आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Fashion By Asmita Agrawal ,Divya Marathi

सबा करते आई शर्मिलाच्या ज्वेलरीचे डिझाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबा अली खान यांना प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खानच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कधीही टाळ्या वाजवताना पाहिले नसेल. शर्मिला टागोर यांच्या एखाद्या कार्यक्रमातही तिची उपस्थिती नसते. कारण सबा यांना प्रचारापासून दूर राहायलाच आवडते. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:लाच हे वचन दिले होते.


सबा सांगते, ‘कुटुंबाची काळजी हेच माझे पहिले ध्येय आहे. मी आधीपासूनच शांत स्वभावाची आहे. आई-वडिलांसोबत राहिले आणि त्यांची काळजीही घेतली. सुरेश मेनन यांनी ‘पतौडी नवाब ऑफ क्रिकेट’ हे पुस्तक लिहिले आहे. माझे वडील मन्सूर अली खान यांना ती श्रद्धांजली आहे. हे पुस्तक लिहिण्यात आमचेही योगदान आहे. मी भावनिक नात्याने त्यांच्याशी जुळलेली होते. मी त्यांच्यासोबत खूप प्रवास करत असे. प्रेम आणि जीवनासंबंधी त्यांनी दिलेला सल्ला मी नेहमीच ऐकला. त्यांचा सल्ला नेहमीच योग्य असे. माझ्या वडिलांमध्ये खूप माणुसकी होती. त्यांना शिकण्याची आवड होती. ते खूप विलक्षण होते. त्यांना गमावल्याचा क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता.’
सबा एक ज्वेलरी डिझायनर आहेत. मात्र तिच्या ज्वेलरीतील बहुतांश डिझाइन्स शर्मिला टागोरसाठीच आहेत. आईलाही तिने तयार केलेले दागिने आवडतात. सबा म्हणते, ‘आपल्यासाठी अनोखे ठरणारे दागिनेच छान दिसतात. प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने जगायचे, असे आईने मला शिकवले आहे. मला त्यांचा प्रत्येक चित्रपट आवडतो. योग्य पद्धतीने कसे जगावे यासाठी माझी आई एक उत्तम उदाहरण आहे. ती खूप चांगली आई, महान अभिनेत्री आणि अद्भुत पत्नी आहे.’ सबाने सैफ अली खानची पत्नी करिना कपूरसाठीही दागिने तयार केले आहेत. ती सांगते , ‘मी करिनासाठी क्रिएशन्स केले आहेत. करिना खूप चांगली मुलगी आहे. ती आमच्या कुटुंबात रुळली असून सर्वांचाच खूप आदर करते. यामुळे सैफ अली खानही खुश आहे. ’ सबा सैफ अली खानचेही तेवढेच कौतुक करते. ती म्हणते, ‘माझ्या भावाला सगळे पुरस्कार मिळावेत. आज बॉलीवूडमध्ये तो सर्वात प्रभावी अभिनेता आहे. ‘ओंकारा’ चित्रपटात त्याने वास्तवदर्शी अभिनेता साकारला आहे. मला त्याचा अभिमान आहे. तो एक खरा हीरो आहे. माझ्याहून दोन वर्षांनी लहान असलेली बहीण सोहा नेहमीच माझ्याशी भांडत असते. मी तिचा ‘तुम मिले’ हा चित्रपट खूप वेळा पाहिला आहे. सोहाने त्यात उत्कृष्ट अभिनय केला आहे. ’