आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Feudalism And New Liberalism By Prakash Pawar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरंजामी आणि नवउदारमतवादी राजकीय चौकटी...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील द्विध्रुवीय आघाड्यांच्या राजकारणाचे विसर्जन घटस्थापनेच्या दिवशी आणि शिवसेना-भाजपच्या रौप्यमहोत्सवी वर्षात झाले. पंधरा वर्षांची सत्ताधारी आघाडी फुटली. भाजप आणि शिवसेनेच्या जागा प्रत्येकी दहा-अकरा जिल्ह्यांमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा केवळ सात जिल्ह्यांत आहेत, तर कोकण, मराठवाडा आिण पश्चिम विदर्भात भाजपच्या जागा फारच कमी आहेत. कोकण वगळता काँग्रेस पक्षाची स्थिती ब-यापैकी २००९ मध्ये होती. मात्र, सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली होती. ही कोंडी आघाड्यांचे विसर्जन करण्यामुळे सोडवली गेली आहे. यामुळे २०१४ची विधानसभा निवडणूक सामाजिक अभिसरण सरणारी मैलाचा दगड आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन सामाजिक संबंधांची जुळवाजुळव झाली आहे. गेल्या दोन दशकांपैकी चार वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी होता (१९९०-१९९५ व १९९९-२०१४) तर एक वेळ शिवसेना-भाजप सत्ताधारी होता. (१९९५-१९९९) शेतकरी कामगार पक्ष, बहुजन महासंघ, भारिपचे गट, जनसुराज्य पक्ष हे सत्तेमध्ये सहभागी झालेले पक्ष आहेत. किंबहुना शिवसंग्राम संघटनेचाही सत्ताधारी पक्षाशी संबंध होता. राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना थेट सत्ताधारी नव्हत्या. त्यामुळे सत्तेचे लाभार्थी पक्ष जास्त आहेत. सत्तेच्या लाभार्थींपासून दूर अंतरावरील मुख्य दोन राजकीय पक्ष आहेत. या दोन पक्षांचा सामाजिक आधार ब-यापैकी पश्चिम महाराष्ट्रात आहे. प्रस्थापितांविरोधी आंदोलन उभे करण्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे योगदान मोठे आहे. या आंदोलनांमधून राजकीय पक्ष व मतदार यांच्या संबंधांमध्ये फेरबदल झाला आहे. या दोन पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतदारांत मोठी फूट पाडलीय. शेतकरी जवळपास पन्नास टक्के काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनिष्ठ होता.
आज पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी समाज काँग्रेस-राष्ट्रवादीशी पक्षनिष्ठ नाही. या प्रकारच्या मतदारांच्या राजकीय वर्तनात फेरबदल प. महाराष्ट्रात राष्ट्रीय समाजपक्ष व स्वाभिमानी शेतकरी यांनी घडवला. शहरी मतदारसंघ ९४, मिश्र स्वरूपाचे मतदारसंघ ७२ व ग्रामीण मतदारसंघ १२२ आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या त्रिकोणामध्ये शहरी मतदारसंघाची संख्या एकवटलेली आहे. या त्रिकोणामध्ये शिवसेना, मनसे, भाजप आणि काँग्रेस अशी मुख्य राजकीय स्पर्धा आहे. ठाणे, पुणे आणि नाशिक इथे राष्ट्रेवादीदेखील स्पर्धक होता. मात्र, मनसे आणि राष्ट्रवादी इथे नागरी समाजात शिरकाव करण्यास अपयशी ठरले आहेत. मध्यम वर्गातील जनतेने मार्केट आणि नागरी समाजाच्या मदतीने मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध जवळजवळ बंड पुकारले आहे. मनसेने ख्यातनाम (सेलिब्रिटी) व्यक्तींमधून नागरी समाजात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता.
विठ्ठला कोणाचा झेंडा घेऊ हाती, अशा रूपकामधून मनसे नागरी समाजात शिरकाव करत होती, परंतु शिवसेना संघटनेने हिंदुत्व, मीडिया आणि मीडियाशी संबंधित ख्यातनाम व्यक्तीमार्फत नागरी समाजातील आधार स्थिर ठेवला. भारतकुमार राऊत, नीलम गो-हे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियातील आधार विशेष करून स्थिर केला. त्याखेरीज या मीडियाच्या आधारे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या विरोधात प्रस्थापितविरोधी चळवळ चालविली होती. यामुळे ठाणे, पुणे, नाशिक या त्रिकोणात शिवसेनेचे आधार पक्के होत गेले. यात अमराठी मतदार हा मार्केट व नागरी समाजाचा घटक आहे. या समाजघटकांमधून भाजप व काँग्रेसला पाठिंबा मिळतोय. सध्या मात्र अमराठी मतदार हा मार्केट व नागरी समाजाच्या मदतीने काँग्रेसकडून भाजपकडे वळला आहे. त्यामुळे या त्रिकोणातील शहरी भागात भाजप आणि शिवसेनेकडे मतदार झुकला आहे.

या असंतोषाचा थेट रोख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा आहे. मथितार्थ म्हणजे, ओबीसींत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक वर्ग मोठा होता. तो वर्ग शिवसेना-भाजपकडे सरकला आहे. म्हणजेच मतदार आणि पक्ष यांच्या समर्थनाच्या दिशेमध्ये फेरबदल झाला आहे. विदर्भातील देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी मार्केट आणि नागरी समाजाचा पाठिंबा भाजपला मिळवून दिला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यभर प्रभावक्षेत्र निर्माण केले नाही: राज्यभर प्रभावक्षेत्र असलेले नेतृत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली पंधरा वर्षे नाही. राज्यभर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही. राज्यातील नेतृत्व दिल्लीवर अवलंबून होते. स्वतंत्रपणे राजकारण पृथ्वीराज चव्हाणांनी केले. त्यामधून त्यांची व्यक्तिगत प्रतिमा सुधारली, परंतु पक्षपातळीवर राज्यभर सुधारणा या नेतृत्वास करता आली नाही. या पोकळीमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्यात नेते म्हणून मान्यता मिळत गेली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना केवळ प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणून मान्यता मिळाली नाही, त्यांच्या नेतृत्वामध्ये लोकसंग्रहाचा सकारात्मक भाग दिसत होता. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांसदर्भात शिवसेनेने आंदोलन केले होते. छळवणूक व अत्याचारविरोधी आंदोलन नीलम गो-हे यांनी मीडियातून लढवले. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या मार्केट आणि नागरी समाजाच्या बाहेरील विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात शिवसेना-भाजपचा आधार विस्तारलेला दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व विदर्भात व्यापारी आणि उद्योग क्षेत्रातील होते. परंतु व्यापारी आणि उद्योगामुळे त्यांची प्रतिमा शेतकरीविरोधी अशी विरोधकांनी मांडली. याशिवाय मार्केट आणि नागरी समाजातूनही त्यांना लोकसंग्रहही करता आला नाही.