आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प यांची बौद्धिक क्षमता अन‌् मिजासखाेरीवर लागले प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प टॉवरच्या २६ व्या मजल्यावर अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सामानाने भरलेल्या एका डेस्कवर बसलेले आहेत . भिंतीवर फॉर्च्यून, बिझनेस वीक, जीक्यू आणि प्लेबॉय या मासिकांची मुखपृष्ठे लावण्यात आलेली आहेत. खिडक्यांवर गोल्फमध्ये मिळालेल्या विविध ट्रॉफीज आहेत, तर डेस्कवर ‘पर मेक अमेरिका ग्रेट अगेन’ लिहिलेली टोपी ठेवलेली आहे.
गेल्या काही दिवसांत टाइम मासिक आणि ट्रम्प यांच्यात जी दीर्घ चर्चा झाली ती अध्यक्षांच्या जबाबदारीशी संबंधित होती. अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी अध्यक्षांना काय जाणण्याची गरज आहे, हा खरा प्रश्न होता. या पदाचे अकल्पनीय ओझे उचलण्यासाठी एक उमेदवार कशी तयारी करतो, एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला देशाचे नेतृत्व करण्यासाठी कोणत्या पद्धतीची मनोवस्था असण्याची गरज आहे, हे प्रश्न ऐकून ट्रम्प एकूण रणनीतीबाबत उत्तरे देतात. ते म्हणतात, प्रतिस्पध्यार्पेक्षा माझी परिस्थिती अनेक बाबतीत चांगली आहे. मला मीडियात बरेच कव्हरेज मिळते. सीएनएन असो नाही तर अन्य काेणतेही चॅनल असो, प्रत्येक वेळी ट्रम्प हजर असतात. ट्रम्प यांचा असा दावा आहे की, ते नेहमीच सक्षमता आणि प्रतिभा यांना प्राधान्य देत आले अाहेत. बेंगाजीपासून ई-मेलपर्यंत हिलरी क्लिंटन यांचे चुकीचे निर्णय समोर आल्याची टीका ते करतात.
ते शेवटी एक सेल्समन आहेत याचे त्यांच्याकडे काय उत्तर आहे? ते व्हाइट हाऊसमध्ये काम कसे करणार याचे मूल्यांकन करणे कठीण आहे. यावर ट्रम्प उत्तर देतात की, अमेरिकेला आता सगळ्यात जास्त सेल्समनची गरज आहे. ते म्हणतात की, सीएनएनच्या एका मुलाखतीत त्यांना नाटोसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मी नाटोसंदर्भात फार माहिती ठेवत नाही. तरीही मी उत्तर दिले की, नाटो बेकार आहे. आपण त्यावर फार पैसा खर्च करतो. कारण अन्य देश आपला वाटाच देत नाहीत. जागतिक महत्त्वाच्या एका मुद्द्यावर ट्रम्प यांनी किमान एक हालचाल तरी केली हे नसे थोडके.

कूटनीती आणि भांडवली बाजाराच्या समान राजकारणात उमेदवाराच्या बोलण्याला फार महत्त्व आहे. निवडणूक प्रचारात ट्रम्प फार अयोग्य वाटले. सीमेपलीकडून मेक्सिको बलात्कारी लोकांना पाठवत आहे, मुसलमानांना अमेरिकेत प्रवेशबंदी, रशियन अध्यक्षांचे कौतुक करूनही त्यांना उमेदवारी राखण्यात यश मिळाले. ते अमेरिकेच्या युरोपियन सहकाऱ्यांवरही टीका करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या अशा या बेधडक वक्तव्यांमुळे तसेच धोरणांची फारशी माहिती नसण्याने प्रशासन अस्थिर होऊ शकते,असे त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांनाही वाटते. पण ट्रम्प अशा वाटणाऱ्या चिंता फेटाळून लावतात आणि आपण एक स्थिर व्यक्ती आहोत, असे म्हणतात.

ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहायला गेले तर ट्रम्प यांचे अध्यक्ष बनणे अमेरिकेसाठी जाेखमीचे बनू शकते. अमेरिकन अध्यक्ष बदलाचे साक्षी असू शकतात, पण ते अशा सामाजिक आणि राजकीय बदलाचे साक्षी आहेत की, ज्यासाठी संतुलन, विशेषज्ञता आणि सरकार चालविण्याची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला ट्रम्प हे तात्कालिकता आणि ध्रुवीकरण यावर भर देतात. ते विशेषज्ञ आणि पुस्तकांऐवजी वृत्तपत्रे आणि टीव्ही शोमधून धोरणांसदर्भात तयारी करत आहेत. अमेरिकन मतदारांसमेार आता दोन पर्याय आहेत. हिलरी क्लिंटन फार अनुभवी अाणि धोरणांची माहिती असणाऱ्या आहेत. ट्रम्प आधुनिक जगात जुन्या परंपरेच्या पक्षाचे उमेदवार आहेत. क्लिंटन - ट्रम्प यांचा मुकाबला परंपरागत विरुध्द आत्मविश्वासी, अनुभवी विरुद्ध भडकावू, यथार्थवादी वि. रिंग मास्टर यांच्यादरम्यान असणार आहे. मर्दानगी, संकुचित राष्ट्रवाद आणि आयटी युगातील सडकछाप स्मार्टनेससमोर शिक्षित अभिजन वर्ग म्हणजे एक ओझ्यासमान आहे काय, या मुद्द्यांवर आता ट्रम्प यांना जनमताला सामोरे जावे लागणार आहे.

