आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी: नारळाच्या काथ्यापासून शेती करणा-या शेतक-याचा वार्षिक नफा १४ लाख रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : पत्नी अपेक्षासोबत अंकित पटेल.

अंकित पटेल : शेतकरी
*जन्म: १३ जानेवारी १९८४
*शिक्षण : लंडनमध्ये पीजी
*कुटुंब : वडील घनश्याम पटेल बिल्डर, आई सरला गृहिणी, पत्नी प्रोफेसर अपेक्षा आणि एक मुलगा
चर्चेत : एका वर्षात चार पिके काढली

अंकित यांनी परदेशात शिक्षण घेतले खरे, मात्र त्यांनी करिअरसाठी शेतीच निवडली. यामुळे ते आसपासच्या गावांत एक धडपडे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाऊ लागले. वर्षात चार पिके घेत असल्यामुळे त्यांना टेक्नोक्रॅट शेतकरी म्हटले जाते. शेतीच्या पद्धतीत बदल केल्यामुळे त्यांना हे यश मिळाले. ते खताऐवजी नारळाच्या काथ्याचा वापर करतात. २००८ मध्ये शेती करण्यासाठी देशात परतलो तेव्हा कुटुंबीय चकितच झाले. ग्रीन हाऊस शेतीचा विचार बोलून दाखवल्यानंतर आसपासच्या शेतक-यांना वेडगळपणा वाटला. ग्रीन हाऊस शेती समजून घेण्यासाठी दोन वर्षांत देशातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. साधारण ४० ते ५० शेतांचा अभ्यास केला आणि अखेर वडिलोपार्जित शेतात १४,६०० रोपटी लावण्यास सुरुवात केली. वर्षाच्या आतच परिणाम दिसू लागले. नारळाच्या काथ्यापासून शेती करण्यासाठी एका एकरासाठी ७० लाख रुपये खर्च येतो. पारंपरिक शेतीत खत, पाणी आणि वेळेचा जो अपव्यय होतो तो यामध्ये टाळता येऊ शकतो. अंकित यांनी एक एकराहून जास्त शेतीत ९४० बाय ६३० चौरस मीटरमध्ये ग्रीन हाऊस केले आहे. त्यासाठी १३ ते १४ लाख रुपये खर्च आला. एका एकरात शेतकरी १४,५०० बियाणे पेरतो. एक बियाणे ४.५ रुपयांना पडते. दर महिन्यास १५ हजार रुपये वीज, मजुरांवर खर्च होतात. एवढ्या खर्चात शेतकरी वर्षात १२० टन काकडीचे उत्पन्न घेतो. उत्पन्न २६ लाख आणि खर्च वजा जाता निव्वळ नफा १४ लाख रुपये मिळतो.
अंकित यांनी या प्रोजेक्टवर काम सुरू केले तेव्हा बँकेने त्यांचा प्रस्ताव फेटाळला आणि म्हटले, खताशिवाय शेती अशक्य आहे. अंकित यांच्याप्रमाणे गावातील अन्य लोक ग्रीन हाऊस पद्धतीने शेती करत आहेत. नारळाच्या काथ्यापासून शेती करणारे अंकित एकमेव आहेत. या तंत्राने त्यांना नफ्यात शेती करणारा शेतकरी बनवले.
शब्दांकन : निशांत दवे(वडोदरा)