी आवश्यक आहेत. एक्झिक्युटिव्ह स्तरावरील उमेदवार या गोष्टी पाहतो. पहिले- एक्झिक्युटिव्ह स्तरावरील उमेदवारांसाठी यशस्वी कंपनी खूप महत्त्वाची आहे. ते कंपनीचा प्लॅटफॉर्म, ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यामध्ये भविष्यातील शक्यता पाहतात. ते संस्थेचे लोक आणि संस्कृतीही पाहतात. आपला आदर करणा-यांसोबत तसेच काही शिकू शकू अशा व्यक्तींसोबत त्यांची काम करण्याची इच्छा असते. दुसरे, करिअरला चालना मिळण्यात आणि वैयक्तिक विकासाच्या संधी किती आहेत, जो त्यांना पुढे नेतो अशा कंपन्यांचे त्यांच्याकडून आकलन केले जाते. त्यांना किती साधनसामग्री मिळते आणि नोकरीत त्यांना किती स्वातंत्र्य दिले जाते? विशेषकरून ज्या पदांवर सर्वांचा डोळा असतो, त्यावर काम करताना बाह्य जग त्यांच्या भूमिकेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते. (स्रोत : हेडइंटर्स रिव्हिल व्हॉट कँडिडेट्स वांट - बोरिस ग्रोजबर्ग)


व्यावसायिक यशासाठी या गोष्टींचा अंदाज असावा
खेळामध्ये कोण जिंकले आणि त्यात त्याचा वाटा किती होता हे प्रत्येक जण जाणतो? मात्र, व्यवसायामध्ये यशाचे गमक एकाही की-नंबरशी सांगणे कठीण असते. व्यवसायात यशाचा अंदाज बांधण्याच्या तीन पद्धती असू शकतात. पहिले, हे थेट आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे. याच्या की-नंबरमध्ये सुधारणा करून चांगले आर्थिक निष्कर्ष प्राप्त करता येतात. दुसरे, ओपन-बुक कंपन्या आपले की-नंबर्स विकसित करण्यासाठी व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग आणि अन्य भागीदारांशी सल्ला मसलत करतात. आपल्यासमोर सर्वात मोठे आव्हान आणि संधी कोणती आहे? याची विचारणा ते करतात. तिसरे, कंपन्यांची स्थिती बदलत राहते. कधी महसुली उत्पन्नाला प्राधान्य असते, तर कधी नफा आणि कॅश फ्लो याला सर्वोच्च प्राधान्य असते. कंपनी एक उद्दिष्ट पूर्ण करून पुढे जाते, तेव्हा दुस-या वर्षी त्यांचे उद्दिष्ट अन्य गोष्टींवर असते.
(स्रोत : ए विनिंग कल्चर किप्स स्कोअर- जॉन केस आणि बिल फॉश)


मंडळाच्या कामगिरीमध्ये अशा पद्धतीने सुधारणा आणू शकता
कंपनी मंडळाच्या टीममध्ये परस्पर संवादाचा संस्थेच्या यश आणि नफ्याशी संबंध असतो. मंडळाच्या कामगिरीत सुधारणा आणण्यासाठी या पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात. पहिले, आपल्या नोकर भरतीच्या निकषांचा विचार करा. एकमेकांना न ओळखणा-या लोकांना मंडळात सदस्य करा. यामुळे प्रशासकीय कामाचा स्तर आणखी उंचावण्यास मदत मिळेल. संचालकांमध्ये कल्चरल इंटेलिजन्स असायला हवा. त्यांच्यात मंडळासोबत चांगले काम करण्याचे कौशल्य आणि प्रेरणा असल्याचे यातून सिद्ध होईल. दुसरे, टीमला प्रशिक्षण द्या. कमकुवत मंडळ अधिक सक्षम आणि कणखर बनवण्यासाठी केवळ जास्त गुंतवणूक करण्याचे हे प्रकरण नाही. त्याच्या फायद्यालाही तेवढेच महत्त्व आहे.
(स्रोत : द की टू ए बेटर बोर्ड, टीम डायनामिक्स- सोलेंज चरस)