१९५३ मध्ये व्हाइट हाऊस सोडताना हॅरी ट्रुमननी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीने जबाबदारी घेण्यापूर्वी काय होणार हे आपण सांगू शकत नाही. तुम्ही युद्धात आघाडीवर नेमलेले जनरल असा, बँक अधिकारी असा किंवा अध्यक्ष असा.. सुरुवातीलाच सर्व काही सांगू शकत नाही. व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमान आणि परिस्थिती यावरून अंतिम निर्णय घ्यावा लागतो. या निकषांच्या आधारे पाहायला गेल्यास ट्रम्प यांनी चिंताच निर्माण केली असे म्हणवे लागेल. जर ते निवडून आले तर सरकार आणि लष्कराचा अनुभव नसलेले पहिले अध्यक्ष असतील. आणखी गंभीर म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय विषयांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी स्वत:ला तसे तयार केलेले नाही.

अनुभवी अध्यक्षांनी चुका केल्या आणि अनुभव नसलेल्यांनी अनेकदा रचनात्मक कामे केलेली आहेत. जॉन एफ केनेडी, लिंडन जॉन्सन आणि रिचर्ड निक्सन हे प्रशासनात सखोल ज्ञान असलेले होते. पण प्रत्येकाने चुकीचे निर्णयही घेतले. दुसऱ्या बाजूला ट्रुमन यांच्याकडून कोणला फारशी आशा नव्हती. पण शीतयुद्धाच्या काळात त्यांनी पश्चिमी गठबंधनाचा पाया रचला. आयसेनहॉवर हे सरकारसाठी उत्तम व्यवस्थापक ठरले.

ट्रम्प यांचे प्रशंसक आपल्या नेत्याला २१ व्या शतकातील रोनाल्ड रेगन मानतात. रेगन हे आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांचा तथ्य आणि माहिती यांच्याशी संबंध नव्हता. पण हिलरी नौसैनिक ऑफिसर जिमी कार्टर यांच्याप्रमाणे आहेत. कार्टर हे विस्तृत माहिती ठेवत, पण आपल्या वेळच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे त्यांना जमले नाही. तसे
ट्रम्प यांची तुलना रेगन यांच्याशी करणे चुकीचे ठरू शकते. दोघांत काही सारखेपणा जरूर आहे. दोघांनाही राजकारणाची पार्श्वभूमी नाही. ते मीडियावर अवलंबून आहेत. ट्रम्प यांच्याप्रमाणे रेगनही व्यक्तिगत माहिती सखोलपणे पाहत नसत. ते नवीन आणि मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात, पण दोघांच्या सरकारी अनुभवात अंतर आहे.पुढील काही महिन्यांत हिलरी अनेकदा म्हणतील की, ट्रम्प कसे चुकीचे आहेत, तर ट्रम्प म्हणतात माझा रुबाब हीच माझी ताकद आहे. - टेरेसा बेरेन्सन यांच्यासमवेत
असे होते माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
आदर्श अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची कोणतीही व्याख्या नाही. आतापर्यंतच्या ४३ राष्ट्राध्यक्षांपैकी सारे सर्वगुणसंपन्न नव्हते. मात्र आपल्या उणिवांवरही त्यांनी नामी इलाज शोधला हे विशेष...

फ्रँकलिन रुझवेल्ट - त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच आकर्षण होते. ते चतुर राजकारणी होते, मात्र आपले विचार आणि सिद्धांतांवर ते एकनिष्ठ नव्हते. रुझवेल्ट यांनी दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आपल्या विचारांशी तडजोड केली.

हॅरी ट्रुमन - डेमोक्रॅटिक पक्षाच्या ट्रुमन यांना नवखा राजकारणी म्हणून झिडकारले जाई. ते एक कठोर सेनापती असल्याचे सिद्ध झाले. त्यांना कमी लेखणे धोकादायक सिद्ध होईल, हे त्यांच्या विरोधकांनाही कळले होते.
ड्वाइट आयसेनहॉवर - १९५२ मध्ये न्यू हॅम्पशायरच्या प्राथमिक निवडणुकापर्यंतही आपण रिपब्लिकन असल्याचे त्यांनी मान्य केले नव्हते. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली. चांगल्या सैनिकी कारकीर्दीमुळे देशांशी थेट संवाद साधण्यात त्यांचा हातखंडा होता.

रोनाल्ड रिगन - राष्ट्रपती होण्याच्या आधी रिगन परराष्ट्रनीतीबद्दल फार काही जाणून नव्हते. देशासमोर एक दीर्घ दृष्टिकोन आणि मोठे स्वप्न ठेवण्यात त्यांना अधिक रुची होती. त्यांना सल्लागारही लागत.
बातम्या आणखी आहेत...