आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर ८२ वर्षीय तरुण धावण्यास सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांचे वय ७८ वर्षे होते. मणक्यामध्ये त्यांना असह्य वेदना होत होत्या. शरीराच्या उजव्या भागाच्या खालील बाजूस अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागली. आवश्यक ठरलेली शस्त्रक्रिया चार तास चालली. काही महिन्यांतच धावण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी दहा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.
* नाव : डॉ. आशिष राय
वय : ८२ वर्षे
१३९ मॅरेथॉन
* वजन : ७० किलो
धावल्यानंतर त्यांनी ६ किलो वजन कमी केले.
* उंची : ५ फूट ८ इंच
* उच्च रक्तदाब : १४०/८०
या वयात ताण कमी घेतात, लाफ्टर थेरपीही घेतात.
* हिमोग्लोबिन : १४.५
रोज लस्सी पितात, ऋतूनुसार फलाहार.
* एचडीएल : ८०
हलके लंच करतात तसेच पोटभर डिनर करतात.
* उत्तर अमेरिका आणि ब्रिटनच्या १०० प्लस क्लबमध्ये समाविष्ट.
चर्चेत कशामुळे : वॉशिंग्टनमध्ये नुकताच हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि आपल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले.

मॅरेथॉन मॅन नावाने प्रसिद्ध डॉ. आशिष राय यांनी गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये १३९ व्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. ८० पेक्षा अधिक वयाच्या गटात रॉय यांनी १३.१ मैल अंतर तीन तास ४० मिनिटांत पूर्ण केले. त्यांनी ५२ व्या वर्षापासून धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. धावण्याची सवय झाल्यास कधी उच्च रक्तदाब व उच्च कोलेस्टेरॉल होऊ शकत नाही. १९८७ मध्ये हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेले रॉय प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म शिलाँगमध्ये झाला. त्यांनी शाळेत असतानाच धावण्यास सुरुवात केली होती. दररोज तीन मैलांचा सराव करत. आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला होता. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी सर्वोत्कृष्ट धावक प्रसन्ना गोस्वामी यांना १० मैल अंतराच्या स्पर्धेत त्यांनी हरवले.

मॅरेथॉनच्या निमित्ताने आतापर्यंत ते विविध देशांत धावले आहेत. आपल्या वयोगटात त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने त्यांची दखल घेतली. ते रोज १२ किमी तर रविवारी जवळपास १८ किमी धावत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत ते रविवारी २२ किमी धावतात. धावण्यातून मिळणा-या आनंदावर त्यांनी जॉय ऑफ रनिंग आणि वंडरफुल जॉय ऑफ रनिंग ही दोन पुस्तके लिहिल्याची माहिती न्यूयॉर्क येथून भास्करला दिली.