आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Fashion By Asmita Agrawal, Divya Marathi

Fashion: क्लचमधील विविध रंग, ट्रेडिशनल वर्क आणि हार्ट शेपची फॅशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या फॅशन अ‍ॅक्सेसरीजमध्ये सध्या क्लच (हातातील छोटी पर्स) हे सर्वात महत्त्वाचे बनले आहे. मग सकाळचा एखादा कार्यक्रम असो की रात्रीची पार्टी, फॅशन फॉरवर्ड महिला आणि मुली क्लच घेतल्याशिवाय घराबाहेरच पडत नाहीत. त्यातच क्लचला जर डिझायनर लूक असेल किंवा त्यावर कलाकुसर करण्यात आली असेल, तर नक्कीच तो एक ठेवणीतल्या दागिन्याप्रमाणे भासेल. त्यामुळे लूक पूर्णपणे बदलून जाईल. कपड्यांनाही एक वेगळा लूक मिळेल.


सिंपल क्लचऐवजी मेटॅलिक बॉक्स स्टाइल
सुरुवातीला सर्व महिला आणि मुली चौकोनी क्लच वापरत असत; पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता क्लचच्या आकारातही मोठा बदल झाला आहे. आता मेटॅलिक बॉक्स स्टाइल अधिक पसंतीच उतरत आहे. त्याला आणखी वेगळा लूक देण्यासाठी एम्ब्रॉयडरी किंवा स्टोनवर्कनेही सजवता येते. या सर्व अ‍ॅक्सेसरीजमुळे परफेक्ट स्टाइल स्टेटमेंट तयार होते. अनेकदा या अ‍ॅक्सेसरीज महिलांमध्ये चर्चांचा विषय ठरतात. त्यामुळे क्लचमध्ये विविध डिझाइन्स व स्टाइल पाहायला मिळतात. त्यातच मिनोडिरे क्लच स्टाइलचाही समावेश आहे.


विविध रंगांनी सजलेले क्लचचे डिझाइन
मिनोडिरे हे एक खास हँडक्राफ्टेड ओकेयन-वेअर बॉक्स आहे. यावर विविध प्रकारच्या ट्रेडिशनल टेकनिक्सचा वापर केला जातो. यात ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरी आणि अ‍ॅप्लिक्यू वर्क सरफेस ऑर्नमेंटेशन पाहायला मिळते. रंगांचे हायलाइट असते. अनेक प्रकारच्या रंगांमुळे क्लचला एक वेगळा लूक मिळतो, तो हमखास महिलांच्या पसंतीस उतरतो. वुमन्स डे सेलिब्रेशन वीकमध्ये गिफ्ट करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.


प्रोजेक्ट डिझाइन व हँडवर्कवर फोकस
मिनोडेरे हा एक फ्रेंच शब्द आहे. या स्टाइलला निफ्टमधून पदवी मिळवलेल्या तरिनी नरुला डेव्हलप करत आहेत. यात सुंदर कलर कॉम्बिनेशनबरोबरच ग्राफिक्स आणि प्रिंट्सबरोबर फॅशन आणि लाइफस्टाइल अ‍ॅक्सेसरीज तयार करण्यात आल्या आहेत. मिनोडेरेमुळे कपड्यांना नॉव्हेल्टी एलिमेंट प्राप्त होतो. तरिनीने क्लचवर कप केक, हार्ट शेप आणि एनव्हलप क्लच हे खास डिझाइन तयार करण्यात आले आहेत.

लेखिका फॅशन स्टायलिंगमध्ये 20 वर्षांपासून कार्यरत आहे.नवी दिल्ली.