आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Fashion Designer Rahul Mishra, Divya Marathi

आंतरराष्ट्रीय वूलमार्क पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय डिझायनर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल मिश्रा : फॅशन डिझायनर
चर्चेचे कारण : त्यांना नुकताच मिलान येथे आंतरराष्ट्रीय वूलमार्क पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय व आशियाई फॅशन डिझायनर आहेत.
जन्म : 1979 मध्ये
शिक्षण : सायन्स पदवीधर, कानपूर विद्यापीठातून, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबादमधून पदव्युत्तर
कुटुंब : वडील डॉक्टर. पत्नी दिव्या एनआयडीमध्ये शिक्षण घेताना सोबत
कानपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर मलहौजी गावात राहणा-या राहुल यांना बालपणी कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत होता. शाळेची फी फक्त सात रुपये महिना होती आणि सतरंजीवर बसून शिकावे लागत होते. वडील डॉक्टर होते, पण त्यांच्याकडे त्या वेळी कोणते काम नव्हते. चढ-उताराचे दिवस होते. त्यांच्या बालपणी फॅशनसारखी कोणती गोष्टच नव्हती. 10 व्या वर्षी त्यांनी लखनऊतील बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांना डुडलिंग, कॉमिक स्ट्रिप्स आणि कॅरिकेचर्सकडे त्यांचा ओढा वाढला. कानपूर विद्यापीठात विज्ञानात पदवी घेतल्यानंतर ते दिल्लीला पळून गेले. मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, असे वडिलांना वाटत होते, मात्र राहुलला ते मान्य नव्हते.
तोपर्यंत फॅशन जगतात आपले भविष्य आहे, हे त्यांनाही माहीत नव्हते. त्या वेळी त्यांना कॉटन आणि सिल्कमधला फरकही माहीत नव्हता. ते सांगतात, ‘मी खूप आळशी होतो आणि एखादे क्रिएटिव्ह कामच करावे, असे वाटत होते.’ 2003 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) ची प्रवेश परीक्षा दिली आणि निवड झाली. तेथेच त्यांची भेट दिव्याशी झाली. 2008 मध्ये त्यांचा विवाह झाला. 2006 मध्ये मुंबई फॅशन वीकमध्ये ‘जननेक्स्ट’ शो त्यांचा लाँचपॅड ठरला. कॉलेजच्या प्रोजेक्टअंतर्गत राहुलने त्यात केरळ हँडलूम फॅब्रिकचे ड्रेसेस आणि ट्राउझर्स सादर केले. त्यांची खूप स्तुती झाली.
मिलानमध्ये फॅशन इन्स्टिट्यूट मारांगोनी येथे पूर्ण शिष्यवृत्ती जिंकणारे राहुल हे पहिले गैरयुरोपीयदेखील आहेत. ते सांगतात, ‘मारांगोनीची फी 2 लाख रुपये होती. शिष्यवृत्तीमुळे ती मला माफ होती, पण 7 रुपये महिना ते 2 लाख रुपये हा प्रवास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला.’
‘सर्वात गरीब आणि सर्वात कमकुवत व्यक्तीचा चेहरा आठवा, आपण जे करणार आहोत, त्यामुळे काय फायदा होईल, असा प्रश्न स्वत:ला विचारा’ या महात्मा गांधींच्या विचारांचा राहुलवर खूप प्रभाव आहे. त्यामुळे ते हस्तकलाकारांना नेहमी मदत करतात. गुजरात, बंगाल आणि मध्य प्रदेशातील गावांतील 1000 हस्तकलाकारांना त्यांनी रोजगार दिला आहे. मिलानमध्ये मिळालेला पुरस्कार त्यांनी याच कारागिरांना समर्पित केला आहे.
ते म्हणतात, ‘या पुरस्कारामुळे भारतीय फॅशनकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलेल. हा भारतीय हस्तकलेचा विजय आहे.’ नॉन विंटर गारमेंटच्या स्वरूपात वापरले जाणारे डिझाइन्स त्यांनी या कारागिरांकडून तयार करून घेतले. त्यांनी तयार केलेल्या नव्या फॅब्रिकमध्ये 85 टक्के लोकर आणि 15 टक्के सिल्क आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आशियातील 5 फॅशन डिझायनर्स हे या स्पर्धेत सहभागी होते. 20 देशांतील 48 डिझायनर्समध्ये त्यांची निवड झाली होती. सुपर मॉडेल आणि टीव्ही निवेदक अ‍ॅलेक्सा चुंग राहुल यांच्या कामाने प्रभावित आहेत. त्या म्हणतात, ‘या पुरस्कारावर फक्त राहुलचाच हक्क होता.’