आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Fashion By Asmita Agrawal, Divya Marathi

सुती कपड्यांसह शैलीत घडवून आणा विशेष बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूरला बॉलीवूड स्टाइलचे आयकॉन म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ती स्वत:साठी सुंदर ड्रेसअप करतानाच टेक्स्टाइलमध्ये आलेल्या नव्या प्रकारांची माहितीही बाळगते. गुची किंवा लुई विंतोसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सबरोबर तिला भारतीय सुती कपड्यांचेही आकर्षण आहे. तिला पांढ-या रंगाची हाताने नक्षीकाम केलेला अनारकली खूप आवडतो.

फॅशन जगात टेक्स्टाइलवर प्रकाश टाकण्यासाठी गौरंग अनेक वर्षांपासून मेहनत घेत आहेत. त्यांच्या मते, फॅशन जगातील सोनम कपूरसारख्या स्टाइल दिवाने टेक्स्टाइलला पसंती दिल्यास विणकरांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल. ते कामात बदल आणि नवीन प्रयोग करतील. सध्या तरी विणकरांची मुले या क्षेत्रात येऊ इच्छित नाहीत.

बॉलीवूडमधील कलाकार अशा कपड्यांना पसंती देऊ लागल्यावर विणकरांची मुलेही नोकरी शोधण्याऐवजी या व्यवसायाकडे वळतील. सोनम कपूर प्रथमच गौरंग यांच्याकडे गेली तेव्हा तिने पारंपरिक, मात्र हटके ड्रेस परिधान करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्या ड्रेसमध्ये आधुनिकतेची थोडी झलकही असावी, असे म्हटल्यानंतर गौरंग यांनी तिच्यासाठी अनारकली सूट तयार केला. त्यांनी नुकतीच हातमागाची साडी आणि ड्रेसचे कलेक्शन सादर केले. यात कॉटन आणि सिल्कची साडी, जमदानी टेक्निकवरील प्युअर जरी काम पाहावयास मिळाले. त्यांनी पारंपरिक प्रकारांमध्ये दक्षिण भारतातील मंदिरांचे डिझाइन कपड्यांवर चितारले. एम्ब्रॉयडरीद्वारे त्यांना पारसी, काश्मिरी, चिकनकारी इत्यादी प्रकार साडीवर सादर करण्याची संधी मिळाली. ते देशभरातील 500 हातमागांचा वापर करतात. यात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेशचा समावेश आहे. सोनम कपूरच्या व्यक्तिमत्त्वाला प्रत्येक रंगसंगती आणि प्रत्येक स्टाइलचा ड्रेस खुलून दिसतो, असे गौरंग सांगतात. यासाठी ठरावीक कार्यक्रम आणि तिचा मूडही मॅच होणे आवश्यक आहे, असे ते सांगतात.

सुती कपडे, सोबत कांजीवरम काठ असलेली अनारकली
डिझायनर गौरंग शहा यांना खादी गुरू म्हटले जाते. सोनम कपूरसाठी त्यांनी नुकताच खादी कपड्याचा कांजीवरम काठ असलेला सुंदर अनारकली ड्रेस तयार केला . 16 व्या शतकातील टेंपल आर्ट कलेचा प्रभाव या अनारकलीवर दिसून येतो. गौरंग यांनी डिझाइन केलेले ड्रेस परिधान केल्यानंतर वेगळाच अनुभव मिळतो तसेच स्वत:मध्ये काही चांगला बदल झाल्याची जाणीव होते, असे सोनम कपूर सांगते. गौरंगच्या ड्रेसमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ असतो. त्यामुळेच असे ड्रेस आकर्षणाचे केंद्र ठरतात. कपड्यांवर विविध प्रयोग करण्यात त्यांंचा हातखंडा आहे. प्रत्येक वेळी आपण कल्पनाही करू शकणार नाही, असे प्रयोग करून ते ड्रेस सादर करतात, मात्र आपल्या मूलतत्त्वांशी असलेली नाळ तुटू देत नाहीत. गौरंगची मोहर उमटलेले काही ड्रेस कोणत्याही वेळी घालता येऊ शकतात.

सोनमसाठी ड्रेस तयार करण्यात आनंद मिळतो. हे काम आव्हानात्मक असल्यामुळे थोडी भीतीही वाटते. सोनमसाठी खादी, सिल्क आणि कॉटन फॅब्रिकवर अधिक प्रयोग केले जातात.
- डिझायनर गौरंग शहा
लेखिकेला फॅशन क्षेत्रातील लिखाणाचा
20 वर्षांचा अनुभव.