आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिमान: वाघा परेडच्या व्हिडिओतून नोकरशहांना प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : पत्नी डॉ. अलका आणि मुलांसोबत डॉ. विश्वास.
डॉ. विश्वास सक्सेना : नामिबिया सरकारचे सल्लागार
*जन्म : २ डिसेंबर १९६४
*शिक्षण : अजमेरमधून पीएचडी
*कुटुंब : पत्नी अलका, मुलगा अरण्य आणि मुलगी सर्जना

चर्चेत : नामिबियाच्या अधिका-यांना प्रशिक्षण दिले जात आहे

राजस्थानमधील डॉ.विश्वास सक्सेना यांनी नागौर जावला या लहान गावात प्राध्यापक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. या काळात त्यांचे ४०० शोधप्रबंध प्रकाशित झाले आणि १००० ज्युनियर प्राध्यापकांना प्रशिक्षणही दिले होते. यादरम्यान त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला आणि लहानपणीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. अधिकारी रँक मिळवणारे ते देशातील पहिले प्राध्यापक आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पाच वर्षे कॅप्टन म्हणून कार्यरत होते. लष्करातून आल्यानंतर सात वर्षे मसुरीच्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. सध्या ते दक्षिण आफ्रिकेच्या नामिबियात नोकरशहांना प्रशिक्षण देत आहेत.भारतीय नोकरशहांना इथे करून घेतल्या जाणा-या फाउंडेशन कोर्सप्रमाणे डॉ. विश्वास नामिबियात प्रशिक्षण देत आहेत. विश्वास म्हणाले, एकदा वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीटचा व्हिडिओ नामिबियात नोकरशहांना दाखवला होता. या संचलनाने भारावून गेल्यामुळे व्हिडिओ नामिबियातील नोकरशहांना दाखवण्यात आला. त्यांचे संपूर्ण कुटुंब शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. वडील ब्रह्मप्रकाश अजमेरमध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत. आई सरला सक्सेना यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या ड्राइंग व पेंटिंगच्या प्रोफेसर आहेत. पत्नी डॉ. अलका सक्सेना प्राध्यापिका आहेत.

शब्दांकन : अतुल सिंह(अजमेर)